आरोग्यासाठी आणि डोळ्यांसाठी गाजर चांगले असते हे सर्वांनाच माहीत आहे. गाजरामध्ये विटामिन ए, के, सी, बी6, बी1, बी3, बी2, फायबर, पोटॅशियम आणि फॉस्फरस असे अनेक तत्व असतात. जे आपल्या डोळ्यांना त्वचेसह लाभदायी ठरतात. विशेषतः गाजरामध्ये असणारे तत्व हे आरोग्याला अधिक चांगले ठरते. पण तुम्हाला माहीत आहे का गाजराचा वापर तुम्ही केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठीही करू शकता. तुम्ही केसांच्या वाढीसाठी आणि केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी गाजराचा वापर करून घेऊ शकता. याचा वापर कसा करायचा आणि त्याचे काय फायदे आहेत हे या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गाजर केसांचा विकास करण्यासाठी लाभदायक आहे. गाजरामध्ये असणारे विटामिन ए हे असे पोषक तत्व आहे जे केसांना कंडिशनिंग देते. यामुळे केसगळतीही कमी होते. गाजर आपल्या केसांची शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. तसंच केसांना अधिक घनदाट बनविण्याचे आणि चमकदार करण्याचे कामही गाजर करते. गाजरामधील पोषक तत्व आपल्या केसांना मुळापासून रक्त पुरवठा करतात त्यामुळे केसांच्या वाढीला मदत मिळते. गाजराच्या नियमित सेवनाने तुम्हाला वेळेआधी केसांचा सफेदपणादेखील दिसून येणार नाही.
DIY: त्वचेसाठी उत्तम आहेत हे गाजरापासून तयार केलेले फेसमास्क
गाजराचे केसांसाठी काय फायदे आहेत ते तर आपण जाणून घेतले. पण गाजराचा नक्की वापर कसा करायचा आणि त्याचा कसा फायदा करून घ्यायचा ते आपण पाहू.
केसांची गळती थांबविण्यासाठी गाजर, दही आणि केळ्याचा हेअर मास्क तुम्ही वापरू शकता. हे तुमच्या केसांना मुलायम आणि चमकदार बनवते.
साहित्य
बनविण्याची पद्धत
एक गाजर आणि केळ्याचे लहान तुकडे करून घ्या. दह्यासह हे मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट बाऊलमध्ये काढा
वापरण्याची पद्धत
तयार हेअर मास्क तुम्ही तुमच्या केसांना व्यवस्थित लावा. केसांना शॉवर कॅप लावा. मास्क सुकू द्या. साधारण अर्धा तासानंतर माईल्ड शँपूने केस धुवा. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता आणि त्यामुळे केस अधिक चमकदार होतील.
या मास्कमध्ये असणारे गाजर आणि ऑलिव्ह ऑईल हे दोन्ही केसांचा विकास करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तर कांद्याचा रस हा केसांच्या मुळापासून पोषण देतो. तसंच केसगळती थांबविण्यासाठीही याचा उपयोग होतो. लिंबाच्या रसात असणारे विटामिन सी कोलेजन वाढविण्यास उपयुक्त ठरतो. कोलेजन केसांच्या विकासासाठी उपयुक्त आहे.
साहित्य
बनविण्याची पद्धत
एक गाजर आणि कांद्याचे तुकडे मिक्सरमधून वाटून घ्या. ही पेस्ट घेऊन त्यात ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस मिक्स करा. व्यवस्थित एकत्रित करून घ्या
वापरण्याची पद्धत
केसांना समान स्वरूपात ही पेस्ट लावा. 15 मिनिट्स तुम्ही हे केसांवर तसंच राहू द्या. जेव्हा हेअरमास्क सुकेल तेव्हा माईल्ड शँपूने तुम्ही केस व्यवस्थित धुवा. आठवड्यातून एक वेळा तुम्ही हा हेअरमास्क वापरू शकता. केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो.
नारळाचे तेल हे उत्कृष्ट मॉईस्चराईजर आहे जे तुमच्या स्काल्पला हायड्रेट करण्याचे काम करते. स्काल्पशिवाय तुमच्या केसांनाही मॉईस्चराईज करते आणि त्यामुळे केस अधिक मुलायम होतात.
साहित्य
बनविण्याची पद्धत
एक गाजराचे लहान तुकडे कापून त्याची पेस्ट करून घ्या. त्यामध्ये नंतर नारळाचे तेल मिक्स करा आणि ही पेस्ट तयार करा.
वापरण्याची पद्धत
हा मास्क तुम्ही स्काल्प आणि केसांना लावा आणि 20 मिनिट्स तसंच राहू द्या. 20 मिनिट्सनंतर हेअरमास्क माईल्ड शँपूने धुवा. आठवड्यातून तुम्ही एकवेळा याचा वापर करून केसांचा निस्तेजपणा घालवू शकता.
हे सर्व हेअर मास्क संपूर्णतः नैसर्गिक असल्याने केसांवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही अगदी सहजपणाने याचा वापर करू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक