ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
आयक्रिम लावताना करू नका या चुका,अन्यथा दिसाल निस्तेज

आयक्रिम लावताना करू नका या चुका,अन्यथा दिसाल निस्तेज

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धती आणि सौंदर्य उत्पादनं वापरत असतो. डोळ्यांंखाली येणारे काळे डाग, पफीनेस ही आता एक कॉमन समस्या झाली आहे. यापासून सुटका मिळण्यासाठी आयक्रिमचा वापर करण्यात येतो. ही गोष्ट एकदम योग्य आहे की त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण मॉईस्चराईजर, सनस्क्रिन आणि आयक्रिम नेहमी वारतो.  पण याचा वापर करताना काळजी घेणंही तितकंच गरजेचे आहे. कोरड्या त्वचेवर कधीही आयक्रिम लाऊ नये. तसंच जास्त वेळा चेहऱ्याला हात लावता कामा नये. आपण बरेचदा ज्या चुका करतो आणि त्या करणं हे आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे तुम्ही जर आयक्रिम लावत असाल तर या चुका  करणं टाळा अन्यथा तुमची त्वच निस्तेज दिसेल. 

आयक्रिमचा जास्त उपयोग

Instagram

गरजेपेक्षा अधिक कोणत्याही गोष्टीचा उपयोग केल्यास, त्याने नुकसानच पोहचते. तुम्हाला डोळ्यांखाली काळे डाग असतील आणि पफीनेस कमी  करण्यासाठी तुम्ही आयक्रिमचा वापर करत असाल तर तुम्ही याचा अति उपयोग करू नये.  अधिकांश व्यक्ती झोपण्यापूर्वी हे क्रिम डोळ्यांखाली लावतात.  पण तुम्ही दिवसभरात अथवा बाहेर जाण्यापूर्वी याचा उपयोग करत असाल तर यामुळे त्वचा चिकट होते. डोळ्यांच्या खाली कमीत कमी प्रमाणात आयक्रिम लावल्यास,  तुम्हाला त्याचा योग्य परिणाम मिळू शकेल. 

ADVERTISEMENT

कोरड्या त्वचेवर आयक्रिम लावणे

कोरड्या त्वचेवर आयक्रिम लावणे ही सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही कोरड्या त्वचेवर आयक्रिम लावल्यास, त्वचेमध्ये अधिक कोरडेपणा आणि खाज येणे अशी समस्या निर्माण होते. आयक्रिम सर्वात चांगले काम तेव्हाच करते जेव्हा तुम्ही मॉईस्चराईजर लाऊन मग त्याचा उपयोग कराल. कधी कधी मॉईस्जराईजरच्या वापराशिवाय आयक्रिम लावणं हे धोकादायक ठरू शकतं. तसंच डोळ्यांच्या एकदम लगत आयक्रिम लाऊ नका. आयक्रिम लावल्यावर चेहऱ्याला बराच काळ हात लावणं टाळायला हवे अन्यथा त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात.

आयक्रिम लावण्याची योग्य पद्धत

Instagram

मॉईस्चराईजर आपल्या त्वचेमध्ये मऊपणा आणिते आणि थंडीच्या  दिवसात आपल्याला याचा नियमित वापर करायला हवा. आयक्रिम लावण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की, तुमचे मॉईस्चराईजर अधिक प्रभावी आहे की  आयक्रिम याची माहिती  करून घ्या.  जर मॉईस्चराईजर अधिक प्रभावी असेल तर तुम्ही त्वचेवर आधी मॉईस्चराईजर लावा. कारण लाईट मॉईस्चराईजर तुमच्या आयक्रिमचा प्रभाव नीट करण्यासाठी फायदेशीर ठरते. जास्त आणि हेल्दी प्रभावी आयक्रिम नेहमी मॉईस्चराईजर नंतरच लावावे.  असं केल्याने त्वचेसंबंधी समस्या होत नाहीत. 

ADVERTISEMENT

आयक्रिम लावण्याची योग्य वेळ

फाईन लाईन्स आणि सुरकुत्या चेहऱ्यावर येण्याची वाट बघण्याची अजिबातच गरज नाही. तुम्ही डोळ्यांची काळजी घेण्यासाठी कधीही आयक्रिमचा वापर करू शकता. पण कोणतेही उत्पादन वापरू नका. जे उत्पादन वापरला त्याचे आधी हातावर परीक्षण करून घ्या.  वयानुसार डोळ्यांखाली काळे डाग येत असतील तर आयक्रिमचा वापर नक्की करा. रात्री झोपण्यापूर्वी याचा वापर करणे अधिक चांगले. 

 

त्वचेवर जास्त काळ आयक्रिम न लावणे

जर तुम्ही आंघोळीपूर्वी आयक्रिम लावले तर त्याचा काहीही फायदा नाही. त्वचेवर जास्त काळ आयक्रिम न लावणे ही चूक आहे. तुम्हाला याचा फायदा हवा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही फेसवॉश लाऊन तोंड धुवा आणि मॉईस्चराईजर लावा आणि  त्यानंतर काही वेळात आयक्रिम लावा. असं केल्याने तुम्हाला परिणााम त्वरीत दिसून  येईल. पण बाहेर जाण्यापूर्वी हे आयक्रिम काढणंही गरजेचे आहे. आयब्रो आणि डोळ्यांच्या अगदी जवळ आयक्रिम लाऊ नये.  कारण यामुळे इन्फेक्शचा धोका असतो. आयक्रिम लावताना या बाबी नक्की लक्षात ठेवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT