हवा असेल स्लिम लुक तर वापरा या रंगाचे कपडे

हवा असेल स्लिम लुक तर वापरा या रंगाचे कपडे

मुली कोणताही आऊटफिट जेव्हा निवडतात तेव्हा त्याची स्टाईल अथवा कटवर्क बघतात असं नाही तर त्याचा रंगही बघतात.  कारण कपड्यांचा रंग हा अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रत्येकावर प्रत्येक रंग शोभून दिसतोच असं नाही. त्यामुळे कपड्यांची निवड करताना मुली नेहमी विचारपूर्वक कपडे निवडतात. बऱ्याचदा रंगाची निवड करताना वेळ लागतो. बऱ्याचदा रंग आवडल्यावर इतर गोष्टींकडे जास्त लक्ष देण्यात येत नाही. कपड्यांचा रंग हा तुमच्या केवळ कॉम्प्लेक्शनलाच नाही तर तुमच्या फिगर आणि तुमच्या लुकवर पूर्ण फरक पाडतो. त्यामुळे तुम्हाला जर स्लिम लुक हवा असेल तर कोणत्या रंगाचे कपडे वापरायला हवेत याची तुम्हाला माहिती हवी. प्रत्येक महिलेच्या शरीराचा आकार हा वेगळा असतो. त्यामुळेच आऊटफिटच्या रंगांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात येते. आपल्या शरीराचा वाईट भाग न दाखवता आकर्षक भाग दाखविण्याकडे अर्थात प्रत्येकाचा कल असतो. तुमचे शरीर थोडे जाडसर असेल तर तुम्ही नीट विचारपूर्वक रंगाची निवड करणे आवश्यक आहे. आम्ही या लेखातून अशाच काही रंगांच्या कपड्यांविषयी सांगणार आहोत जे तुमचे शरीर बारीक दाखवण्यासाठी मदत  करतील. 

खादी - कायम टिकणारी फॅशन, नेहमीचा ट्रेंड

काळा रंग

काळा रंग हा सर्वात गडद रंग आहे आणि या रंगाचे कपडे घातल्यानंतर महिला स्लिम दिसतात. हा सहसा जाडेपणा दर्शवू देत नाही. त्यामुळेच जाडसर महिलांच्या वॉर्डरोबमध्ये तुम्हाला काळा रंग हमखास दिसून येईल. याशिवाय तुम्ही गडद निळा, चॉकलेट ब्राऊन अथवा गडद ग्रे अशा रंगाचे कपडेही घालू शकता. तुम्हाला बारीक दिसण्याचा आभास निर्माण करायचा असल्यास, हे रंग तुम्हाला नक्कीच मदत करतील. तुम्ही अशा रंगाचे कपडे नक्की तुमच्या वॉर्डरोबमध्ये ठेवायला हवेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर कोणताही गडद रंगाचा कपडा तुम्ही घातलात तर तुम्हाला स्लिम लुक दाखवणे सहज सोपे होईल.

पूजा सावंतचे हे एथनिक लुक लग्नसमारंभासाठी आहेत परफेक्ट

मोनोक्रोमॅटिक शेड्स

तुम्हाला तुमची उंची कमी दाखवायची असेल आणि त्याचप्रमाणे स्लिम लुकही दाखवायचा असेल तर तुम्ही मोनोक्रोमॅटिक रंग घाला. ही एक अत्यंत सोपी युक्ती आहे, जी तुम्हाला स्लिम लुक दाखवण्यासाठी वापरता येते. कारण मोनोक्रोमॅटिक शेड्स घालणअयाने तुमच्या शरीराचे व्हिज्युअल हे व्हर्टिकल लाईनमध्ये  दिसते आणि त्यामुळेच शरीर जाडसर न दिसता बारीक दिसते. त्यामुळे तुम्ही जर एखादा एलिगंट आणि स्लिम लुक कॅरी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच मोनोक्रोमॅटिक शेड्सचा विचार करायला हवा. यासह तुम्ही मॅट लिपस्टिक लावल्यावर तुमचा पूर्ण लुक तयार.

या रंगाचे कपडे उजळवतात तुमचा स्किनटोन

Beauty

MyGlamm LIT Liquid Matte Lipstick

INR 395 AT MyGlamm

कलर मिक्सिंग कसे कराल

स्लिम ट्रिम दिसण्यासाठी मोनोक्रोम शेड्स घालायला हव्यात ही चांगली कल्पना असली तरीही गरज नाही की तुम्ही एकाच रंंगाचे कपडे घालाल.  प्रत्येकाला वेगवेगळे रंग घालायला आवडतात आणि रंगाशी खेळणंं हे प्रत्येकालाच आवडतं. तुम्ही वेगवेगळे रंग ट्राय करून स्लिम दिसण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता.  त्यासाठी तुम्ही वेगवेगळे कलर मिक्सिंग करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही गडद  आणि लाईट शेड्सचे कॉम्बिनेशन करून स्टायलिश दिसू शकता.  गडद बॉटमसह ब्राईट रंगाचा टॉप चांगला दिसेल. अथवा लाल वा गुलाबी रंगाच्या शेड्सवर स्लिम आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्ही वेगवेगळे प्रयोग करून पाहू शकता. तुम्ही असे वेगवेगळे रंग वापरून स्लिम दिसू शकता. तसंच तुमचा वॉर्डरोबही रंगबेरंगी दिसेल यात शंका नाही.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक