ADVERTISEMENT
home / Wedding Accessories
तुमच्या बहिणीचं लग्न ठरलं का मग या लग्नात तुम्ही सर्वात खास दिसायलाच हवं. यासाठी  जाणून घ्या बहिणीच्या लग्नासाठी खरेदी करताना नेहमी काय काय काळजी घ्यायला हवी.

बहिणीच्या लग्नासाठी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

लग्न ही अशी एक गोष्ट आहे जिथे वधुवरांप्रमाणेच इतरांनाही फुल धमाल करण्याची संधी मिळते. त्यात जर तुमच्या बहीण अथवा भावाचं लग्न असेल तर तुम्हाला करवली म्हणून सगळीकडे मिरवता येतं. लग्नकार्यात असे अनेक विधी असतात ज्यासाठी नवरी अथवा नवऱ्यासोबत करवलीला मान दिला जातो. त्यामुळे तुमच्या बहिणीच्या लग्नात खास दिसायचं असेल तर कपडे आणि दागदागिने खेरदी करताना काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्यायला हवी.

तुमच्या कपड्यांचा रंग –

तुम्ही लग्नात साडी अथवा लेंगा काहीही घाला पण त्याच्या पॅटर्न आणि रंगाबाबत सावध राहा. तुमच्या कपड्यांची रंगसंगती नवरीच्या कपड्यांशी समान असू नये. कारण असं असेल तर तुमच्या दोघींचे लुक हायलाईट होणार नाहीत. शिवाय फोटोमध्येंही तुम्ही एकसारख्या दिसाल. यासाठी तुमच्या बहिणीचे ब्रायडल कलेक्शन लक्षात ठेवून तुमची साडी अथवा लेंग्याचा रंग निवडा. थोडक्यात तुमची खरेदी नवरीची खरेदी करताना अथवा नंतर करा.

Instagram

ADVERTISEMENT

लाईटवेट आऊटफिट निवडा –

नवरीची बहिण या नात्याने लग्नात तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या असू शकतात. अशावेळी धावपळ करताना अथवा पाहुण्यांचे स्वागत करताना तुमचे आऊटफिट जर खूप जड आणि न पेलवणारे असतील तर तुम्हाला काम करणं कठीण जाईल. जर आरामदायक हालचाल करायची असेल तर आऊटफिट एथनिकसोबत लाईटवेट असतील याची काळजी घ्या. एवढंच नाही तुम्हाला लग्नात तुमच्या बहिणीच्या जड ब्रायडल आऊटफिट सांभाळण्याची जबाबदारीदेखील सांभाळायची आहे. त्यानुसार तुमच्या कपड्यांची खरेदी करा. आजकाल बाजारात अनेक लाईटवेट साडी अथवा लेंगा मिळतात. ज्यात तुम्ही सुंदर दिसाल शिवाय तुम्हाला सुटसुटीतदेखील वाटेल.

Instagram

दागिन्यांची निवड असावी खास –

कपड्यांप्रमाणेच तुमचे दागिने तुमच्या बहिणीच्या ब्रायडल ज्वैलरीसोबत मॅच होणारे नसावेत. यासाठी जास्त हेव्ही ज्वैलरीपेक्षा सध्या सुरू असलेल्या ट्रेंडनुसार दागिने निवडा. ज्यामुळे तुम्ही स्टायलिशही दिसाल आणि त्यामुळे तुमच्या बहिणीचे दागिने लग्नात उठून दिसतील. आजकाल एथनिक लुकवर सिल्व्हरच्या दागिन्यांचा ट्रेंड आहे. तुम्ही या लग्नात हा ट्रेंड फॉलो करू शकता.

ADVERTISEMENT

फूटवेअर बाबत राहा सावध –

बहिणीच्या लग्नात सर्वात जास्त धावपळ तुम्हाला करायची आहे ही गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा. त्यामुळे लग्नात असे फूटवेअर वापरा ज्यात तुम्ही सहज धावपळ करू शकाल. बहिणीला तिचे लुक तयार करण्यासाठी, पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी, लग्नाचे आयोजन पाहण्यासाठी तुम्हाला सतत सगळीकडे फिरावं लागणार. अशावेळी फार हिल्स असलेले अथवा भरभर चालता न येणारे फूटवेअर वापरणे नक्कीच योग्य नाही. त्यामुळे जरी  तुम्हाला स्टायलिश फूटवेअर आवडत असले तरी बहिणीच्या लग्नात ते वापरणे टाळा.

Instagram

मेकअप आर्टिस्ट बुक करताना –

लग्नाचे आऊटफिट, दागिने, चपला यांची खरेदी झाल्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मेकअप. लग्नात मेकअपसाठी ब्रायडल मेकअप आर्टिस्टला बुक करण्यात येतं. बऱ्याचदा ब्रायडल मेकअप आर्टिस्टच कुटुंबातील इतर मंडळी जसं की आई, बहिणी, काकू, मामी यांची तयारी करून देतात. मात्र जर तुम्हाला लग्नात छान तयार व्हायचं असेल तर वेळ वाचवण्यासाठी आणि घाई होऊ नये यासाठी मेकअप आर्टिस्टच्या असिस्टंट किती असणार आणि त्या वेळेचं नियोजन कसं करणार हे आधीच विचारून घ्या. कारण ऐनवेळी तुमची तयारी सुरू असताना वेळेअभावी तुम्हाला मेकअप लवकर उरकावा लागणार नाही. 

ADVERTISEMENT

 

 

या सर्व खरेदी सोबतच लग्नाआधी काही महिने स्किन केअर रूटिन फॉलो करण्यास सुरुवात करा म्हणजे लग्नात तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल.

 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

लग्नाची साडी अथवा लेहंग्याची निगा राखण्यासाठी सोप्या टिप्स

नागपूरात लग्नाची शॉपिंग करताय मग ‘या’ ठिकाणांना जरूर भेट द्या

ADVERTISEMENT

लग्नासाठी शॉपिंग करताय, मग या ‘15’ गोष्टी जरूर लक्षात ठेवा

04 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT