छोट्या केसांचा अंबाडा बांधण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

छोट्या केसांचा अंबाडा बांधण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

साडी, पंजाबी सूट अथवा लेंगा असे काहिही पारंपरिक कपडे घातले तर त्यावर मानेवर बांधलेला एक सैल बन अथवा अंबाडा नक्कीच सूट होतो. अशा अंबाड्यावर तुम्ही एखादा गजरा अथवा हेअर अॅक्सेसरीज अडकवून तुमचा लुक कम्प्लीट करू शकता. पण अंबाडा घालण्यासाठी तुमचे केस कमीत कमी खांद्याएवढे तरी असावे लागतात. जर तुमचे केस खूप शॉर्ट असतील तर अशा केसांचा अंबाडा कसा बांधावा यासाठी या टिप्स जरूर वाचा. 

मेसी बनने मिळवा परफेक्ट लुक -

साडी आणि मेसी बन यामुळे तुमचा एथनिक लुक परफेक्ट होतो. मात्र सर्वांना असं वाटतं की मेसी बन घालण्यासाठी मिडिअम अथवा लांब केसच गरजेचे आहेत. मात्र तुम्ही तुमच्या लहान केसांवरही हा बन नक्कीच बांधू शकता. यासाठी सर्वात आधी तुमचे सर्व केस विंचरून त्याचा हा पोनीटेल बांधा. मग पोनीटेल मधील केसांचे तीन भागात विभाजन करा. प्रत्येक भाग बॅक कोंब करा ज्यामुळे केसांना एक प्रकारचा व्हॉल्युम मिळेल. त्यानंतर उजवीकडच्या केसांना डावीकडे वळवा आणि पिनच्या मदतीने बांधून घ्या.त्याचप्रमाणे डावीकडचे केस उजव्या बाजूला वळवा आणि पिनअप करा. तुमचे केस खूप लहान असतील तर ते मधून मधून बाहेर निघतील. त्यामुळे असे बाहेर निघालेले केस हेअर जेल अथवा हेअर स्प्रेने सेट करा आणि पुन्हा पिन अप करा. वरच्या दिशेने उरलेले केस खालच्या दिशेने वळवून पिन अप करा. सर्वात शेवटी केसांवर हेअर स्प्रे करा आणि केस व्यवस्थित सेट करा. ज्यामुळे तुमचा अंबाडा अथवा मेसी बन तयार होईल आणि तुमचा लुक परफेक्ट दिसेल.

बन विथ ट्विस्ट -

केस लहान असतील तर त्यांचा अंबाडा बांधण्याचा हा एक सोपा प्रकार आहे. एवढंच नाही तर हा अंबाडा फक्त दोन मिनिटांमध्ये तयार होईल. यासाठी तुमचे केस विंचरून घ्या आणि केसांच्या मध्यभागी भांग काढा. केसांचा पोनीटेल बांधून घ्या. पोनीटेलचे केस ट्विस्ट करून खालच्या दिशेने पिन अप करा. ज्यामुळे तुमच्या केसांचा एक छान बन तयार होईल. ट्विस्ट करताना केसांची टोके व्यवस्थित झाकून टाका ज्यामुळे ती बाहेर पडणार नाहीत. पिन केल्यामुळे केस सुटणार नाहीत  आणि तुम्हाला अंबाडा घातल्याचा फिल मिळेल.

आर्टिफिशिअल हेअर बन -

जर तुम्हाला साडीवर अगदी पांरपरिक अंबाडा घालायचा असेल तर तुम्ही केसांवर आर्टिफिशिअल हेअर बन अथवा अंबाडा लावू शकता. बाजारात असे निरनिराळ्या स्टाईलचे हेअर बन मिळतात. केस विंचरून त्यांचा एक पोनीटेल बांधा आणि तो पोनीटेल गुंडांळून पिन अप करा. या पोनीटेलच्या छोट्या बनवर आर्टिफिशिअल बन अडकवा आणि त्याला पिन अप करा. ज्यामुळे तुम्हाला एक छान मोठा आणि स्टायलिश अंबाडा घातल्याचा आनंद मिळेल. तुम्ही घातलेला हेअर बन आर्टिफिशिअल आहे असं जाणवू नये यासाठी तुमच्या हेअर कलरशी मिळता जुळता बन विकत घ्या. शिवाय तो गजरा अथवा हेअर अॅक्सेसरीजने सजवा ज्यामुळे तो तुमच्या खऱ्या केसांचा बन आहे असं वाटू लागेल. 

आणि हो, तुमचा हा एथनिक लुक कम्लिट करण्यासाठी मायग्लॅमचे मेकअप प्रॉडक्ट वापरायला मुळीच विसरू नका. 

Beauty

Manish Malhotra Hi-Shine Lipstick - Sunset Sienna

INR 950 AT MyGlamm