ADVERTISEMENT
home / Recipes
दिवाळीसाठी बनवा झटपट मावा अनारसा, वेगळी रेसिपी करा ट्राय

दिवाळीसाठी बनवा झटपट मावा अनारसा, वेगळी रेसिपी करा ट्राय

दिवाळी म्हटली की मिठाईची रेलचेल. दिवाळी आली की घराघरात वेगवेगळे मिठाईचे पदार्थ केले जातात. काही अगदी पारंपरिक असतात तर काही आधुनिक असतात. तुम्हाला सर्वांना अनारसा हा अप्रतिम दिवाळीतील पदार्थ तर नक्कीच माहीत असणार. कारण दिवाळीतील लक्ष्मीपूजा शुभेच्छा मराठी या अनारस्यांशिवाय पूर्ण होत नाही. पण त्याला एक वेगळा ट्विस्ट देत एक वेगळा मावा अनारसा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. साधारणतः गावामध्ये अनारसाला पावसाळी मिठाई म्हटली जाते. कारण पावसाळ्यात गरम गरम अनारसा खाण्याची मजा असते.  पण जास्त प्रमाणात दिवाळीत हा पदार्थ बनवला जातो. कारण यामधून अधिक उष्णता शरीराला मिळते. दिवाळीच्या वेळेला थंडी असल्याने याचा अधिक प्रमाणात खाण्यामध्ये उपयोग करण्यात  येतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर अगदी उत्तर प्रदेशातही याचा सणासमारंभाला घरात उपयोग करण्यात येतो. आतून अत्यंत मुलायम आणि मऊ असणारी ही मिठाई तोंडात मस्त विरघळत तोंडाचा स्वाद वाढवते. तुम्ही घरच्या घरीही अनारसा बनवू शकता. शक्यतो अनारसा हा गूळ आणि तांदळाचे पीठ अथवा भोपळ्यापासून बनवला जातो. पण तुम्ही माव्याचा अनारसा कसा बनवायचा याची खास रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

DIY: दिवाळीसाठी घरच्या घरी बनवा सोपी आणि स्वादिष्ट मिठाई

मावा अनारसा बनविण्याचे साहित्य

  • तूप
  • पांढरे तीळ 
  • साखर अथवा गूळ 
  • तांदळाचे पीठ 
  • सुका मेवा (बदाम, पिस्ता, अक्रोड,काजू कापलेले)
  • नारळाचा किस 
  • मावा 
  • पाणी 

अनारसा बनविण्याची पद्धत

अनारसा बनविण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी आहे. आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप याची पद्धत देत आहोत. तुम्ही या पद्धतीने अनारसा बनविल्यास, तुम्हाला अप्रतिम चवीचा मावा अनारसा मिळेल. 

स्टेप 1 – हे बनविण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही अर्धा किलो तांदूळ पाण्यात घालून साधारण 24 तास भिजवून ठेवा.  त्यानंतर हे पाणी गाळून तांदूळ सुकवा.  सुकल्यावर मिक्सरमधून याचे पीठ करून घ्या. त्याचप्रमाणे साखरदेखील वाटून त्याची पावडर करून घ्या.  

ADVERTISEMENT

स्टेप 2 – तांदळाचे पीठ आणि वाटलेली साखर व्यवस्थित मिक्स करून घ्या. जेव्हा एकत्र होईल त्यानंतर यामध्ये  एक अथवा दोन चमचे गूळ कापून मिक्स करा. त्यानंतर किसलेले खोबरे, कापलेला सुका मेवा तुम्ही मिक्स करा. आता हे सर्व पाण्याने व्यवस्थित जाडसर मळून घ्या 

दिवाळीत पहिल्या दिवशी नक्की करुन पाहा हे काही पदार्थ

स्टेप 3 – हे मीठ मळल्यानंतर काही तास म्हणजे किमान 5-6 तास तसंच राहू द्या. हे मीठ हलके होईल आणि त्यानंतर याचा अनारसा पटकन बनवता येईल. आता लहान लहान गोळे बनवा आणि मग त्यात मावा घाला. नंतर हे गोळे तिळामध्ये घोळवा.  तिळामध्ये घोळवल्यावर मग त्याला चपटा आकार द्या. 

स्टेप 4 – गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तूप घाला. हलके गरम झाल्यावर त्यात एक एक अनारसा टाकून मंद आचेवर तळा. कारण जास्त आचेवर अनारसा जळू शकतो. हलक्या हाताने हे तळून घ्या. आतील मावा आणि तांदळाचे पीठ कच्चे राहता कामा नये अशाप्रकारे तळा. टिश्यू पेपरवर अनारसा काढा. हलका ब्राऊन झाला की तुम्ही हा अनारसा काढा. 

ADVERTISEMENT

सोप्या पद्धतीने तुम्ही असा मावा अनारसा बनवू शकता. नेहमीचा अनारसा करण्यासाठी जास्त मेहनत लागते. पण तुम्ही पटकन अनारसा तयार करण्यासाठी ही पद्धत वापरू शकता.  तुम्हाला हवं तर तुम्ही तयार तांदळाचे पीठ आणि तयारी पिठी साखरही वापरू शकता. तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही गूळ किसून तांदळाच्या पिठाच्या तुलनेत वापरू शकता.  

दिवाळीचा खास फराळ, मराठमोळ्या फक्कड रेसिपीज (Diwali Faral Recipes In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT