उरलेल्या पोळ्यांपासून बनवा कुरकुरीत कटलेट्स, 15 मिनिट्समध्ये चविष्ट नाश्ता

उरलेल्या पोळ्यांपासून बनवा कुरकुरीत कटलेट्स, 15 मिनिट्समध्ये चविष्ट नाश्ता

बरेचदा अंदाज न आल्याने घरामध्ये पोळ्या (चपाती) उरतात. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ कधीकधी पोळी खायचा कंटाळा येतो आणि मग दुसऱ्या दिवशी पोळ्या उरतात. सहसा आपल्याला उरलेल्या पोळ्या या चहा अथवा कॉफीतून खाव्या लागतात अथवा बनवली जाते ती फोडणीची पोळी. पण उरलेल्या पोळीपासून अजून एक चविष्ट नाश्ता तयार होऊ शकतो जो अगदी लहान मुलांपासून ते घरातील सगळेच मिटक्या मारत खाऊ शकतात आणि हा पदार्थ म्हणजे उरलेल्या पोळ्यांचे कुरकुरीत कटलेट्स. सर्वात महत्त्वाचे म्हणजे  घरात असलेल्या पदार्थांपासून हे तयार होते आणि हे तयार करण्यासाठी वेळही लागत नाही. केवळ 15-20 मिनिट्समध्ये तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. म्हणजे  सकाळची घाई असेल तरीही तुम्ही हे पटकन करू शकता. अतिशय सोपी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि हे शरीरासाठी हेल्दीदेखील आहे. जाणून घेऊया कसे बनवायचे रोटी कटलेट्स. 

झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास (Easy Breakfast Recipes In Marathi)

कुरकुरीत रोटी कटलेट्स बनविण्यासाठी लागणारे साहित्य

Instagram

 • पोळ्या 
 • पाव कप किसलेले गाजर 
 • पाव कप चिरलेला कांदा 
 • अर्धा चमचा वाटलेले आले 
 • अर्धा चमचा वाटलेली मिरची 
 • 1 चमचा कॉर्न फ्लोअर (नसल्यास, आरारोट वापरले तरी चालेल)
 • 2 चमचे चिरलेली कोथिंबीर 
 • 1 चमचा धने पावडर 
 • अर्धा चमचा लाल तिखट 
 • 2 उकडलेले बटाटे
 • चवीनुसार मीठ
 • लिंबाचा रस अथवा आमचूर पावडर 
 • तेल

दिवाळीसाठी बनवा झटपट मावा अनारसा, वेगळी रेसिपी करा ट्राय

करण्याची पद्धत

रोटी कटलेट्स करण्याची पद्धत आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे देत आहोत. तुम्हालाही हे बनविणे सोपे होईल. जाणून घ्या पद्धत. 

स्टेप 1 - पोळी मिक्सरमधून वाटून थोडी ब्रेड क्रम्सप्रमाणे करून घ्या. शिळी पोळी मिक्सरमधून पटकन वाटून होते आणि इतर साहित्य त्यामध्ये  व्यवस्थित ब्लेंड होऊ शकते. 

स्टेप 2 - यामध्ये गाजर, कांदा, आले, मिरची, धने पाडवर, तिखट, कॉर्न फ्लोअर, मीठ,  आमचूर पावडर, लिंबाचा रस सर्व मिक्स करा आणि बटाटे सोलून मॅश करून तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. बटाटे जास्त  घालू नका. पोळीचा स्वाद येणं जास्त गरजेचे आहे. त्यामुळे दोन बटाटे असतील तर लहान मापाचे घ्या. मोठा बटाटा असेल तर एकच बटाट्याचा वापर करा. 

कच्च्या कैरीच्या स्वादिष्ट रेसिपी करा घरच्या घरी

स्टेप 3 - सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र केल्यवर त्याला कटलेट्सचा शेप द्या. तुम्हाला हवं तर पॅटीसच्या आकारातही तुम्ही करू शकता. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही याला देऊ शकता. हातावर तेल घ्या आणि मग याचा आकार बनवा अन्यथा हाताला चिकटेल. 

स्टेप 4 - नॉनस्टिक कढईमध्ये तेल गरम करा आणि  मध्यम आचेवर तुम्ही हे कटलेट्स तळा. तुम्हाला तळायचे नसेल तर पॅनवर शॅलो फ्राय करा. पण  मंद आचेवर करा कारण पोळी आणि बटाटे दोन्ही व्यवस्थित क्रस्ट व्हायला हवे आणि आतून सॉफ्टही राहायला हवे. तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर मंद आच ठेवणे योग्य.

स्टेप 5 - शिजल्यावर तुम्ही प्लेटमध्ये काढून सॉस अथवा  हिरव्या चटणीसह गरम गरम खायला द्या. हे अत्यंत टेस्टी असून तुमच्या आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही कधीही हे कटलेट्स करून खाऊ शकता. सर्वात महत्त्वाचे  म्हणजे लहान मुलांसाठी हा उत्तम पदार्थ आहे.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक