ADVERTISEMENT
home / Fitness
दिवाळीत मिठाई खाऊन वजन वाढले असेल तर आता असे ठेवा डाएट

दिवाळीत मिठाई खाऊन वजन वाढले असेल तर आता असे ठेवा डाएट

दिवाळीत फराळ आणि मिठाई असे सगळे पदार्थ खाऊन पोट बाहेर आले असेल आणि वजन वाढल्याची जाणीव झाली असेल तर आता वजन कमी करायची आता वेळ आली आहे. एवढे दिवस गोड खाण्याची झालेली सवय एकदम बदलणे फार कठीण आहे. पण आता मनावर दगड ठेवून काही गोष्टी आहारातून काढून टाकण्याची योग्य वेळ आली आहे. दिवाळीचे पाच दिवस तुम्ही मनसोक्त मिठाई खाल्ली असेल आणि पोटाचा घेर आणि वजनाचा काटा वाढत्या आकड्याकडे झुकला असेल तर आजपासून आताच्या या क्षणापासून असे करा डाएट.

दिवाळीत उरलेल्या मिठाईचे काय करायचे असा पडलाय प्रश्न, तर वाचा (Recipes With Mithai)

तीन दिवस करा डिटॉक्स

डिटॉक्सबद्दल आपण या आधीही अनेकदा सांगितले आहे. दिवाळीचे पाच दिवस सातत्याने गोडधोड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे असे पदार्थ तुम्हाला सतत खाण्याची इच्छा होत राहते. अशावेळी तुम्हाला तीन दिवसांचा डिटॉक्स करणे फारच फायद्याचे ठरते. तीन दिवस डिटॉक्स करायचे असेल तर तुम्ही या तीन दिवसात पोट भरेपर्यंत फळ किंवा फळांचे रस प्या. त्यामुळे तुम्ही खाल्लेले फॅट आणि गोड खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होईल. फळ आणि फळांच्या रसामध्ये नैसर्गिक साखर असते. त्यामुळे तुमच्या गोडाची इच्छा पूर्ण होते. डिटॉक्स तुम्ही साधारण पहिल्यांदा एक दिवस करा. त्यानंतर तुम्ही तीन दिवसांसाठी लागोपाठ असा प्रयोग करा. त्यानंतर तुम्हाला योग्य आहार घेण्यासाठी आवश्यक असलेला आहार घेता येईल. 

 

ADVERTISEMENT

रोज किमान अर्धा तास चाला

वजन कमी करण्यासाठी चालणे महत्वाचे

Instagram

वजन कमी करण्याची इच्छा अशी सहज आणि पटकन होऊ शकत नाही. गोडधोड पदार्थामुळे व्यायाम करण्याची इच्छा होत नाही. अशावेळी तुम्ही सुरुवातीला फक्त चालायला घ्या. चालताना तुम्हाला फार घाईत किंवा धावायची गरज नाही. तुम्ही घरीही निवांत 30 मिनिटांसाठी चालू शकता.यामुळे कॅलरीज बर्न व्हायला मदत होते. जर तुम्ही रोज चालत राहिलात तर तुम्हाला कालांतराने व्यायाम करायची इच्छा होईल.

लिक्विड डाएटच्या मदतीने महिन्याभरात करा वजन कमी

ADVERTISEMENT

कडधान्यांचा करा समावेश

कडधान्य तुम्हाला आवडत असतील तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीराला प्रोटीन पुरेपूर मिळवून देण्यासाठी योग्य असते. त्यामुळे आहारात शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात कडधान्यांचा समावेश करावा. तुमच्या आहारात जितके कडधान्य असतील तितके जास्त फायबर तुम्हाला मिळते. त्यामुळे तुमच्या पोटांचे आरोग्य सुधारते आणि तुमच्या चेहऱ्याला अधिक ग्लो येतो. 

घरचे पदार्थ खा जास्तीत जास्त

खा घरचे पदार्थ

Instagram

घरचे पदार्थ हे कोणतेही असले तरी ते अधिक चांगले असतात. अगदी प्रमाणात डाळ, भात, भाजी, चपाती असं काहीतरी खा. तुम्हाला याचा त्रास होणार नाही. याशिवाय तुम्ही जर नॉन व्हेज खात असाल तर आहारात अंडी- चिकन- मासे  असे असू द्या. असे पदार्थ बनवतानाही ते फार तेलकट नका करु म्हणजे तुम्ही करत असलेलला हेतू साध्य होईल. 

ADVERTISEMENT

आता दिवाळीनंतर लगेचच वजन कमी करण्यासाठी हे प्रयोग लगेचच करा.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो वांग्याचा रस

16 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT