वातावरण बदलामुळे आलेल्या थंडीत होणाऱ्या त्रासावर असा करा इटपट इलाज

वातावरण बदलामुळे आलेल्या थंडीत होणाऱ्या त्रासावर असा करा इटपट इलाज

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला अचानक आलेली थंडी आणि मध्येच जाणवणारा उकाडा यामुळे अनेकांना आरोग्यासंदर्भात अनेक तक्रारी जाणवू लागल्या आहेत. सर्दी, ताप, डोकेदुखी, सुरकुतलेली त्वचा असे त्रास अनेकांना होऊ लागले आहेत. सध्याच्या काळात सर्दी, ताप येणे हे आरोग्यासाठी फारच घातक आहे. कारण सध्या असलेल्या कोरोनामुळे प्रतिकारशक्ती वाढवणे फारच गरजेचे झाले आहे. ऑक्टोबर काळात उकाडा न जाणवता अचानक थंडीची लाट आली पण पुन्हा एकदा थंडीची अपेक्षा असताना वातावरणात उकाडा आल्यामुळे अनेकांना वेगवेगळे त्रास होऊ लागले आहेत. या वेगवेगळ्या त्रासावर नेमका कशापद्धतीने झटपट इलाज करता येईल ते आता जाणून घेऊया.

इसबबद्दल जाणून घ्या अत्यंत महत्वाची माहिती (Home Remedies For Eczema In Marathi)

सर्दीकडे करु नका दुर्लक्ष

Instagram

अनेकांना सर्दी ही बाराही महिने असते. तर काहींना वातावरणात जरासा बदल झाला की,सर्दी अगदी हमखास होते. तुम्हालाही अचानक सर्दी सुरु झाली असेल  आणि ती जाण्याचे नावच घेत नसेल तर तुम्हाला तुमची काळजी घेण्याची गरज आहे. कारण सर्दी ही आरोग्यासाठी फारच हानीकराक आहे. सर्दीवर अनेक घरगुती इलाज केले जातात. ते करण्यास काहीच हरकत नाही. पण नाक चोंदू देऊ नका. कारण त्यामुळे डोकेदुखी होण्याची शक्यता असते. त्यामुळे नाक वाहत असेल तर ते स्वच्छ होऊ द्या. शक्य असेल तर रात्री झोपताना छान ग्रीन टीची वाफ घेऊन झोपा. त्यामुळे तुमचे नाक स्वच्छ राहील या शिवाय तुम्हाला माहीत असलेली काही चाटण आणि औषधांचे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सेवन करा. सर्दीकडे दुर्लक्ष करु नका कारण त्यामुळेच तुमची तब्येत अधिक बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे याची काळजी घ्या 

कापरे भरणे

अनेकांना वातावरण बदलेले की, ताप येणं, अंग कणकणे असे काही त्रास जाणवू लागतात. काहींना या गोष्टी वातावरण बदल वाटतात. त्यामुळे बरेचदा याकडे दुर्लक्ष केले जाते. पण आता या कडे दुर्लक्ष करु नका. जर ही कणकण तुम्हाला दोन दिवसांपेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांकडे जा. या दिवसात गरम पाण्याशिवाय आंघोळ करु नका. कारण त्यामुळे शरीरात भरलेले कापरे आणि कणकण कमी होण्यास मदत मिळते. पण शक्य असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आरोग्याची काळजी घ्या. 

त्वरीत परिणामासाठी करा डोकेदुखीवर घरगुती उपाय (Home Remedies For Headache In Marathi)

ओठ फुटणे

ओठ फुटणे हा त्रासही हिवाळा सुरु झाला की, अनेकांना होतो.ओठफुटीचा त्रास होत असेल तर घरातील तूप हे त्यावर बेस्ट असे औषध आहे. दररोज रात्री झोपताना तूप लावून झोपा. तूप हे नॅचरल मॉश्चरायझर आणि लिप बाम असून त्यामुळे तुमचे ओठ फुटत नाही. ओठ फुटून त्यातून रक्त येत असेल तर ती जखम भरण्यासही मदत करते. प्रवासात बाहेर पडताना एका एअर टाईट डब्यात तूप घ्या.तूपाचा वास आवडत नसेल तर तुम्ही त्यामध्ये तुमच्या आवडीचे एखादे सेंटेंड ऑईल टाकण्यास काहीच हरकत नाही. 

पाय फुटणे

Instagram

पायांना भेगा पडण्याचा त्रासही अनेकांना या काळात होतो. टाचा दुखणे किंवा टाचांना भेगा पडत असतील तर खोबरेल तेलापेक्षा उत्तम असे काही नाही. खोबरेल तेल पायांना चोळा. पायांना तेल लावल्यानंतर सॉक्स घाला. म्हणजे पायांना त्रास होणार नाही. शिवाय पायांच्या भेगा लवकर भरुन निघतील. 

आता वातावरण बदलामुळे असा काही त्रास होत असेल तर अशी घ्या काळजी.

दृष्टी सुधारण्यासाठी सोपे उपाय (How To Improve Eyesight In Marathi)