चेहऱ्यावरील जुने व्रण आणि जखमांचे डाग दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

चेहऱ्यावरील जुने व्रण आणि जखमांचे डाग दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

लहानपणी खेळताना अथवा धडपडल्यावर झालेल्या जखमांचे डाग कायम राहतात. असे डाग जर तुमच्या चेहऱ्यावर असतील तर त्यांना झाकून टाकणं महाकठीण काम असू शकतं. बऱ्याच जणांना वाटतं की असे जुने  डाग, व्रण कधीच कमी होणार नाहीत मात्र असं मुळीच नाही. कारण आम्ही तुम्हाला  असे काही घरगुती उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील जुनाट डाग नक्कीच कमी होतील.

नारळाचे तेल -

त्वचेच्या कोणत्याही समस्येला दूर करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे त्वचेवर नारळाचे तेल लावणे. तुम्हाला कदाचित खोटं वाटेल पण नारळाचे तेल लावण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील कोणताही डाग कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. 

काय कराल -

एका भांड्यात दोन ते तीन चमचे नारळाचे तेल घ्या. तेल थोडं कोमट करून जखमेमुळे निर्माण झालेल्या डागावर लावा. दहा मिनीटे त्या भागावर तेलाने चांगलं मसाज करा. तेल त्वचेमध्ये चांगलं मुरू द्या. दररोज रात्री झोपताना आणि शक्य असल्यास सकाळी उठल्यावर हा उपाय करा. 

Shutterstock

कोरफड -

कोरफडाच्या गरामध्येही त्वचेच्या समस्या कमी करणारे गुणधर्म असतात. कोरफडामध्ये त्वचा स्वच्छ करणारे तसेच त्वचेचा दाह कमी करणारे गुणधर्म असतात.

काय कराल -

कोरफडाचा गर काढून घ्या. गर एकजीव करून त्याची छान पेस्ट तयार करा. त्वचेवर हा गर लावा आणि सुकल्यावर थंड पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून तीन ते चार वेळा हा उपाय करा.

व्हिटॅमिन ई -

व्हिटॅमिन ई तुमच्या त्वचेसाठी खूप उपयुक्त असते. बाजारात व्हिटॅमिन ईच्या कॅप्सुल्स मिळतात. या कॅप्सुल्स फोडून त्याचे तेल जखमेवर लावा. तुमचा डाग अथवा व्रण किती गडद आहे अथवा किती मोठा आहे यावर तुम्हाला किती कॅप्सुल्स लागणार हे ठरवावे लागेल.

काय कराल -

व्हिटॅमिन ई ची एक कॅप्सुल घ्या आणि ती फोडून त्वचेवर लावा. व्हिटॅमिन ईयुक्त तेलाने त्वचेवर चांगले मालिश करा. हे तेल तुमच्या त्वचेसाठी उपयुक्त असल्याने जखमे व्यतिरिक्त कोणत्याही भागावर तुम्ही ते लावू शकता.

Shutterstock

लिंबाचा रस -

लिंबामध्ये क्लिंझिंग करणारे गुणधर्म असल्यामुळे लिंबाचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील जुनाट डाग कमी करू शकता.

काय कराल -

एका लिंबाचा रस घ्या. कापसाच्या मदतीने लिंबाचा रस चेहऱ्यावरील डागावर लावा. डागावर लिंबाचा रस सुकेपर्यंत ठेवून द्या. सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. चांगला परिणाम हवा असेल तर दिवसातून दोनदा हा प्रयोग चेहऱ्यावर करा. 

बटाट्याचा रस -

बटाट्यामध्ये त्वचा स्वच्छ करणारे घटक असतात. ज्यामुळे त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी बटाट्याचा रस वापरला जातो.

काय कराल -

बटाट्याचा काप चिरून घ्या. डाग असलेल्या भागावर तो हळूवार पणे चोळा. बटाट्याचा रस तुमच्या त्वचेवर कमीत कमी वीस मिनीटे ठेवा. दिवसभरात एक चते दोनवेळा असं केल्याने चांगला परिणाम दिसू लागेल. 

बेकिंग सोडा -

बेकिंग सोडा त्वचेसाठी उपयुक्त असतोच शिवाय त्यामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छदेखील होते.

काय कराल -

दोन चमचे पाणी आणि दोन चमचे बेकिंग सोडा मिसळून एक चांगली पेस्ट तयार करा. जखमेच्या व्रणावर ही पेस्ट लावा. वीस मिनीटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. आठवड्यातून कमीत कमी  एकदा अथवा दोनदा हा उपाय करा. 

Beauty

WIPEOUT Germ Killing Face Wash

INR 119 AT MyGlamm