सणासाठी करिना कपूरप्रमाणे दिसायचं असेल तर वापरा अशी लाल लिपस्टिक

सणासाठी करिना कपूरप्रमाणे दिसायचं असेल तर वापरा अशी लाल लिपस्टिक

करिना कपूर पुन्हा एकदा गरोदर आहे. पहिल्या गरोदरपणातही करिनाने अत्यंत ग्रेसफुली फॅशन कॅरी केली होती आणि एक ट्रेंड सेट केला होता. ती अगदी तैमूरचा जन्म होईपर्यंत काम करत होती आणि आताही करिना काम करत आहे. करिना नेहमीच आपल्या लुकने सर्वांना प्रभावित करत असते. करिनाच्या कॉम्प्लेक्शनला लाल लिपस्टिक खूपच सुंदर दिसते. त्यामुळे अशी लिपस्टिक पाहिल्यानंतर आपल्यालाही सणासुदीला लाल लिपस्टिकचा वापर करावा वाटला तर नक्कीच आश्चर्य वाटणार नाही. सणासुदीला आकर्षक दिसण्यासाठी लाल लिपस्टिक हा उत्तम पर्याय आहे. पण बऱ्याचदा आपल्याला लाल लिपस्टिक लावल्यानंतर चांगली दिसेल की नाही असा अनेक जणींना प्रश्न त्रास देतो. पण तुम्ही करिनाप्रमाणे लाल लिपस्टिकचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला ही लिपस्टिक उत्तररित्या कॅरी करता येईल. लाल लिपस्टिक लावण्याच्या काही स्टेप्स आहेत तुम्ही त्या फॉलो केल्यात तर तुम्हालाही ही लाल लिपस्टिक वापरणं सोपं जाईल. या लेखात आम्ही या टिप्स देण्याचा प्रयत्न केला आहे.

अशा प्रकारे लावा लाल लिपस्टिक

Instagram

स्टेप 1 - लाल लिपस्टिक लावण्यापूर्वी  सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या ओठांवर मॉईस्चराईजर लाऊन घ्या

स्टेप 2 - ओठांचा मेकअप जास्त काळ टिकतो.  त्यामुळे ओठांवर प्राईमरचा कोट लावा. त्यानंतर कन्सीलर लावा जेणेकरून तुमचे ओठ अधिक मऊ, मुलायम दिसतील आणि ओठांचा मेकअप व्यवस्थित एकमेकांत मिसळला जाईल आणि  वाईट दिसणार नाही. 

स्टेप 3 - यानंतर ओठांना लिप लायनरने तुम्ही आऊटलाईन करा. लिप लायनर आणि लिपस्टिकच्या शेडमध्ये  जास्त फरक असू देऊ नका.  एखादी हलकी शेड अथवा एखादी गडद शेड चालू शकते. पण तुम्ही कोणती लिपस्टिक वापरणार आहात त्यानुसार लिप लायनर निवडले तर त्याचा अधिक चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे सहसा आपल्या लिपस्टिकप्रमाणेच लिप लायनरची निवड करा आणि त्याचा वापर करा 

स्टेप 4 - तुमचे ओठ मोठे असतील तर लिप लायनर ओठांच्या आतल्या बाजूने लावा आणि ओठ पातळ आणि लहान असतील तर लिप लायनर ओठांच्या बाहेरच्या बाजूने लावा. 

स्टेप 5 - ओठांना आऊटलाईन दिल्यानंतर तुम्ही ब्रशच्या सहाय्याने लिपस्टिक ओठांवर लावा. यामुळे लिपस्टिक ओठांच्या बाहेर लागणार नाही. तसंच व्यवस्थित ओठांच्या आकारानुसार तुम्हाला लिपस्टिक लावता येईल. 

स्टेप 6 - लिपस्टिकचा पहिला कोट लावल्यावर टिश्यू पेपर घेऊन ओठांच्या मध्ये दाबा. यामुळे लिपस्टिक पसरण्याचा धोका कमी होतो. त्यानंतरच ओठांवर दुसरा कोट लावा आणि मग फायनल टच द्या.

स्टेप 7 - सर्वात शेवटी लिप ग्लॉस लाऊन तुमचा लाल लिपस्टिकचा मेकअप तुम्ही पूर्ण करा. लाल लिपस्टिक लावणे अतिशय सोपे आहे. अशा पद्धतीने तुम्ही लाल लिपस्टिक लावल्यास, सणासुदीला नक्कीच तुमच्या लुकमध्ये फरक येईल आणि तुम्ही करिना कपूरप्रमाणेच अधिक आकर्षक दिसाल यात शंका नाही. 

कशी निवडावी लाल लिपस्टिकची शेड

Make Up

MyGlamm K.Play Flavoured Lipstick

INR 499 AT MyGlamm

लाल लिपस्टिक निवडताना नक्कीच गोंधळ उडतो.  कारण लाल रंग भडक वाटू नये याची काळजीही घ्यावी लागते.  त्यामुळे लाल लिपस्टिकची शेड कशी निवडायची जाणून घ्या. 

  • तुमचा रंग गोरा असेल तर लाल रंगाची कोणतीही शेड निवडताना तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला कोणतीही लाल रंगाची शेड चांगलीच दिसते
  • तुमचा रंग जर गडद असेल तर तुम्ही लाल रंगाचा डीप शेड निवडा.  हे तुमच्या कॉम्प्लेक्शनला अधिक उठवादार करते
    तुमचे ओठ खूपच पातळ आणि लहान असतील तर लाल गडद रंगाचा वापर करू नका. यामुळे ओठ अधिक पातळ आणि लहान दिसतात. त्यामुळे लाईट लाल रंग निवडा
  • लिपस्टिक निवडण्यासाठी शेड कार्ड्स उपलब्ध असतात. पण शेड कार्ड्समध्ये दाखवलेले रंग आणि लिपस्टिकच्या रंगात तफावतही असू शकते. त्यामुळे लिपस्टिक टेस्टर्सचा वापर करून लिपस्टिक नीट निवडा
  • दिवसा तुम्ही मॅट फिनिश आणि रात्री हाय ग्लॉस फिनिश असणारी लाल लिपस्टिक वापरा 
  • आजकाल टॉमेटो रेड, चिली रेड शेड जास्त ट्रेंडमध्ये आहे. तुम्हीदेखील ही वापरून पाहू शकता

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक