चॅटिंग हा हल्ली अनेकांच्या आवडीचा विषय झाला आहे. एखाद्या व्यक्तीशी आपण जितकं समोरुन बोलत नाही. तितकं चॅटिंगमधून बोलतो. मनातील सगळ्या भावना आपण यातून व्यक्त करतो. खासगी विषय, रोमँटीक बोलणे अनेकदा चॅटच्या माध्यमातून होत असते. पण काही व्यक्तींसोबत चॅटिंगमध्येही आपला बाँड जुळत नाही. तर काहींची चॅटिंग स्टाईल ही आपल्याला कायम आकर्षित करुन घेतात. पण या चॅटिंग स्टाईलला अजिबात भुलू नका. कारण अशा बोलण्यातून तुम्ही फसवणूक होऊ शकते. ऑनलाईन कोणत्याही नव्या माणसाशी चॅट करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. कारण या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची कोणाकडूनही फसवणूक होणार नाही.
ऑनलाईनमध्ये किती फ्रॉड होतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ऑनलाईन जर तुम्हाला चॅटसाठी नवीन रिक्वेस्ट आली असेल. ती रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करण्याआधी त्या व्यक्तीची प्रोफाईल जाऊन बघा. कारण त्यावरुन अनेक गोष्टी स्पष्ट होतात. जर त्या प्रोफाईलमध्ये काहीच खरे वाटत नसेल तर तुम्ही अशा प्रोफाईलशी फारसा संबंध ठेवणे टाळा.
एखाद्या व्यक्तीची प्रोफईल योग्य वाटत असेल आणि तुमच्या फ्रेंडसर्कलपैकी कोणतीतरी ओळखीची असेल तरी देखील अशा व्यक्तीशी पटकन बोलायला जाऊ नका. अशा व्यक्तींशी बोलतानाही तुम्ही याची काळजी घ्या.
काही जणांना उगाचच काहीपण मेसेज पाठवायची सवय असते. काही मेसेज हे टाईप केलेले असतात. अशा मेसेजना मुद्दामून रिप्लाय करायला अजिबात जाऊ नका. उदा. सणांच्या शुभेच्छा… कारण या शुभेच्छा सगळ्यांना पाठवल्या जातात. तुम्ही जर अशांना उगाच मेसेज केला तर कारण नसताना तुम्ही उगाचच संपर्क वाढवत असतात.
काही जणांना उगाचच गुड मॉर्निंग, ब्युटीफुल असे गोड काही मेसेज करण्याची खूप सवय असते. अशी लोक कोणीतरी मेसेजला रिप्लाय करण्याची वाटच पाहात असतात. अशांना रिप्लाय दिल्यानंतर उगाचच त्या व्यक्ती तुम्हला सतत मेसेज करत राहतात.
एखाद्या व्यक्तीशी तुम्ही काही दिवसांपासून चॅट करत असाल. ती व्यक्ती तुमच्या कोणत्याही परिचयाची नसताना आणि त्यांच्या फोटोची कोणतीही खात्री नसताना तुम्ही त्यांच्याशी अधिक बोलायला जाऊ नका. एखादे संभाषण सुरु झाले असेल तर खात्री पटल्यानंतर तुम्ही कमी करा.
काही लोक संभाषणातून तुमच्या सौंदर्याची तारीफ करत असतील, तुमच्यावर प्रेम केल्याचा दावा करत असतील. तर अशा व्यक्तींवर पटकन विश्वास ठेवू नका. काहींचे गोड बोलणे आणि सतत तुमच्या सौंदर्याची तारीफ करणे याकडे लक्ष देऊ नका. अशा व्यक्ती तुम्हाला कमकुवत करण्याचे काम करतात. तुमच्या आयुष्यात जर प्रेमाचा कोपरा हळवा असेल तर तुम्ही या गर्तेत अधिक आत जाऊ शकता. त्यामुळे योग्य पद्धतीने अशा व्यक्तींशी बोला.
जर तुम्ही एखाद्या प्रसिद्धीच्या क्षेत्राशी निगडीत असाल तर तुम्हाला अशा पद्धतीचे मेसेज आणि चॅटिंग रिक्वेस्ट येणे स्वाभाविक आहे. अशावेळी माहीत नसलेल्या लोकांशी चॅट करु नका.
पैशांची मागणी करणे आणि लुटणे हा नवा प्रकार सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. तुम्हाला अनोळखी व्यक्तींशी बोलायचे असेल तरी या ट्रॅपला अजिबात भुलू नका. कारण या लोकांना तुम्हाला लुबाडणे इतकेच माहीत असते. फार मोठी रक्कम नाही पण अगदी 1,000 रुपयांपासून याची सुरुवात होते.
जर तुम्ही ऑनलाईन डेटिंगवर विश्वास ठेवत असाल तर चॅट करा पण असे करताना लगेचच एखाद्या व्यक्तीला भेटायला मुळीच जाऊ नका. कारण एखाद्या अनोळख्या व्यक्तीला भेटणे हे तसे धोक्याचे असते. जो पर्यंत तुम्हाला पूर्ण विश्वास होत नाही तोपर्यंत मुळीच भेटू नका. ऑनलाईन ओळखीवरुन अनेकांची लग्न झालेली आहेत. पण त्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टींची योग्य माहिती घेणे गरजेचे असते.
ऑनलाईन चॅटिंग करताना एखादी व्यक्ती जर तुम्हाला फार खासगी आणि सेक्शुअली बोलत असेल आणि त्याचे बोलणे तुम्हाला खटकत असेल तर तुम्ही मुळीच चॅट वाढवू नका. त्या व्यक्तीला तुम्ही तिथेच ब्लॉक करा आणि याची माहिती इतरांनाही द्या.कारण
आता चॅटिंग करताना या गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवा.