सुरकुत्या घालविण्यासाठी असा करा चेहऱ्याला मसाज

सुरकुत्या घालविण्यासाठी असा करा चेहऱ्याला मसाज

जसजसे वय वाढते तसतसे आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात. वयाआधी केस सफेद होणे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येणे हे त्याचे सर्वात पहिले संकेत  आहेत. आपले वय वाढते तसे आपली त्वचा अधिक पातळ होते आणि चेहऱ्यावरील इलास्टिसिटी कमी होऊ लागते. वय वाढते आणि सुरकुत्या नको असतात त्यामुळे काही जण सतत चेहऱ्यावर फेशियल करतात आणि त्यामुळे चेहऱ्यावर अधिक सुरकुत्या आणि फाईन लाईन्स येतात ज्याला फ्राऊन लाईन्सदेखील म्हटले जाते. यासाठी अनेक उपाय केले जातात. पण तुम्हाला नैसर्गिकरित्या जर चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवायच्या असतील तर त्यासाठी चेहऱ्याला मसाज करणे अर्थात फेशिअल मसाज करणे हा उत्तम उपाय आहे. यामुळे तुम्ही तरूणही दिसता. वाढत्या वयाव्यतिरिक्त नक्की चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची काय कारणं आहेत ते पाहूया. 

चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर असा करा मेकअप

फ्राऊन लाईन्स येण्याची कारणे

Freepik.com

सूर्यप्रकाश - सूर्याची युव्ही किरणे ही त्वचेसाठी सर्वात हानिकारक असतात आणि यामुळे इलास्टिन आणि कोलेजन खराब होते. त्यामुळे चेहऱ्यावर लवकर फ्राऊन लाईन्स दिसायला सुरूवात होते.

तणाव - मानसिक तणावामुळे चेहऱ्यावरील मसल्समध्येही तणाव येतो आणि शरीरातील कोर्टिसोल नावाचे केमिकल बाहेर येऊ लागते. ज्यामुळे वयाच्या आधी चेहरा अधिक थोराड आणि म्हातारा दिसू लागतो. 

धुम्रपान - तंबाखू जितका तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे तितकाच तो तुमच्या त्वचेसाठीही हानिकारक आहे. धुम्रपान करण्याने तंबाखू तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये  मिसळतो आणि त्वचेला त्यामुळे हानि पोहचते. यामुळे ऑक्सिनेटेड रक्त हे नैसर्गिक स्वरूपात तुमच्या  फेशिअल टिश्यूपर्यंत पोहचू शकत नाही. 

तजेलदार त्वचेसाठी कच्च्या दुधात मिसळा पपई, मध आणि नियमित करा वापर

Beauty

WIPEOUT Germ Killing Body Lotion

INR 219 AT MyGlamm

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी मसाज

Freepik.com

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही घरच्या  घरी हा मसाज करू शकता. हा फेशिअल मसाज तुम्हाला पुन्हा एकदा अधिक सुंदर आणि ताजातवाना नक्कीच करेल. यासाठी तुम्ही दोन्ही हात हे कपाळावर ठेवा आणि आपल्या डाव्या हाताने कपाळ घट्ट धरा आणि उजव्या हाताने कपाळाच्या  उजव्या बाजूला क्लॉकवाईड सर्क्युलर मोशनमध्ये दोन मिनिट्स दाबून धरा. ही प्रक्रिया तुम्ही डाव्या बाजूलादेखील करा. असे तुम्ही काही वेळ हलक्या हाताने करत राहा. जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरील सर्व नसा व्यवस्थित मोकळ्या होतील. सुरकुत्या कमी करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. 

लहान वयात सुरकुत्या आल्या असतील तर करा सोपे उपाय

डोळ्यांच्या आजूबाजूला- आपल्या अंगठ्याने तुम्ही डोळ्यांच्या आऊटर कॉर्नरला ठेवा आणि हाताची बोटं डोक्याच्या  बाजूला ठेवा. नंतर डोळे बंद करा आणि मग हळूहळू अंगठ्याच्या मदतीने डोळ्यांच्या बाहेरच्या  बाजूला वर ओढा. 10 सेकंद तसंच ठेवा आणि सोडा. रोज असं 15 वेळा करा. हा फेशिअल मसाज तुमच्या त्वचेसाठी उत्तम असून तुम्ही नियमित याचा उपयोग केल्यास,  चेहऱ्यावर सुरकुत्या कमी होऊन तुम्ही पुन्हा एकदा तरूण त्वचा मिळवू शकता. तसंच तुमच्या चेहऱ्यावरील फ्राऊन लाईन्सही यामुळे कमी होण्यास मदत मिळते. मात्र यामध्ये  बाधा येऊ देऊ नका. स्वतःच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही अशाप्रकारे नियमित फेशिअल मसाज घरच्या घरी करा. सतत पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करण्यानेही एका कालावधीनंतर चेहरा खराब होतो. त्यापेक्षा या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक