घरी बनवा वॉलनट स्क्रब आणि मिळवा दिवाळीसाठी उजळ त्वचा

घरी बनवा वॉलनट स्क्रब आणि मिळवा दिवाळीसाठी उजळ त्वचा

वॉलनट स्क्रबने डागविरहित आणि चमकदार त्वचा मिळवणं आता अगदी सोपं आहे. कारण वॉलनट अर्थात अक्रोड खाण्यात जितके फायदेशीर असतात तितकेच त्वचेसाठीही त्याचा फायदा  होतो. अक्रोडमध्ये ओमेगा 3 चं प्रमाण असतं जे त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. इतकंच नाही तर त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठीही याचा उपयोग होतो. यामुळे त्वा अधिक उजळते. दिवाळीसाठी तुम्हालाही उजळ त्वचा हवी असेल आणि त्वचा निरोगी हवी असेल तर तुम्हीही अक्रोडच्या स्क्रबचा घरच्या घरी कसा उपयोग करायचा ते जाणून घ्या.  अगदी घरीदेखील तुम्हाला हा स्क्रब बनवता येतो आणि वॉलनट स्क्रबची लोकप्रियता पण जास्त आहे. त्वचेला अधिक चमक, ताजेपणा देण्यासाठी याचा उपयोग होतो. पण बाजारात तुम्ही वॉलनट स्क्रब खरेदी करायला कचरत असाल आणि तुम्हाला घरच्या घरी कमी पैशामध्ये याचा उपयोग करून हवा असेल तर आम्ही तुम्हाला याबाबत सांगत आहोत. चेहऱ्यावर मुरूमं आले असतील अथवा काळे डाग असतील तर तुम्ही याचा वापर नक्की करून पाहायला हवा. तुम्ही घरातच अक्रोडची पावडर करून ठेवा आणि याचा तुम्हा स्क्रबप्रमाणे वापर करू शकता. यावर्षी दिवाळीला मिळवायची असेल उजळ त्वचा तर खाली सांगितल्याप्रमाणे करा घरच्या घरी वॉलनट स्क्रब तयार आणि वापरा. तसंच तुम्ही MyGlamm च्या वाईपआऊटचाही वापर करू शकता. 

Beauty

WIPEOUT Sanitizing Wipes 25 Wipes Pack

INR 159 AT MyGlamm

दही आणि अक्रोड फेसस्क्रब (Yogurt and Walnut face scrub)

Shutturstock

अक्रोडचा फेसस्क्रब बनविण्यासाठी तुम्ही सर्वात आधी दही आणि अक्रोडची पावडर एकत्र करा. अक्रोडचे दाणे जास्त  मोठे अथवा जास्त लहान राहिले नाहीत ना याची खात्री करून घ्या.  त्यानंतर हा स्क्रब त्वचेवर आठवड्यातून दोन वेळा लावा. चेहऱ्यावर लाऊन अगदी हलक्या  हाताने मसाज करा आणि अर्धा तास तसेच ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.  तुम्ही बॉडी स्क्रबिंगसाठीही याचा उपयोग करून घेऊ शकता. डेड स्किन काढून टाकण्यास याचा उपयोग होतो आणि दही शरीरावर काळे डाग अथवा टॅन काढण्यासाठी उपयुक्त ठरते. 

खराब झालेली कॉफी फेकू नका तर असा करा उपयोग

मध, तेल आणि अक्रोडचा फेसस्क्रब (Honey, Oil and Walnut Face Scrub)

Skin Care

Jovees Papaya & Honey Face Scrub

INR 155 AT Jovees

मध आणि आपल्या आवडीचे तेल एक चमचा घ्या. नारळाचे तेल असेल तर उत्तम. तुम्हाला हवं तर तुम्ही ऑलिव्ह ऑईल अथवा तिळाच्या तेलाचाही वापर करून घेऊ शकता. तसंच बदामचं तेलही चालू शकेल. मध आणि तेलाच्या या मिश्रणात अक्रोड पावडर मिक्स करा. नंतर हा स्क्रब चेहऱ्याला लावा आणि काही वेळ तसंच ठेवा. सुंदर आणि चमकदार चेहऱ्यासाठी तुम्ही हा स्क्रब वापरू शकता. तसंच याचा वापर करून तुम्ही शरीरावर मसाजही करू शकता. 

स्क्रबिंग करायची योग्य वेळ काय आहे: त्वचेची काळजी आणि रूटीनसंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या (Skin Care Routine In Marathi)

साखर आणि अक्रोड स्क्रब (Sugar and Walnut Scrub)

Skin Care

Palmer's Coconut Oil Formula Coconut Sugar Facial Scrub

INR 563 AT Palmers

अक्रोड आणि साखरेचा स्क्रब हा चेहऱ्यासाठी उत्तम स्क्रब आहे. साखर आणि अक्रोडचे दाणे आपल्या हातावर घ्या आणि त्यामध्ये लिंबाचे काही थेंब मिक्स करा. त्यानंतर ते हातावर रगडून घ्या आणि सर्क्युलर मोशनमध्ये चेहरा आणि मानेवर हे स्क्रब करा. यामुळे चेहरा अधिक उजळतो आणि चेहऱ्यावर चांगली चमक येते. तसंच चेहऱ्यावरील काळे डाग हटविण्यासाठीही याचा उपयोग होतो.

परफेक्ट मेनिक्युअरसाठी घरीच बनवा स्क्रब, मिळवा आकर्षक नखं

ओटमील आणि अक्रोड स्क्रब (Oatmeal and Walnut Scrub)

ओटमील आणि अक्रोड समान प्रमाणात घ्या आणि ग्लिसरीनसह व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये विटामिन ई कॅप्सुल मिक्स करा आणि ही पेस्ट तुम्ही मान आणि चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने मालिश करत स्क्रब करा. काही वेळ तसंच ठेवा आणि मग कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहरा अधिक उजळतो आणि चेहऱ्यावर ताजेपणा येतो. 

घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे वॉलनट स्क्रब तयार करता येतात आणि हे स्क्रब तुम्हाला अधिक सुंदर आणि अधिक उजळ बनवतात. पण याने अधिक प्रमाणात स्क्रब करू नका. कारण ओव्हर एक्सफोलिएशनमुळे चेहऱ्यावर जळजळ होऊ शकते आणि चेहरा सुजू शकतो. त्यामुळे नैसर्गिक त्वचा राहील इतकाच त्याचा वापर करा. साधारणतः तुम्ही आठवड्यातून दोन वेळा स्क्रब करू शकता. तसंच स्क्रब केल्यानंतर सनस्क्रिन अथवा मॉईस्चराईजर लावायला विसरू नका. त्वचा चांगली राहण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता आहे.  या दिवाळीसाठी तुम्हाला दिसायचं असेल आकर्षक तर नक्की याचा वापर करून पाहा  आणि आम्हाला कळवा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक