अशा पद्धतीने तयार होईल घरीच थालिपीठाची परफेक्ट भाजणी

 थालिपीठाची भाजणी करा घरच्या घरी

खमंग-खुसखुशीत थालिपीठ त्यावर मस्त लोण्याचा गोळा आणि चवीला लोणचं असा नाश्ता अनेकांना आवडतो. थालिपीठ  अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. बाजारातून थालिपीठाची भाजणी आणणे हे सोपे असले तरी घरी केलेल्या थालिपीठाची चव ही कधीच रेडीमेड पिठाला येत नाही. रेडिमेड आणलेल्या पिठापासून खुसखुशीत थालिपीठ होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. त्यामुळे घरीच थालिपीठाची भाजणी करणे नेहमीच चांगले. त्यामुळे आज घरी भाजणी करताना नेमके काय करायला हवे आणि  थालिपीठाची भाजणी घरी कशी करायला हवी ते आता जाणून घेऊया. 

अशी करा पूर्वतयारी

Instagram

थालिपीठाची भाजणी करण्यासाठी तुम्हाला खास असं काही प्रमाण घ्यावं लागत नाही. तुम्ही तुम्हाला आवडत असेल त्यानुसार डाळी घेऊ शकता. त्याचं प्रमाणही तुम्ही तुमच्यानुसार घ्या. साधारणपणे थालिपीठामध्ये मूगडाळ, चणा डाळ, उडिद डाळ, मसूर डाळ, मटकी डाळ असल्यास…, तांदूळ, गहू, चवीसाठी धणे असे घातले जाते. डाळी व्यतिरिक्त काही जण ज्वारी बाजरी घालून देखील केले जाते. त्यामुळे तुम्ही ते प्रमाण तुमच्याप्रमाणे आणि आवडीने करा.

रात्रीच्या जेवणानंतर बनवा झटपट 'मीठा पान', सोपी रेसिपी

असे दळा घरच्या घरी पीठ

Instagram

थालिपीठासाठी लागणारे सगळे साहित्य वाटून झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे याचे पीठ तयार करणे ते नेमके कसे हवे ते जाणून घेऊया. 

  • थालिपीठाची भाजणी ही नेहमी रवाळ असावी. तरच त्याची चव आणि टेक्श्चर खाताना चांगले वाटते. 
  • जर तुम्ही घरी योग्य प्रमाणात धान्य भाजून घेतले असेल तर ते दळताना फार वेळ लागत नाही. एक ते दोन मिनिटांच्या आतच रवाळ पीठ तयार होते. 
  • थालिपीठाची भाजणी करताना ते खूप दळलं जाणार नाही याची काळजी घ्या. पीठ खूप दळले गेले की, त्याची सगळी चव निघून जाते. 
  • तुमच्याकडे असलेल्या मिक्सरच्या पात्यांना धार नसेल तर मिक्सरमध्ये सगळ्यात आधी मीठ वाटून घ्या. ते काढून मग वाटा. 
  • शक्यतो आहे त्या मिक्सरचा उपयोग करुन तुम्ही घरीच पीठ दळण्याचा प्रयत्न करा. एकाचवेळी सगळे शक्य नसेल तर एक दोन फेऱ्यांमध्ये करा. 
  • काही जणांना ताजे पीठ कायम आवडते. अशांनी सगळे साहित्य एकत्र भाजून एअर टाईट डब्यात भरुन ठेवावे. ज्यावेळी थालिपीठ करणार त्यावेळी थालिपीठ तयार करुन ताजे थालिपीठ करावे. 

पोळ्या करा अधिक पौष्टिक, गव्हासोबत या धान्यांचाही करा समावेश

असे होतील खुशखुशीत थालिपीठ

Instagram

थालिपीठाची चव अनेकांच्या तोंडात रेंगाळणारी असते. मस्त कांदा, कोथिंबीर घालून केलेले थालिपीठ पोटभरीचे तर असतेच पण चविष्टसुद्धा असते. खाली दिलेल्या पद्धतीने देखील तुम्ही थालिपीठ करु शकता. 

  • कांदा- मिरची- कोथिंबीर बारीक चिरुन थालिपीठाच्या भाजणीत घाला. थालिपीठ थापून गरम गरम हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. 
  • बटाटा हा देखील काही रेसिपींच्या चवी वाढवू शकतो. त्यापैकीच एक आहे ते म्हणजे थालिपीठ. उकडलेला बटाटा कोरड्या पिठात कुस्करुन घाला. त्यामुळे थालिपीठ खुसखुशीत आणि आतून मऊ बनतात. 
    तर आता थालिपीठाची भाजणी बाहेरुन आणण्यापेक्षा घरीच करा. 

Kitchen Tips: चुकूनही वापरू नका फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक