काहीही केलं तरी तुमच्या त्वचेचा तेलकटपणा कमी होत नाही? जरा घराबाहेर पडले किंवा मेकअप केला तरी चेहरा तेलकट होत असेल तर तुम्ही तेलकट त्वचेच्या समस्येने त्रस्त आहात. हे तर तुम्हाला नक्कीच कळले असेल. त्वचेचा प्रकार हा काही केल्या बदलता येत नाही. पण काही काळजी घेतली तर मात्र तुमच्या त्वचेवरील तेलकटपणा थोडासा नक्कीच कमी करता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यास तुम्हाला अगदी हमखास मदत होईल. चला करुया सुरुवात
जर तुमचा चेहरा खूपच तेलकट असेल तर तुमच्यासाठी सोपी आणि महत्वाची अशी पद्धत म्हणजे कोमट पाण्याने चेहरा धुणे. कोमट पाण्याचा उपयोग करुन जर तुम्ही चेहरा धुतला तर तुम्हाला त्याचा हमखास फायदा होतो. कोमट पाणी चेहऱ्यावरील पोअर्सच्या आत जाऊन तेलग्रंथीतून तेल बाहेर काढणाऱ्या घटकांना कमी करण्याचे काम करतात. ज्यांची त्वचा कोरडी असेल त्यांनी जर कोमट पाण्याचा प्रयोग केला तर त्यांची त्वचा ही अधिक कोरडी दिसते. पण तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी ही ट्रिक एक वरदान आहे.
टिप: मेकअप काढल्यानंतर तुम्ही फेसवॉश करताना कोमट पाण्याचा वापर करुन चेहरा धुवा. या शिवाय सकाळी उठल्यानंतरही तुम्ही तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
तेलकट त्वचेसाठी बेस्ट फाऊंडेशन (Best Foundation For Oily Skin In Marathi)
त्वचेसाठी टोनर हे फार महत्वाचे असते. जर तुम्ही टोनरचा प्रयोग करत असाल पण तरीही तुमच्या चेहऱ्यावर फरक पडत नसेल तर तुम्ही चेहऱ्यावर अल्कोहल असलेले टोनरचा वापर करा . त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होण्यात. मदत मिळते. टोनर हे त्वचेच्या पोअर्समध्ये जाऊन तेलग्रंथीना नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. त्यामुळे तुमच्या त्वचेचा तजेला कायम राहतो आणि केसाचा अनावश्यक तेलकटपणा कमी होतो.
मेकअप करण्यापूर्वी चेहरा प्रेप करणे फार गरजेचे असते. चेहरा प्रेप करताना आपण चेहरा स्वच्छ करुन प्राईमर लावतो. जर तुम्ही प्राईमर वापरत असाल तर तुमचे प्राईमर हे ऑईल कंट्रोल प्राईमर आहे का ते बघा. तुमचे प्राईमर जर ऑईल कंट्रोल असेल तर मेकअप केल्यानंतर जसा चेहरा तेलकट होतो तसा तो मुळीच होत नाही. तुमची त्वचा अधिक चांगली दिसते. त्यामुळे कधीही आणि कोणताही मेकअप करताना तुम्ही ऑईल क्ंट्रोल प्राईमरचा उपयोग कराच.
टोनर ज्या प्रकारे तुमचे पोअर्स टाईट करण्याचे काम करते अगदी त्याच पद्धतीने अॅस्ट्रिंंजट तुमच्या त्वचेवर काम करते. अॅस्ट्रिंजटमध्ये असलेले अल्कोहल घटक त्वचेवरील तेलकटपणा कमी करतात. पण याचा अतिवापरही त्वचेसाठी फारच हानिकारक ठरतो. तुम्ही दिवसातून केवळ दोनच वेळा याचा उपयोग करु शकता. त्यापेक्षा जास्त वापर हा हानिकारक ठरु शकतो.
आता तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने त्वचेवरील तेलकटपणा कमी करु शकता.