नेहमी त्वचा सुंदर दिसण्यासाठी वापरा अभिनेत्री राधिका आपटेचा ब्युटी फंडा

नेहमी त्वचा सुंदर दिसण्यासाठी वापरा अभिनेत्री राधिका आपटेचा ब्युटी फंडा

राधिका आपटे हे नाव मराठी, हिंदी आणि इंग्रजी कोणत्याही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये नव्याने घ्यायची गरज नाही.  कारण तिने आपल्या अभिनयाने एक दबदबा  निर्माण केला आहे. आपल्या अभिनयासह राधिका फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठीही ओळखली जाते. राधिका नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते आणि राधिका जशी आहे तशीच राहाते आणि तसेच फोटो पोस्ट करत असते. पण त्वचेची काळजी घेण्यासाठी राधिका नक्कीच मेहनत करते. राधिका सावळी असली तरीही खूपच आकर्षक असून तिची त्वचा डागविरहीत आणि चमकदार आहे. त्यामुळे तुम्हालाही अशी त्वचा मिळवायची असेल तर राधिकाच्या रूटिनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपली त्वचा इतकी चांगली राखण्यासाठी राधिका नक्की काय करते ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत.  तुम्हीही राधिका आपटेसारखी त्वचा अशी काळजी घेऊन नक्की मिळवू शकता. राधिका आपल्या त्वचेसाठी केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर न करता जास्तीत जास्त घरगुती पद्धतीचा वापर करते. नक्की काय आहेत या घरगुती पद्धती आणि राधिकाचे ब्युटी सिक्रेट जाणून घेऊया. 

चमकदार त्वचेसाठी टॉमेटो

Instagram

टॉमेटो हा आपल्या त्वचेच्या चमकदारपणासाठी उत्तम मानला जातो. टॉमेटो वापरल्याने त्वचा अधिक चमकदार होते आणि मुलायमही राहाते. आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी राधिका टॉमेो वापरते. आपल्या रोजच्या दुपारच्या जेवणामध्ये  टॉमेटो राधिका खाते. चेहऱ्यावर वयाआधी येणाऱ्या सुरकुत्या नको असतील तर आपल्या खाण्यात टॉमेटोचा समावेश करून घ्यायला हवा. यामुळे सुरकुत्या न येण्याचं प्रमाण अधिक वाढतं. तसंच त्वचा अधिक सुंदर दिसण्यास मदत होते. 

दिवसभर पाणी पिणे

राधिका आपल्या त्वचेच्या काळजीसाठी दिवसभरात खूप पाणी पिते. पाणी पिण्याने त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचा अधिक चमकदार राहते हे तर सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे त्वचा अधिक चांगली राखण्यासाठी हा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय आहे. दिवसभरात राधिका किमान 3 लीटर पाणी पिते. त्यामुळे ती नेहमी आपल्या चाहत्यांनाही हा उपाय करायला सांगते.

ब्युटी स्लिप अर्थात शांत झोप

एका मुलाखतीमध्ये तिने आपल्या त्वचेच्या सिक्रेटबद्दल सांगताना म्हटले की,  तुम्ही नेहमी आनंदी असाल तर तुम्हाला चांगली झोपही लागते आणि मी शांत झोपते त्यामुळेच त्वचा चांगली आहे. जर आनंदी नसाल तर काहीच उपयोग नाही. तुम्हाला तुमची त्वचा चांगली दिसायला हवी असेल तर तुम्ही नेहमी आनंदी राहून आपल्या झोपेचीही काळजी घ्यायला हवी.  शांत झोपल्यास, त्वचेवर काळे डाग पडत नाहीत आणि त्वचेवर वेगवेगळ्या ब्युटी स्किन केअरचा वापरही करावा लागत नाही. 

वयाच्या 51व्या वर्षीही अभिनेत्री भाग्यश्रीसारखी त्वचा हवी असेल तर आहे हे सिक्रेट

सौंदर्य उत्पादनांचा कमी वापरv

राधिका आपटे आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सौंदर्य उत्पादनांचा वापर खूपच कमी करते. केवळ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळीच ती मेकअपचा वापर करते. घरी आल्यानंतर मेकअप लगेच काढून जशी नेहमी त्वचा ठेवायला हवी तशीच ठेवते.  त्वचेला मोकळा श्वास मिळण्याची गरज असते.  त्यामुळे जितका पटकन मेकअप काढणार तितकी त्वचा अधिक चांगली राहणार.  तसंच आपल्या चेहऱ्याासाठी राधिका गुलाबपाण्याचा वापर करते. 

काजल अग्रवालने शेअर केले लग्नातले काही खास क्षण

हेल्दी डाएट

चमकदार त्वचेसाठी हेल्दी डाएट राधिका फॉलो करते. हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन हा तिचा मुख्य  आहार असते. तसंच डाळ भात, पोळी आणि भाजी हे खाणं जास्तीत जास्त खाण्याचा राधिकाचा नियम आहे. यामुळे त्वचा अधिक चांगली राहाते. तसंच डाएटमध्ये राधिका शतावरीचाही वापर करते. शतावरी हे एक फायदेशीर औषधीय वनस्पती आहे. यामध्ये  विटामिन बी 6, फोलेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक,  प्रोटीन आणि फायबर आढळते. शतावरीचे पाणी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.  

अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोलच्या घरी आला नवा पाहुणा

त्वचेसाठी फणसाचा वापर

आपल्या त्वचा  आणि फिटनेससाठी राधिका फणसाचा वापर करते. फणासामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. यामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स, कॅल्शियम, इलेक्ट्रोलाईट्स, प्रोटीन आणि विटामिन्सचे  प्रमाण अधिक  असते. जे चेहऱ्याची सुंदरता वाढविण्यासाठी मदत करते. त्याशिवाय फणसाची बी देखील त्वचेसाठी फायदेशीर ठरते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक