ADVERTISEMENT
home / Hair Cuts
पातळ केसांसाठी कोणता हेअरकट आहे बेस्ट, जाणून घ्या स्टायलिंग टिप्स

पातळ केसांसाठी कोणता हेअरकट आहे बेस्ट, जाणून घ्या स्टायलिंग टिप्स

हेअर कट नेहमी सावधपणे आणि विचारपूर्वक करायला हवा. ज्यामुळे तुमचा लुक नक्कीच परफेक्ट आणि तुमच्या चेहरा, व्यक्तिमत्वाला साजेसा दिसेल.  हेअर कट मुलींच्या व्यक्तिमत्वामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. जर हेअर कट चांगला असेल तर जसे तुमचे व्यक्तिमत्व खुलून दिसते तसेच एखाद्या हेअरकटमुळे तुमचा लुक बिघडूदेखील शकतो. हेअर कटमुळे तुमच्या चेहऱ्यामधील फिचर्स हायलाईट होतात आणि तुमचे सौंदर्य अधिक वाढते. यासाठीच जर तुमचे केस पातळ असतील तर तुम्ही कसा हेअरकट करायला हवा हे तुम्हाला माहीत असायला हवं.

हेअर स्टायलिस्टचा सल्ला घ्या –

आजकाल कोणत्याही सलॉनमध्ये गेल्यावर तुमच्या केसांचा प्रकार, रंग, पोत पाहुन तुम्हाला योग्य त्या हेअर कटचा सल्ला दिला जातो. तुमच्या चेहऱ्यावर कोणता हेअर कट चांगला दिसेल हे अॅपद्वारे तुम्हाला आधी दाखवण्यात येतं. यासाठीच हेअर कट करण्याआधी हेअर स्टायलिस्टसोबत याविषयी चर्चा करा आणि त्यानुसारच तुमचा हेअर कट करून घ्या. पातळ केसांसाठी कोणता हेअरकट योग्य हे हेअर स्टायलिस्ट तुम्हाला योग्य पद्धतीने सांगू शकतो. कारण जरी तुमचे केस पातळ असले तरी ते कोणत्या प्रकारचे आहेत यावर केसांची स्टाईल ठरत असते.

Instagram

ADVERTISEMENT

हेअर कलर तुमच्या स्किन टोनसाठी योग्य आहे का ते तपासा –

हेअर कट आकर्षक करण्यासाठी बऱ्याचदा तुम्हाला हेअर कलर करण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्ही हेअर कट नंतर हेअर कलर करणार असाल तर तो कलर तुमच्या स्किन टोनला मॅच होत आहे का हे आधीच तपासा. शिवाय कलर करण्यापू्वी एक पॅच टेस्ट करून घ्या. ज्यामुळे तो कलर तुम्हाला सूट होत आहे का हे तुम्हाला समजू शकेल. जर एखादा हेअर कलर तुमच्या केसांना सूट झाला नाही तर त्यामुळे तुमचे केस खराब होऊन जास्त पातळ दिसू लागतील.  भारतीय स्किन टोनवर लाल, बर्गंडी आणि कॉपर रेड कलर खुलून दिसतात.

केस नियमित ट्रिम करा –

जर तुमचे केस खूप पातळ असतील तर ते वेळच्या वेळी कापणं खूप गरजेचं आहे. कारण सतत केस ट्रिम केल्यामुळे तुमचे केस जाड आणि घनदाट दिसू शकतात. तीन अथवा सहा महिन्यातून एकदा केस ट्रिम करणं  गरजेचं आहे. यामुळे तुमच्या केसांना फाटे फुटत नाहीत आणि केसांची वाढ चांगली होते.

Instagram

ADVERTISEMENT

केसांचा व्हॉल्युम वाढलेला दिसेल असा निवडा हेअर कट –

जर तुमचे केस फारच पातळ आणि कमी व्हॉल्युमचे असतील तर लेझर कटसारखे हेअर कट करू नका. कारण यामुळे तुमचे आणखी पातळ दिसतील. त्याऐवजी लेअर कट करा ज्यामुळे तुमचे केस जास्त व्हॉल्युम असलेले आणि घनदाट दिसतील.

केसांना सतत ब्लो ड्राय करणे टाळा-

हेअर कट केल्यावर केसांना व्हॉल्युम देण्यासाठी अथवा सेट करण्यासाठी ब्लो ड्राय केलं जातं. मात्र यामुळे तुमचे केस जास्त खराब होऊ शकतात. म्हणूनच केसांची निगा राखण्यासाठी शक्य असल्यास केसांना ब्लो ड्राय करणे टाळा. 

 

ADVERTISEMENT

Shutterstock

या हेअरकट टिप्स तुम्हाला  कशा वाटल्या आणि त्यामुळे तुमच्या लुकमध्ये काय बदल झाला हे आम्हाला अवश्य कळवा. त्याचप्रमाणे मायग्लॅमच्या ग्रेट ग्लॅम सर्व्हेमध्ये भाग घ्या आणि मिळवा मायग्लॅमकडून एक फ्री लिपस्टिक आणि आकर्षक बक्षीस.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक आणि इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

केसांना कापूर तेल लावण्याचे हे आहेत फायदे, हेअर केअर मध्ये करा समावेश

हेअर ड्रायर खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

घरी स्वतःच तयार करा तुमच्या केसांसाठी कंडिशनर (Homemade Hair Conditioner In Marathi)

06 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT