ADVERTISEMENT
home / Diet
किवी खाणं उत्तम आहेसकाळी उठल्यावर सतत पित्ताचा त्रास होत असेल तर उपाशीपोटी खा ही फळं

किवी खाणं उत्तम आहेसकाळी उठल्यावर सतत पित्ताचा त्रास होत असेल तर उपाशीपोटी खा ही फळं

उपाशीपोटी काय खावं आणि काय खाऊ नये याबाबत जर तुम्हाला शंका असतील तर ही माहिती तुमच्या  नक्कीच उपयोगाची आहे. कारण ही सात फळं उपाशीपोटी खाण्यामुळे तुमचा पित्ताचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी योग्य आणि पोषक आहार महत्त्वाचा असतो. आहारामध्ये फळांचं असलेलं स्थान तर सर्वांना माहीतच असेल. असं म्हणतात की, दिवसाची सुरूवात योग्य आहाराने व्हावी यासाठी सकाळी नाश्त्यामध्ये उपाशीपोटी फळे खाणं तुमच्या फायद्याचं ठरू शकेल. जर तुम्हाला सतत पित्ताचा त्रास होत असेल तर खाली सांगितलेली ही फळं उपाशीपोटी नाश्त्याआधी खाण्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. 

सकाळच्या नाश्त्यामध्ये या फळांचा करा समावेश –

सकाळी उठल्याबरोबर तुम्ही काय खाता हे खूप महत्त्वाचे आहे. सकाळी नाश्ता करताना चहा, कॉफीने सुरूवात करण्याऐवजी उपाशीपोटी जर तुम्ही फळं खाल्ली तर तुमचा पित्ताचा त्रास कमी होईल आणि तुम्हाला दिवसभर टवटवीत वाटेल.

केळं –

एका केळ्यामधू व्हिटॅमिन बी 6, कार्बोहायड्रेट, फॉलेट. पोटॅशियम आणि भरपूर फायबर्स शरीराला मिळू शकतात. शिवाय केळं हे सर्वसामान्यांना परवडणारे फळ आहे. म्हणूनच सर्वांनी नियमित सकाळी उठल्याबरोबर एक केळं अवश्य खावं. असं केल्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि केळ्यातील फायबर्समुळे तुमचे पोट आणि शरीर स्वच्छ होते. शरीर डिटॉक्स करण्याचा आणि पोटाच्या समस्या कमी करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

कलिंगड –

लाल आणि हिरव्या रंगाच्या आकर्षक कॉम्बिनेशनमुळे कलिंगड नेहमीच सर्वांना आकर्षित करून घेतं. उन्हाळ्यात तर तहान भागवण्यासाठी या रसदार फळाचा मनसोक्त आस्वाद घेतला जातो. कलिंगडामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई  आणि पुरेसे फायबर्स असतात. त्यामुळे कलिंगड खाणं आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप गरजेचं आहे. यासाठीच सकाळच्या नाश्त्यामध्ये कलिंगडाच्या फोडी आणि रसाचा समावेश जरूर करा. कलिंगड तुमच्या  डोळ्यांसाठी आणि ह्रदयासाठी नक्कीच पोषक आहे. सकाळी तुमच्या पोटामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते अशावेळी असं रसदार फळ खाण्यामुळे तुम्हाला पटकन फ्रेश वाटतं.

ADVERTISEMENT

Shutterstock

किवी –

किवी तुमच्या नाश्त्यात असण्यामागचं महत्त्वाचं कारण असं की, यात भरपूर पोषक घटक असतात. आंबट आणि गोड चव असण्यामुळे तुम्हाला ते खायला नक्कीच आवडेल. किवीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. सकाळचा नाश्ता पोषक करण्यासाठी उपाशीपोटी किवी खाणं उत्तम आहे. कारण त्यामुळे तुमचे शरीर योग्य प्रकारे डिटॉक्स होते आणि तुमच्या शरीराचे योग्य पोषणदेखील करते.

पपई –

पपईत कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतात. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते. शिवाय यामध्ये पचन करणारे घटक असतात. त्यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते. जर तुम्हाला नियमित अॅसिडिटी अथवा पित्ताचा त्रास होत असेल तर पपई खा ज्यामुळे पोटाच्या समस्या नक्कीच कमी होतील. पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि एदेखील असते ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होऊ शकते.

ADVERTISEMENT

Shutterstock

डाळिंब –

सकाळी उठल्यावर इतर कोणताही पदार्थ न  खाता डाळिंब खाण्यामुळे तुम्हाला  नक्कीच फ्रेश वाटू शकतं. डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट आणि औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या पचनाच्या समस्या नक्कीच कमी होऊ शकतात. भारतात जुलाबावर डाळिंबाची सुकवलेली साल उगाळून देण्याची पद्धत आहे. जर तुम्हाला तुमची पचनसंस्था सुधारायची असेल तर सकाळी एका डाळिंबाचे दाणे नियमित खाणं तुमच्या फायद्याचं ठरेल.

प्लम –

जर तुम्हाला तुमचं  शरीर योग्य प्रकारे डिटॉक्स करायचं असेल तर सकाळी उठल्याबरोबर कमीत कमी आठ ते दहा प्लम खाणं आवश्यक आहे. कारण या फळामुळे तुमचं पोट स्वच्छ होतं आणि पोटावरील चरबीदेखील कमी होते. ज्यांना रक्तदाबाच्या समस्या आहेत किंवा ह्रदय समस्या आहेत अशा लोकांनी प्लम अवश्य खावं. प्लम खाण्यामुळे तुमच्या यकृताचे कार्यही सुरळीत राहण्यास मदत होते. 

ADVERTISEMENT

ब्लु बेरी –

ब्लुबेरी खाणं हा शरीर निरोगी ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. कारण यामध्ये तुमची चयापचय प्रक्रिया सुधारते, रक्तदाबाची समस्या कमी होते. जर रिकाम्या पोटी ब्लु बेरी खाल्ली तर तुमची स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये ब्लु बेरी असेल याची काळजी घ्या.

Shutterstock

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

फळं स्वच्छ करण्याची ही पद्धत आहे सगळ्यात सोपी

हेल्दी लाईफसाठी प्या हे व्हेजीटेबल ज्युस (Vegetable Juice Recipes In Marathi)

उच्च रक्तदाबाच्या लोकांसाठी संतुलित आहार (High Blood Pressure Diet In Marathi)

ADVERTISEMENT
10 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT