मिथुन राशींच्या व्यक्तींची आहेत अशी वैशिष्ट्य, कमालीचा असतो सेन्स ऑफ ह्यूमर

मिथुन राशींच्या व्यक्तींची आहेत अशी वैशिष्ट्य, कमालीचा असतो सेन्स ऑफ ह्यूमर

मिथुन राशीच्या व्यक्तींचा जन्म महिना हा 21 मे ते 20 जून समजला जातो. या राशीचा स्वामी ग्रह बुध असतो,  जो आपल्या बुद्धी आणि स्मरणशक्तीशी जास्त संबंधित असतो.  यांचा स्वामी खुद्ध गणपती बाप्पा अर्थात बुद्धीची देवता आहे. या राशीच्या व्यक्ती उत्साही आणि समजूतदार असतात.  तसंच यांच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही.  नाव, पैसा, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी वेळोवेळी या व्यक्तींंना मिळत राहतात. तुमच्या जवळच्या व्यक्तींपैकी कोणी मिथुन राशीचे असेल तर जाणून घ्या  नक्की काय आहेत या राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये आणि कशा  असतात या व्यक्ती. 

जन्मभर एकमेकांना साथ देतात ‘या’ चार राशीच्या व्यक्ती

मिथुन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव (Gemini sign people Positive and Negative Characteristics in Marathi)

प्रत्येक राशीची व्यक्ती ही वेगळी असते आणि त्यानुसार त्याचा स्वभाव आणि वागणूकदेखील असते. जन्मवेळ आणि ठिकाणानुसार या व्यक्तींची रास ठरत असते. मिथुन राशींच्या व्यक्ती नक्की कशा  असतात ते आपण जाणून घेऊया. 

 • बोलतो तर आपण सगळेच. पण बोलणे ही पण एक कला आहे हे मिथुन राशीच्या व्यक्तींच्या बोलण्यावरून कळते. या कलेमध्ये या व्यक्ती मातब्बर असतात.  केवळ आपल्या बोलण्यानेच या व्यक्ती पटकन कोणालाही आपलंसं करून घेतात. लहान लहान गोष्टीही अगदी मनोरंजक करून सांगण्याचं कसब या व्यक्तींमध्ये असतं. 
 • तर दुसऱ्या बाजूला या व्यक्ती जितक्या चांगल्या बोलतात तितकाच जास्त वेळ दुसऱ्याला समजून घेण्यात या व्यक्ती लावतात. ही यांची सर्वात मोठी कमतरता आहे. 
 • मिथुन राशीच्या व्यक्ती अतिशय जिद्दी आणि हट्टी स्वभावाच्या असतात. या व्यक्ती कुशल अधिकारी, चित्रकार, सल्लागार, व्यवस्थापक आणि शिक्षक अथवा डॉक्टर होऊ शकतात. आपल्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधण्याचा यांचा जास्त प्रयत्न असतो. अधिकाधिक संधी मिळविण्याचा आणि दुसऱ्याही देण्याचा या व्यक्ती प्रयत्न करतात. 
 • या व्यक्तींची कमतरता म्हणजे दुसऱ्यांना ज्या गोष्टी करू नका म्हणून सांगितलं जातं तेच या व्यक्ती स्वतः मात्र करतात. अर्थात स्वतःच नियम बनवतात आणि आपल्या मनाप्रमाणे ते बदलातात.  
 • मिथुन राशीच्या व्यक्तींची उंची बऱ्यापैकी जास्त असते.  त्याशिवाय  या व्यक्तींचे डोळे आकर्षक, पातळसर केस, लांब नाक आणि लांब हात असतात. आपल्या बिनधास्त स्वभावासाठी या व्यक्ती ओळखल्या जातात. 
 • दुसऱ्यांना आनंद देण्यातच यांना जास्त आनंद मिळतो. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना कसं आनंदी ठेवायचं हे या व्यक्तींना चांगलं माहीत असतं. कंटाळवाणेपणा हा शब्दच या व्यक्तींच्या शब्दकोशात नाही. कोणतीही हेल्दी चर्चा यांचा मूड चांगला करू शकते. 

'या' राशीच्या व्यक्ती असतात अतिशय आकर्षक, एका भेटीत करतात तुम्हाला आपलंसं

 • मिथुन राशीच्या व्यक्तींना मित्र कमी आणि शत्रू जास्त असतात.  यांच्या वैशिष्ट्यामुळे बरेच लोक यांच्यावर जळतात. त्यामुळे यांना अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे. यांच्यासाठी कन्या, तूळ आणि कुंभ या मित्र राशी असून मेष,  कर्क आणि वृश्चिक या शत्रू राशी आहेत. 
 • परफेक्ट मॅच म्हटलं तर कुंभ आणि मिथुन राशीच्या व्यक्तींचे एकमेकांबरोबर खूपच चांगले पटते. या दोन्ही राशी रोमांचप्रेमी आहेत. यांना आयुष्य मजेने जगता येते.  आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही शब्द, विचार आणि गोष्टींचा आधार घेण्याची यांना गरज भासत नाही. कारण या व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या भावना व्यवस्थित समजून घेतात. दोघेही नेहमी एकमेकांपासून प्रभावित राहतात आणि कायम एकत्र राहतात. 
 • यांची लव्ह लाईफ दुसऱ्यांच्या तुलनेमध्ये जास्तच रोमान्सने भरपूर असते. या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत जरा जास्तच गंभीर असतात आणि रोमान्सच्या बाबतीत एक नंबर असतात.
 • करिअरच्या बाबतीत या व्यक्ती खूपच पुढे असतात. नाव, प्रसिद्धी आणि पैसा या तिन्ही गोष्टी या व्यक्तींना वेळ आल्यावर मिळते. पण तरीही बऱ्याच बाबतीत या व्यक्ती द्विधा मनस्थितीमध्ये असतात. पण या व्यक्ती मेहनतीही असतात. 
 • तसं तर या राशीच्या व्यक्ती समस्यांचं समाधान पटकन काढतात. पण या व्यक्ती जितक्या जास्त बोलक्या असतात तितक्यात दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्यात कमी पडतात. अतिशय उतावळ्या असल्याने कधी कधी या व्यक्तींचा त्याचा परिणाम भोगाव्या लागतो. 

भाग्यशाली क्रमांक – 4, 6, 9

भाग्यशाली वार –  मंगळवार, शनिवार, शुक्रवार।

भाग्यशाली खडा – रुबी

मिथुन राशीचे बॉलीवूड स्टार - सोनम कपूर, करण जोहर, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, आर. माधवन, महेश भट्ट, शिल्पा शेट्टी, डिंपल कपाडिया, अमीशा पटेल, परेश रावल, मिथुन चक्रवर्ती

या राशीच्या व्यक्ती असतात धडाकेबाज, कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहीत

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक