रेडिमेड ब्लाऊज विकत घेताना या गोष्टींची घ्या काळजी

रेडिमेड ब्लाऊज विकत घेताना या गोष्टींची घ्या काळजी

हल्ली एखादी साडी घ्यायची म्हणजे ब्लाऊजची पूर्वतयारी करणे फारच महत्वाचे असते. ब्लाऊजची पूर्वतयारी या करता की, टेलर शोधणे, ब्लाऊजसाठी पॅटर्न निवडणे आणि फिटिंह चांगली होण्यासाठी प्रार्थना करणे. कारण महागड्या साडीचा जर ब्लाऊज बिघडला तर मात्र अनेकांच्या आनंदावर विरजण पडते. म्हणूनच हल्ली रेडिमेड मिळणारे ब्लाऊजच घेणे अनेक जम पसंत करतात. वेगवेगळ्या पॅटर्नचे आणि मिक्स मॅच करुन घालता येणारे हे ब्लाऊज अनेकांना एकाचवेळी अनेक वेगवेगळ्या साड्यांवर घालता येतात. रेडिमेड ब्लाऊज घेताना तुम्ही त्याची निवड कशी करावी आणि कोणत्या पॅटर्नचे ब्लाऊज निवडावे ते आज आपण जाणून घेऊया. 

जरी वर्कपेक्षाही शोभून दिसते गोटापत्ती वर्क, जाणून घ्या हा ट्रेंड

रेडिमेड ब्लाऊज म्हणजे काय?

Instagram

तुमच्या अंदाजित मापानुसार तयार केलेले ब्लाऊज म्हणजे रेडिमेड ब्लाऊज. एखाद्या ठराविक पॅटर्न, डिझाईन्स आणि रंगाचा उपयोग करत ब्लाऊज तयार केले जातात. तुम्हाला तुमच्या साईजनुसार हे ब्लाऊज निवडायचे असतात. तुमचे माप एकदा परफेक्ट माहीत असेल तर तुम्हाला हे ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतात. 

पवित्रा पुनियाचे हॉट बॅकलेस ब्लाऊज डिझाईन्स, तुम्हालाही पाडतील भुरळ

रेडिमेड ब्लाऊजची खरेदी करताना

  • रेडिमेड ब्लाऊज  खरेदी करताना ब्राच्या साईजवरुन निवडायचे असतात. ब्लाऊज हे नेहमी परफेक्ट फिटिंगचे असायला हवे. ते सैल असून चालत नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी तुमची ब्राची परफेक्ट साईज कोणती हे जाणून मगच निवडलेल्या ब्लाऊजची खरेदी करा. 
  • रेडिमेड ब्लाऊजमध्ये वेगवेगळे पॅटर्न असतात. अगदी हॉल्टर नेकपासून डीपनेक असे अनेक प्रकार तुम्हाला यामध्ये मिळतात. साईजनुसार याच्या नेकचा आकार बदलत असला तरी बरेचदा हा गळा मोठा होतो. ही गोष्ट लक्षात ठेवून  मगच याची निवड करा. 
  • रेडिमेड ब्लाऊजमध्ये खूप वेळा स्किव्हलेस ब्लाऊज असतात. त्यासोबत तुम्हाला लावण्यासाठी बाह्याही मिळतात.जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हातही लावू शकता. त्यामुळे तुम्हाला रेडिमेड ब्लाऊजचे असे फायदे असतात.
  • रेडिमेड ब्लाऊजमध्ये वेगवेगळे रंग मिळतात. जर तुम्हाला यामध्ये वेगवेगळे रंग घ्यायची इच्छा असेल तर एकाच पॅटर्नचे घेण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे पॅटर्न घ्या. म्हणजे तुम्हाला ते वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतील. 
  • ट्रेडिशनल आणि वेस्टर्न असे दोन्ही प्रकारचे ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवे. कारण ते तुम्हाला आलटून पालटून सगळ्या साड्यांवर घालता येतात. 

वर्षानुवर्ष टिकण्यासाठी अशी घ्या बनारसी साडीची काळजी

अशी करा स्टाईलिंग

Instagram

  1. पैठणी आणि पारंपरिक अशा साड्यांवर हल्ली मिक्स मॅच ब्लाऊज घातले जातात. त्यामुळे त्या साडीचा लुक अधिक उठून दिसतो. असे ब्लाऊज निवडताना तुमच्या शरीरयष्टीचा आणि वयाचाही विचार करा. त्यानुसार तुम्ही ब्लाऊजची स्टायलिंग करा. 
  2. लग्नासाठी हेव्ही प्रकारातील ब्लाऊज हे अधिक उठून दिसतात. तुम्ही प्लेनसाडी खरेदी केली असेल तर त्यावर हेव्ही रेडिमेड ब्लाऊज घ्या तो तुम्हाला अधिक खुलून दिसतो. 

रेडिमेड ब्लाऊजची किंमत

हल्ली साध्या ब्लाऊजची शिलाई ही 200 रुपयांपासून पुढे आहे. पॅटर्न बदलला की, शिलाई वाढत जाते. रेडिमेड ब्लाऊज हे तुम्हाला अगदी 500 रुपयांपासून मिळतात. ते पुढे 2,500 रुपयांच्या वर जातात. हल्ली अनेक ठिकाणी रेडिमेड ब्लाऊजचे खास ब्युटीक असतात. तुम्हाला अगदी बेसिक ब्लाऊजपासून यामध्ये अनेक प्रकार मिळतात. 


आता ब्लाऊज खरेदीला जाण्याआधी रेडिमेड ब्लाऊजचा पर्याय नक्की ट्राय करा.