हेअर रिमूव्हल क्रिम वापरण्यापूर्वी तुम्हाला माहीत असायला हव्या या गोष्टी

हेअर रिमूव्हल क्रिम वापरण्यापूर्वी तुम्हाला माहीत असायला हव्या या गोष्टी

केस काढणाच्या अनेक पद्धती आहेत मात्र त्यामध्ये हेअर रिमूव्हल क्रिमने केस काढणं ही सर्वात सोपी आणि स्वस्त पद्धत आहे. यासाठीच जाणून घ्या हेअर रिमूव्हल क्रिम वापरण्यापूर्वी तुम्हाला काय माहीत असायला हवं. केस काढण्यासाठी कुणी वॅक्स स्ट्रिप्सचा झटका आणि चिकटपणा सहन करत वॅक्सिंग करणं पसंत करतं, कुणी रेझरने कट होण्याची भीती बाळगत त्वचेवरून रेझर फिरवतं तर पैसे खर्च करण्याची ताकत असणारे लेझर ट्रिटमेंट करून घेतात. पण ज्यांना यातील कोणताच प्रकार नको असतो ते मात्र वेळ, त्रास आणि पैसे वाचवण्यासाठी हेअर रिमूव्हल क्रिम वापरणं योग्य समजतात. तुम्हालाही केस काढण्याचा हा पर्याय सोपा वाटत असेल तर त्याआधी या काही गोष्टी तुम्हाला नक्कीच माहीत असायला हव्या.

जाणून घ्या हेअर रिमूव्हल क्रिम कसं काम करतं -

हेअर रिमूव्हल क्रिमने केस वॅक्सिंगप्रमाणे मुळापासून ओढून काढण्याऐवजी त्वचेच्या वरच्या थरापासून सहज वेगळे केले जातात. त्यामुळे नंतर काहीच दिवसांमध्ये त्याजागी पुन्हा नवे केस उगवतात. मात्र असं असलं तरी ही एक वेदनामुक्त प्रक्रिया आहे. यासाठी या क्रिममध्ये काही केमिकल्स वापरली जातात. जर तुमच्या त्वचेला ती सूट होत असतील तर अशा हेअर रिमूव्हल क्रिम वापरणं मुळीच त्रासदायक नाही. मात्र तुम्हाला वॅक्सिंग हाच पर्याय योग्य वाटत असेल तर अंगावरील केस काढण्याचा वॅक्स घरी तयार करण्यासाठी या सोप्या टिप्स वापरा. 

Shutterstock

हेअर रिमूव्हल क्रिम त्वचेसाठी फायदेशीर असतं का -

फार पूर्वी ज्या हेअर रिमूव्हल क्रिम मिळायच्या त्या  खूप चिकट आणि उग्र वास असलेल्या असत ज्यामुळे त्या वापरताना खूप कंटाळा येत असे. पण सध्या  बाजारात उपलब्ध असलेल्या  हेअर रिमूव्हल क्रिम फुलं आणि  फळांच्या सुंगधाने युक्त असतात ज्यामुळे त्या लावल्यावर तुमची त्वचादेखील सुंगधीत होते. त्यामुळे तुम्ही आता बिनधास्त या क्रिम वापरू शकता.

Shutterstock

हेअर रिमूव्हल क्रिममुळे केसांची इनर ग्रोथ वाढते का -

वॅक्सिंग अथवा शेव्हिंग केल्यावर त्वचेखालील केस वेगाने वाढतात. मात्र हेअर रिमूव्हल क्रिम वापरण्याचा हा एक फायदा असतो की यामुळे तुमच्या केसाची इनर ग्रोथ वेगाने होत नाही. हेअर रिमूव्हल क्रिममुळे तुमच्या त्वचेवरील केस निघून जातातच शिवाय त्वचेवरील डेड स्किनही निघून जाते. जर तुम्ही अंगावरील अनावश्यक केस काढण्यासाठी रिका वॅक्स वापरत असाल तर काहीच हरकत नाही. थोडे दिवस वॅक्सिंगला ब्रेक द्या आणि हेअर रिमुव्हल क्रिम वापरा. 

तुमच्यासाठी योग्य हेअर रिमूव्हल क्रिम कशी निवडाल -

खरं तर बाजारात हेअर रिमूव्हल क्रिमचे अनेक प्रकार  आणि ब्रॅंड आहेत. यातून तुमच्यासाठी परफेक्ट हेअर रिमूव्हल क्रिम निवडणं तसं सोपं नाहीच. यासाठी आम्ही देत असलेल्या या टिप्स तुमच्या फायद्याच्या ठरतील.

  • जर तुमची  त्वचा संवेदनशील असेल तर कोरफड, ग्रीन टी असे घटक असलेल्या हेअर रिमूव्हर क्रिम निवडा.
  • जर तुम्हाला तुमच्या चेहरा अथवा बिकिनी अशा नाजूक भागाकडचे  केस नको असतील तर त्यासाठी कोणतंही हेअर रिमूव्हल क्रिम वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट घ्या. शिवाय या भागांवर वापरण्यासाठी खास तयार केलेलंच हेअर रिमूव्हर क्रिम वापरा.
  • केस काढण्यासाठी जेलबेस क्रिम, रोलऑन आणि स्प्रे असे प्रकार ट्राय करा.
  • केस काढण्यापूर्वी पॅकिंगवर दिलेल्या सूचनांचे  नीट पालन करा आणि ते वापरण्यास सुरूवात करा.

यासाठी अशी करा अंगावरील नको असलेले केस काढण्यासाठी बेस्ट क्रिमची निवड.

 

 

Beauty

Vcare Hair Removal Spray Foam

INR 999 AT Vcare

Beauty

WIPEOUT Sanitizing Wipes 25 Wipes Pack

INR 159 AT MyGlamm

फोटोसौजन्य - शटरस्टॉक