कपाटातील जागा वाचवण्यासाठी या ऑनलाईन गोष्टींची करा अवश्य खरेदी

कपाटातील जागा वाचवण्यासाठी या ऑनलाईन गोष्टींची करा अवश्य खरेदी

 काहीही म्हणा घर कितीही मोठं असलं तरी देखील कपाटात साहित्य पुरतं नाही अशी अनेकांची तक्रार कायम असते.( आता काही जण खरंच ऑरगनाईज असतात. त्यांना जास्त जागा लागत नसेल) काही केले तरी कपाटात सामान काही मावत नाही. अशावेळी तुम्ही किती नवी कपाटं घेणार आणि जुन्या गोष्टी काढून टाकणार. त्यापेक्षा कपाटातील जागा वाचवण्यासाठी तुम्ही असे काही पर्याय निवडायला हवे ज्यामुळे तुमच्या कपाटातील थोडी जागा का असेना वाचेल. शिवाय तुमचे कपाट बऱ्यापैकी आवरल्यासारखे वाटेल. दिवाळीच्या या काळात अनेकांनी साफसफाईला सुरुवात केली असेल तर तुमच्यासाठी या  वस्तू आहेत फारच महत्वाच्या 

हॅंडलूम इकत साडी आणि ओढण्यांची कशी घ्यावी काळजी

मल्टी लेयर हँगर

कपाटात कपडे नीट लावायचे असतील तर हँगरचा वापर करणे नेहमीच सोयीस्कर ठरते.या हँगरमध्ये एकाचवेळी तुम्हाला जास्तीत जास्त साड्या लावता येतात. त्यामुळे साड्यांसाठी हा हँगर एकदम परफेक्ट आहे. कपाटात इस्त्री केलेल्या साड्या यामुळे एकदम छान राहतात. कपडे काढण्यासही यामुळे अडथळा येत नाही. आता याच हँगर्सना तुम्ही तुमच्या ओढण्या, स्कार्फ असे सगळे काही अडकवून ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला स्कार्फ आणि ओढण्या शोधण्यासाठी आणि त्यांची घडी करुन जागा अडवण्याची काहीही गरज नाही. उलट तुम्ही  याच हँगरवर कपडे घडी करुन ठेऊ शकता. 

लग्नासाठी बनारसी साडी खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

Lifestyle

Oxfo 360º Swivel Space Saver Folding Hangers for Clothes Organizer Closet Organizer

INR 97 AT Oxfo 360º

स्पेस सेव्हिंग बॅग्ज

ब्रा-पँटीज किंवा रुमाल अशा छोट्या छोट्या गोष्टी कपाटामध्ये ठेवताना खूप दमछाक होते. त्या फार जागा घेत नसल्या तरी असे कपडे इकडे तिकडे कपाटात विखुरले जातात. अशा कपड्यांना एकत्र ठेवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.  यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये तुम्हाला तुमचे लहान कपडे घडी करुन ठेवता येतात. त्यामुळे तुम्ही या एक ते दोन बँग्ज घेऊन ठेवा. विशेष म्हणजे कपाटाच्या हँगरकडील भागात तुम्हाला हे लावता येतात. त्यामुळे तुम्हाला फार वेगळी सोय करावी लागत नाही. हे स्पेस सेव्हिंग्ज फार महाग नाहीत. त्यामुळे एखादे कव्हर कालांतराने फाटले तरी तुम्हाला टाकून देण्यास काहीच हरकत नाही. तुम्हाला यामध्ये वेगवेगळे रंग आणि प्रकारही मिळू शकतील. 

 

Lifestyle

16 Pockets Multifunction Space Saver Over Door Hanging Wardrobe Wall Bags Rack Hanger Caddy Storage Tidy Organizer

INR 234 AT apkidukan

कानातल्यांचा डब्बा

महिलांच्या ज्वेलरी या कितीही घेतल्या तरी कपड्यांसारख्याच कमी असतात. कानातले नीट राहावे म्हणून तुम्ही ते फार फार डब्यात एकत्र करुन ठेवत असाल. असे एकत्र कानातले ठेवले की, त्याचे जोड सापडताना फार अडचण होते.नेमकं घाईत असतानाच आपल्याला कानातले सापडत नाही. शिवाय एकाच डब्यात तुम्ही कानातले ठेवले तर इमिटेशन ज्वेलरीवरील रंग जाण्याची शक्यता असते. तसेच कानातल्यांचे पारंपरिक ते मॉर्डन, लग्नात घालण्यासाठी खास डिझाईन्स असतात. त्यामुळे कानातल्यांसाठी तुम्ही असे डब्बे खरेदी करु शकता. ज्यामुळे तुम्हाला डबे अगदी व्यवस्थित ठेवता येतात. एका डब्यात एकावेळी किमान `15 ते 20 कानातले राहतात. बाहेज जातानाही तुम्ही यातले काही छोटे डब्बे नेऊ शकता. ज्यामध्ये तुमचे कानातले अगदी नीट राहतील.


आता या दिवाळीत किमान हे तीन स्वस्तातले बदल करा आणि कपाटातील थोडी जागा वाचवा. 

 

या दिवाळीसाठी वापरा खास आकर्षक दागिने, निवड करा अशी

 

Lifestyle

FreshDcart Multipurpose Plastic Jewellery Organizer and Kit Earring Organiser Storage Box

INR 399 AT FreshDcart