सतत फेसवॉस बदलणे फायद्याचे की तोट्याचे

सतत फेसवॉस बदलणे फायद्याचे की तोट्याचे

प्रत्येकाच्या ब्युटी रिजीममध्ये ठरलेले प्रोडक्ट म्हणजे फेसवॉश.. प्रत्येक जण आपआपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आणि तक्रारीनुसार फेसवॉशची निवड करत असतो. तुम्हीही एखादा फेसवॉस सतत तुमच्यासोबत ठेवत असाल. तो संपल्यानंतर त्वचेसाठी योग्य म्हणून पुन्हा एकदा त्याच फेसवॉशची निवड करत असाल. पण सतत एकच फेसवॉश वापरणे फायद्याचे असते का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? नसेल पडला तर हा प्रश्न तुमच्या त्वचेसाठी फारच महत्वाचा आहे. चेहऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फेसवॉसचे बदलणे फायद्याचे की तोट्याचे हे आता आपण जाणून घेऊयात.

थंडीत केसांचे मॉईश्चर टिकवण्यासाठी अशी घ्या काळजी

फेसवॉश बदलण्याचे फायदे

Instagram

  • त्वचेला सतत एकाच गोष्टीची सवय झाली की, कालांतराने ती परिणाम करणे बंद करते. समजा तुम्ही पिंपल्ससाठी फेसवॉश घेत असाल तर सतत त्याच फेसवॉश वापरण्यामुळे त्याचा परिणाम कालांतराने कमी होऊ लागतो. त्यामुळे फेसवॉश बदलणे फायद्याचे ठरते.
  • त्वचा ही सतत बदलत असते. समजा तुम्ही तुमच्या त्वचेवरील काही समस्या लक्षात घेत एखादा फेसवॉश घेतला असेल आणि त्वचेची ती समस्या कमी झाली असेल तरी देखील तुम्ही वापरत असलेला फेसवॉश काहीच कामाचा उरत नाही. त्याऐवजी तुम्ही जर फेसवॉश बदलला तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. 
  • एखादे प्रोडक्ट सतत वापरु नये असे सांगितले जाते कारण तेच तेच वापरुन तुम्हाला आणि तुमच्या त्वचेलाही कंटाळा येतो. त्यामुळे फेसवॉश काही काळानंतर बदलण्यास काहीच हरकत नाही. 

हे झाले फेसवॉश बदलण्याचे फायदे पण या फायद्यांच्या तुलनेत याचे तोटेच अधिक आहेत ते आता जाणून घेऊयात.

फाऊंडेशन लावण्यासाठी करु शकता या ब्रशचा उपयोग

 

फेसवॉश बदलण्याचे तोटे

  •  फेसवॉश बदलत असाल तर तुम्ही एखादी जाहिरात बघून किंवा तुम्हाला कोणीतरी सांगितला म्हणून घेऊ नका.  कारण असा फेसवॉश तुमच्या त्वचेला शोभेल असा नसतो. 
  • फेसवॉश बदलताना एखाद्या फेसवॉशमधील  घटक तुमच्या त्वचेला शोभणारा नसेल तर तुम्हाला त्यामुळे पिंपल्स किंवा पुरळ येण्याची शक्यता असते. 
  • फेसवॉश जर तुमच्य त्वचेच्या प्रकाराला शोभणारा नसेल तरीदेखील तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. 
  • अचानक फेसवॉश बदलला तरीदेखील तुमची त्वचा कोरडी पडण्याची किंवा ऑईली होण्याची शक्यता असते. 

क्लिनझर की फेसवॉस, जाणून घ्या दोघांमधील फरक (Cleanser Vs Face Wash In Marathi)

कधी बदलावा फेसवॉश

 जर तुम्हाला फेसवॉश बदलायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये काही महिन्यांचे अंतर ठेवायला हवे. एखादा फेसवॉश तुम्ही सतत तीन महिने वापरत असाल तर त्यानंतर तुम्ही फेसवॉश बदला. फेसवॉश बदलताना त्याचे घटक नीट बघून घ्या आणि मगच त्याची निवड करा. 


आता फेसवॉश बदलत असाल तर या गोष्टींचा नक्की विचार करा. 

Beauty

WIPEOUT Germ Killing Face Wash

INR 119 AT MyGlamm