ADVERTISEMENT
home / Natural Care
Foods For Glowing Skin In Marathi

त्वचेचा ग्लो वाढवणारे हे पदार्थ नक्की असू द्या आहारात (Foods For Glowing Skin In Marathi)

 

 

सुंदर त्वचा ही आपल्या सगळ्यांनाच हवी असते. या त्वचेसाठी आपण अगदी काहीही करायला तयार असतो. फेशिअल, पार्लर, स्किन ट्रिटमेंट अशा अनेक गोष्टी आपण करतो. पण त्वचेची बाहेरुन जितकी काळजी घेणे गरजेचे असते तितकीच तुम्ही त्वचेची आतून काळजी घेणे गरजेचे असते. त्वचेची काळजी घेत त्वचेला नैसर्गिक ग्लो (Glowing Skin Tips In Marathi)  देण्यासाठी तुमच्या पोटात चांगले पदार्थही जायला हवेत. सहज उपलब्ध होणारे आणि बजेटमध्ये बसणारे अशा अनेक पदार्थांचा आपण आहारात समावेश करु शकतो. या पदार्थांच्या योग्य सेवनामुळे तुमच्या त्वचेला अगदी काहीच कालावधीतच तुमच्या त्वचेला चांगला ग्लो येऊ शकेल. आम्ही तुमच्यासाठी अशा काही पदार्थांची यादी तयार केली आहे. चला जाणून घेऊयात त्वचेचा ग्लो वाढवणारे पदार्थ.

 

 

ADVERTISEMENT

पपई (Papaya)

पपई

Instagram

केशरी रंगाचे हे फळ बाजारात अगदी 12 महिने उपलब्ध असते. बजेटमध्ये बसणारे हे फळ तुम्ही अगदी कधीही खाऊ शकता. पपई हा व्हिटॅमिन C चा भंडार असल्यामुळे पपईचे सगळे फायदे तुमच्या त्वचेला मिळतात. त्वचेचा पोत सुधारणे आणि शरीराला योग्य प्रमाणात फायबर देण्याचे काम पपई करते. पण पपई ही शरीरासाठी चांगली असली तरी देखील पपई ही उष्ण असते. त्यामुळे त्याचे सतत सेवन करुन चालत नाही. कारण त्यामुळे मासिक पाळी लवकर येऊ शकते.

फायदे (Benefits) :

ADVERTISEMENT
  • पपईमध्ये व्हिटॅमिन C आणि फायबर योग्य प्रमाणात असते. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. पोटही साफ होण्यास मदत मिळते.
  • पपईमध्ये असलेले व्हिटॅमिन्स शरीरात तयार होणारे कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही. 
  • हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करते. महिलांना हार्मोन्समुळे होणारा त्रास कमी झाल्यामुळे त्वचेला त्रास होत नाही. 
  • पपईमध्ये असलेले डाएटरी फायबर योग्य कॅलरीज पुरवून तुमचे वजन वाढू देत नाही. वजन नियंत्रणात राहिले की त्वचा ही चांगली राहते.

असे करा सेवन (Proper Way of Consumption) : दिवसातून एक मध्यम आकाराचे पपई खाण्यास काहीच हरकत नाही. पण ते एका बैठकीत खाऊ नका. कारण त्यामुळे शरीरातील उर्जा वाढू शकते.

खरबूज (Musk Melon)

खरबूज

Instagram

कलिंगड या प्रकारातील हे फळ अनेकांच्या आवडीचे आहे. पिवळसर रंगाचे हे फळ बाजारात अनेक नावाने ओळखले जाते. शक्करकंज असे देखील याला म्हणतात. पाणीदार असे हे फळ पोटभरीचे तर आहेच. पण त्वचेसाठीही फारच फायदेशीर आहे.  यामध्ये असलेले एडिनोसिन रक्त शुद्धीकरणाचे काम करते. अनेकदा रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया बिघडली की, चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पण अँटीऑक्सिडंटनी भरपूर असलेल्या या फळाचे सेवन केल्याने त्वचेला अनेक फायदे मिळतात.

ADVERTISEMENT

  फायदे (Benefits) :

  • खरबूजमध्ये असलेले मिनरल्स अॅसिडीटी कमी करण्याचे काम करतात आणि पचनशक्ती चांगली करतात. पचनशक्ती चांगली असेल तर पोटाचे आरोग्य चांगले राहते. 
  • खरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. ज्याच्या सेवनामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचा अधिक ग्लो करु लागते.
  • व्हिटॅमिन्स C त्वचा वयस्क दिसणारे घटक कमी करतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. त्वचा अधिक चांगली दिसते.
  • मूत्राशयासंदर्भात असणाऱ्या तक्रारीही यामुळे कमी होतात.

असे करा सेवन (Proper Way of Consumption): खरबूज फार वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जाते. तुम्ही त्याची स्मुदी किंवा त्यामध्ये फक्त साखर घालून त्याचा आनंद घेऊ शकता. 

अंडी (Eggs)

अंडी

Instagram

ADVERTISEMENT

‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ असे उगागच म्हणत नाही. आहारात अंड्याा समावेश असणे हे प्रत्येकासाठी फायदेशीर असते. पण शरीराला प्रोटीन पुरवण्याचे काम अंडी करते. अंड्याच्या सेवनामुळे तुमच्या त्वचेला आवश्यक असलेले घटकही योग्य प्रमाणात मिळतात. अंड्यामध्ये कॅल्शियमचा भरपूर साठा असतो. त्यामुळे तुमच्या हाडांना बळकटी मिळते. 

फायदे (Benefits) :

  • उकडलेले एक अंड जरी आहारात असेल तरी देखील त्यातून आपल्याला भरपूर प्रथिनं मिळतात. अंड्यामधील प्रोटीन्समुळे तुमची त्वचा तजेलदार दिसते. 
  • अंड्यामध्ये कॅल्शिअम असते ज्यामुळे हाडं मजबूत होतात. 
  • डोळ्यांसाठीही अंडे फारच फायदेशीर आहे. दृष्टी सुधारण्यासही अंडी ही फार फायदेशीर आहेत. 

असे करा सेवन (Proper Way of Consumption) : अंडी ही कायम उकडून खाल्लेली चांगली असतात. ज्यांना कोलेस्ट्रॉल किंवा हार्टशी संबंधित काही त्रास असेल तर तुम्ही अंड्याचा पांढरा बलक मुळीच खाऊ नका.

सूर्यफुलाचे तेल (Sunflower Oil)

सूर्यफुलाचे तेल

ADVERTISEMENT

Instagram

सुंदर असे सूर्यफुल फारच फायदेशीर आहे. सूर्यफुलांच्या बियाची चवीला आणि आहारासाठी फारच चांगल्या असतात. सूर्यफुलांपासून तयार करण्यात आलेले तेल अनेकांच्या आहारात असते. आहारात याचा समावेश केल्यामुळे अनेक फायदे मिळतात. केस आणि त्वचेसाठी सूर्यफुल हे फारच फायद्याचे असते. व्हिटॅमिन E आणि ओमेगा फॅटी असते. जे अनेक गोष्टींसाठी फायदेशीर आहे.

फायदे (Benefits) : 

  • सूर्यफुलाच्या तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन E आणि ओमेगा फॅटी अॅसिड शरीरासाठी, त्वचेसाठी फारच चांगले असते.
  • तुमची डॅमेज झालेली त्वचा दुरुस्त करण्याचे काम हे तेल करते. 
  • त्वचेवर तयार होणाऱ्या अॅक्ने (Acne) बॅक्टेरीया कमी करण्याचे काम हे तेल करते. त्यामुळे पोअर्समध्ये साचलेल्या धूळीचा त्रास होत नाही. 
  • सूर्यफुलाचे तेल हे उत्तम मॉश्चरायझर म्हणून काम करते. त्यामुळे तुम्ही याचा वापर थंडीत करु शकता. 

असे करा सेवन (Proper Way of Consumption) : सूर्यफुलाचे तेल तुम्ही आहारात समाविष्ट करु शकता. एखाद्या सॅलेडचे ड्रेसिंग म्हणूनही तुम्हाला याचा वापर करता येतो किंवा तुम्ही चेहऱ्याला ते थेटही लावू शकता. 

ADVERTISEMENT

अवाकाडो (Avocados)

अवाकाडो

Instagram

सध्याच्या ट्रेंडनुसार अवाकाडो हे अनेकांच्या आहाराचा भाग आहे. अवाकाडोला स्व:तची अशी चव नसते. पण यापासून अनेक ड्रेसिंग आणि सलाद बनवले जातात. अवाकाडो सध्या आपल्या देशात सहज उपलब्ध असून त्याचा रंग छान हिरवागार असतो. अवाकाडोमध्ये एंटी एजिंग गुणधर्म असतात जे त्वचेसाठी फारच फायदेशीर असतात.

फायदे (Benefits) :

ADVERTISEMENT
  • अवाकाडोमध्ये असलेले अँटीएजिंग गुणधर्म तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात. 
  • त्वचेला तजेला देत त्याची इलास्टिसिटी वाढवण्यास मदत करतात. 
  • अवाकाडोमध्ये असलेले घटक तुमच्या त्वचेमध्ये असलेले कोलॅजन बुस्ट करण्याचे काम करते. 
  • जखम भरण्यासाठीही अवाकाडो तेल उत्तम असते. त्यामुळे तुम्ही त्याचा समावेश करायला हवा. 

असे करा सेवन (Proper Way of Consumption):

छान पिकलेलं अवाकाडो घेऊन तुम्ही ते स्मॅश करा. त्यामध्ये ड्रेसिंगचे सगळे घटक घालून ब्रेड स्लाईसवर घालून खाऊ शकता.

पालक (Spinach)

पालक

Instagram

ADVERTISEMENT

हिरवागार पालक अनेकांच्या जेवणात असतोच. पालक हा अनेकांना आवडत नसला तरी त्यापासून तयार केलेले पालक पनीर अनेकांच्या आवडीचे असते. हिरव्या पालेभाजीमध्ये मोडणारा हा प्रकार फारच फायदेशीर आहे. कॅल्शिअमचा पुरेपूर साठा असलेल्या या पालकाचा फायदा त्वचेवरील तजेला कायम ठेवण्यासाठी होतो. पालकाच्या सेवनामुळे त्वचा चांगली राहते. या भाजीचा आहारात समावेश करतानाच पालकाचे साईडईफेक्ट्सही जाणून घेतले पाहिजेत.

फायदे (Benefits) :

  • पालकामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. जे तुमचे नख, दात, डोळे यांचे आरोग्य उत्तम ठेवते. 
  • पालकामध्ये असलेले मिनरल्स शरीराची उष्णता कमी करुन शरीर शांत ठेवण्याचे काम करते. त्यामुळे उष्णतेमुळे चेहऱ्यावर उमटणाऱ्या समस्या होत नाहीत. 
  • पालकामध्ये असलेले C, B हे जीवनसत्व त्वचेवरील तजेला कायम ठेवण्यास मदत करते. 

असे करा सेवन (Proper Way of Consumption) : पालकाची भाजी अथवा त्याचे जास्त फायदे मिळवण्यासाठी तुम्ही पालकाचा रस प्यायला तरी चालेल.

ग्रीन टी (Green Tea)

ग्रीन टी

ADVERTISEMENT

Instagram

वजन कमी करण्यापासून ते त्वचेला ग्लो देण्यापर्यंत ग्रीन टीचे अनेक फायदे आहेत. पण त्वचेला ग्लो हवा असेल तर चहा-कॉफी सोडून ग्रीन टीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ग्रीन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट शरीरातून दूषित पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात आणि त्वचेवर तजेला आणण्याचे काम करतात. फार काळापासून औषधी अशा ग्रीन टीचा उपयोग केला जातो. त्याच्या सेवनासोबतच त्याचा उपयोग अनेक ब्युटी प्रोडक्टसमध्ये करतात. वेगवेगळ्या हर्ब्सचा यामध्ये समावेश केला जातो. 

फायदे (Benefits) :

  • ग्रीन टीमध्ये अँटी – ऑक्सिडंट असतात जे त्वचेला तजेला देण्याचे काम करतात. 
  • ग्रीन टीच्या सेवनामुळे काळवंडलेली त्वचा सुधारते.
  • ग्रीन टीच्या सेवनामुळे पोटाचे विकार कमी होतात. पोटाचे आरोग्य सुधारले की, त्वचेच्या समस्या कमी होतात. 

असे करा सेवन (Proper Way of Consumption) : हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रीन टी मिळतात. तुम्ही ग्रीन टी गरम पाण्यात घेऊ शकता. ग्रीन टी पिऊन झाल्यावर उरलेला चोथा चेहऱ्याला लावू शकता. 

ADVERTISEMENT

मासे (Fish)

मासे

Instagram

मासे खाणाऱ्यांची त्वचा तुम्ही नीट निरखून पाहिली तर त्यांची त्वचा नेहमीच तुकतुकीत दिसते. खास त्वचेसाठी फिश ऑईलचे घटक असलेले अनेक पदार्थ बाजारात मिळतात. पण प्रत्यक्ष मासे खाल्ल्यामुळे याचे अधिक फायदे तुम्हाला मिळतात. त्वचेचा पोत सुधारणे, त्वचा तजेलदार ठेवणे, अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण असे मासे खाण्याचे फायदे आहेत  

फायदे (Benefits) :

ADVERTISEMENT
  • त्वचेसाठी व्हिटॅमिन C हा महत्वाचा घटक आहे. माशांमध्ये व्हिटॅमिन C नसले तरी देखील त्यांच्या अंड्यामध्ये असते.
  • माशांमध्ये असलेले तेल हे एकप्रकारचे सनस्क्रिन आहे. जे तुमचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते. 
  • त्वचा कोरडी पडणे , पिंपल्स येणे या त्वचेच्या तक्रारी दूर करण्याचे कामही मासे करतात.
  • फिश ऑईलमधील व्हिटॅमिन E आणि फॅटी अॅसिड त्वचेला आवश्यक असलेला तजेला देते. 

असे करा सेवन (Proper Way of Consumption) : मासे कमीत कमी तेलात फ्राय, बेक्ड किंवा कढीतून शिजवून खावे. त्यामुळे ते अधिक रुचकर लागतात. आठवड्यातून किमान एक दिवस तरी याचे सेवन करावे.

नारळाचे पाणी (Coconut Water)

नारळाचे पाणी

Instagram

श्रीफळ म्हणून ज्याला मान आहे अशा नारळाचे पाणीही त्वचेसाठी फारच उपयुक्त असते. नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्वचेसाठीच नाही तर आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर करण्याचे काम नारळाचे पाणी करते. नारळाचे पाणी त्वचेसाठी वरदान आहे. म्हणूनच त्वचेच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी नारळपाण्याचा सल्ला दिला जातो.

ADVERTISEMENT

फायदे (Benefits) :

  • नारळाच्या पाणी हे डिटॉक्स करण्याचे काम करते. शरीरातून विषारी द्रव्य बाहेर काढण्याचे काम नारळाचे पाणी करते.
  • नारळाच्या पाण्यामधील घटक पचनाचे कार्य सुधारते. आणि पोटाच्या विकारांना दूर ठेवते. 
  • त्वचा एकसमान ठेवण्यासाठी आणि त्याचा PH राखण्यासाठीही नारळपाणी मदत करते.
  • नारळपाण्याच्या सेवनामुळे त्वचेवरील पिंपल्सचे डाग, व्रण कमी होण्यास मदत मिळते. 

असे करा सेवन (Proper Way of Consumption) : नारळाचे पाणी योग्यवेळी पिणेही गरजेचे असते. तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी या दोन वेळांमध्ये नारळपाणी प्या. उपाशीपोटी नारळपाणी शक्यतो पिऊ नका.

ओट्स (Oats)

ओट्स

Instagram

ADVERTISEMENT

ओट्स हा हल्ली अनेकांच्या आहारामध्ये समाविष्ट असलेला प्रकार आहे.पोटभरीचा आणि उत्तम फायबर पुरवणारा नाश्ता म्हणून ओट्सची ओळख आहे. ओट्सच्या सेवनामुळे शरीरात अनेक चांगले घटक जातात. ज्याचा फायदा तुमच्या त्वचेला देखील होतो. ओट्सच्या सेवनामुळे आणि वापरामुळे त्वचा चमकदार आणि तजेलदार बनते.

फायदे (Benefits) :

  • ओट्समध्ये भरपूर फायबर असतात. त्यामुळे पोट भरतेही आणि पचनही चांगले होते. 
  • ओट्सच्या नित्यसेवनामुळे त्वचेला तजेला मिळतो. त्वचा हायड्रेटेड दिसते.
  • आहारात ओट्सचा समावेश असेल तर त्वचा नितळ दिसू लागते. 

असे करा सेवन (Proper Way of Consumption) : हल्ली ओट्सचे अनेक प्रकार मिळतात. तुम्ही नाश्तामध्ये अथवा जेवणातही मसाला ओट्स बनवून खाऊ शकता. या शिवाय ओट्सचे मास्क तयार करुन ही त्वचेवर इन्स्टंट ग्लो आणू शकता. 

बदाम (Almonds)

बदाम

ADVERTISEMENT

Instagram

ड्रायफ्रुटमधील बदाम हा प्रकार आपल्याकडे अगदी सर्रास उपलब्ध असतो. बदामाचे आरोग्याशी निगडीत अनेक फायदे आहेत त्वचेसाठीही बदामाचे सेवन फारच फायदेशीर ठरते. बदामामध्ये अनेक अँटी – ऑक्सिडंट गुणधर्म त्वचेसाठी अनेक दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. 

फायदे (Benefits) :

  • बदामामध्ये अनेक अँटी – ऑक्सिडंट घटक असतात. जे त्वचेवरील सुरकुत्या आणि एजिंगच्या खुणा कमी करण्याचे काम करते. 
  • बदामामध्ये फायबर असतात. जे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ देत नाही. पोट स्वच्छ राहिले तर त्वचाही सुंदर राहण्यास मदत मिळते. 
  • बदामामध्ये स्निग्ध असतात ज्यामुळे त्वचेला आवश्यक असलेले तेल मिळते. त्यामुळे त्वचा टवटवीत दिसते.

असे करा सेवन (Proper Way of Consumption) : बदाम तुम्ही अगदी असेही खाऊ शकता. पण बदाम भिजवून खाण्याचे फायदे अनेक आहेत. दररोज किमान दोन तरी भिजवलेले बदाम खावेत. 

ADVERTISEMENT

अक्रोड (Walnuts)

अक्रोड

Instagram

मेंदूच्या आकाराप्रमाणे असणारे हा ड्रायफ्रुटचा प्रकार. एका टणक कवचात असतो. ते फोडून अक्रोड काढले जाते. अक्रोडला ‘ब्रेन फुड’ असेही म्हटले जाते. अक्रोडच्या सेवनामुळे त्वचा स्वच्छ राहते. अनेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये अक्रोडचा समावेश केला जातो. अक्रोडचा उपयोग उत्तम स्क्रब म्हणूनही केला जातो. 

फायदे (Benefits) :

ADVERTISEMENT
  • अक्रोडमध्ये ओमेगा 3 नावाचे फॅटी अॅसिड असते जे त्वचेसाठी फारच उपयुक्त असते. 
  • अक्रोडमधील व्हिटॅमिन E त्वचेची इलास्टिसिटी वाढवतात. त्वचेला ग्लो आणण्यास मदत करतात. 
  • अक्रोडमधील प्रोटीन त्वचेला अधिक काळासाठी चांगले ठेवण्याचे काम करते. 
  • अक्रोडमुळे उत्तम झोप लागते आणि तणावही कमी होतो. त्यामुळेही त्वचा रिलॅक्स होते आणि उत्तम दिसते. 

असे करा सेवन (Proper Way of Consumption) : अक्रोडचे लाडू, सुके अक्रोड आणि भिजवलेले अक्रोड असे कशाही पद्धतीने तुम्ही त्याचे सेवन करु शकता. पण दिवसातून तुम्ही केवळ दोनच अक्रोड खाणे केव्हाही चांगले. 

आळशी (Flaxseeds)

आळशी

Instagram

आळशी हा वेगवेगळ्या पद्धतीने आपण आहारात घेत असतो. लाडवांमध्ये तर अगदी हमखास आळशी घातली जाते. चॉकलेटी रंगाच्या या चकचकीत बिया नुसत्याही खाल्ल्या जातात. आळशीची पूड करुन ती देखील बडिशेपेप्रमाणे खाल्ली जाते. त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. पण यासोबतच त्वचा खुलवण्यासही आळशी उपयोगी ठरते.

ADVERTISEMENT

फायदे (Benefits) :

  • आळशीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म असल्यामुळे आळशी ही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. 
  • अँटिऑक्सिडंट्स गुणांनी त्वचेमध्ये कोलेजन प्रॉडक्शन आणि नव्या पेशींचं निर्माण होत असतं. यामुळे त्वचाही निरोगी राहाते .
  • वाढत्या वयावरही त्याचा परिणाम होत नाही. तुमची त्वचा तशीच चमकदार राहाते. 

असे करा सेवन (Proper Way of Consumption) : तुमच्या रोजच्या आहारात किमान 1 ते 2 चमचे आळशीचा नक्की समावेश करून घ्या

सोयाबीन (Soyabean)

सोयाबीन

Instagram

ADVERTISEMENT

सोयाबीनच्या बिया आणि उरलेला चोथा अर्थात सोयाबीन चंक्स हे देखील आरोग्यासाठी फारच फायदेशीर असतात. सोयाबीनमध्ये असलेले तेल आणि इतर आवश्यक घटक त्वचेला ग्लो देण्याचे घटक असतात. हाय प्रोटीननी भरलेल्या या सोयाबीनचा आहारात समावेश केल्याने खूप फायदे होतात. 

फायदे (Benefits) :

  • सोयाबीनच्या सेवनामुळेत्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
  • सोयाबीनच्या सेवनामुळे शरीरात अॅस्ट्रोजनची निर्मिती होते जी त्वचेवरील वार्धक्याच्या खुणा कमी करते.
  • शरीरातील अनावश्यक तेल कमी करुन पिंपल्ससाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांना कमी करते.  

असे करा सेवन (Proper Way of Consumption) : सोयाबीन गव्हाच्या पिठात दळताना घालू शकता. सोया चंक्स नुसते उकडून, थोडे भाजून अगदी आरामात खाऊ शकता. 

रताळी (Sweet Potatoes)

रताळी

ADVERTISEMENT

Instagram

एक गोड कंदमुळ आणि उपवासासाठीचा उत्तम पोषक आहार म्हणून रताळे खाल्ले जाते. पण त्वचेसाठीही रताळे फारच चांगले आहे. उत्तम फायबरचे घटक असलेली ही रताळी तुमच्या आरोग्यासाठीही उत्तम आहेत. 

फायदे (Benefits) :

  • रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमच्या शरीरातून अनावश्यक घटक बाहेर काढण्यास मदत होते. 
  • रताळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन E डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते. 
  • रताळ्यामध्ये व्हिटॅमिन C असते. जे त्वचेसाठी फारच फायदेशीर असते. 
  • उकडलेले रताळे नियमित खाल्ले तर त्यामुळे त्वचा उजळवण्यास मदत होते. 

असे करा सेवन (Proper Way of Consumption) : रताळे हे नेहमी उकडून किंवा भाजून खाल्ले जाते. ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी तुम्ही रताळ्याचा आहारात समावेश करा. 

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. फळांमुळे तुमच्या त्वचेवर ग्लो येऊ शकतो का ?

फळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. फायबरचा भरपूर साठा असलेली ही फळं. शरीराला आवश्यक असलेले पाणी देतात. शरीरात पाणी योग्य प्रमाणात असेल तर त्वचा हायड्रेट राहण्यास मदत करते. फळांच्या योग्य सेवनामुळे पोटातील अगदी सहजपणे बाहेर पडण्यास मदत मिळते. पोटाचा कोठा साफ राहिला की, त्वचा आपसुकच चांगली दिसते.

2. चेहऱ्याला ग्लो देणाऱ्या फळांचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो ? 

फळांमध्ये फायबरच आणि व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असते. जर तुम्ही फायबर योग्य प्रमणात घेतले तर पोट साफ राहण्यास मदत होते. फळांमुळे तुमचे पोट भरलेले राहते. पोट भरलेले असेल तर तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टी खाण्याची इच्छा होत नाही.त्यामुळे तुम्ही जर वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल किंवा डाएटवर असाल तर तुम्ही फळांचे सेवन करु शकता त्यामुळे तुमचे शरीर हलके राहील आणि पोट भरलेले राहील.

3. चांगल्या पदार्थांच्या सेवनामुळे तुमची स्किनटोन सुधारते का ? 

स्किनटोन सुधारण्यापेक्षाही त्वचेच्या समस्या दूर करण्याचे काम फळं करतात. त्यामुळे आपोआपच तुमची त्वचा सुधारते. त्वचेचा पोत सुधारल्यामुळे तुमची त्वचा चांगली दिसू लागते. त्वचा ग्लो करु लागते. त्वचेसाठी तुम्ही तुमच्या आहारात नेहमीच चांगल्या पदार्थांचा समाेवेश करणे गरजेचे आहे. 

04 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT