या दिवाळीसाठी वापरा खास आकर्षक दागिने, निवड करा अशी

या दिवाळीसाठी वापरा खास आकर्षक दागिने, निवड करा अशी

दिवाळी म्हटली की खूप गोष्टींची खरेदी. घरात सगळ्यांना नवीन कपडे आणि अगदी दागिन्यांचीही खरेदी  आलीच. खरं तर आता दागिन्यांची खरेदी ही सणापुरती मर्यादित राहिली नसली तरीही दिवाळी म्हटली की खास दागिन्यांची खरेदी ही आलीच. आजकाल तर दागिन्यांवर वेगवेगळ्या ऑफर्सही असतात. आता सोन्याचे दागिने असोत वा अन्य दागिने असो खरेदी ही खरेदीच असते. दिवाळीला वेगवेगळ्या प्रकारचे  दागिने आपण वापरू शकतो  आणि खरेदी करू शकतो. त्याचीच काही माहिती. 

आर्टने प्रभावित दागिने

भारतामध्ये अनेक आर्किटेक्ट आणि बऱ्याच हेरिटेज असलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे याचा उपयोग दागिन्यांच्या डिझाईनमध्ये करून ओरिसामधील जुन्या पत्ताचित्रावरून प्रभावित असे आर्ट दागिने यावर्षी रिलायन्स ज्वेल्सने (Reliance Jewels) बनवले आहेत. पारंपारिक आणि आधुनिकतेचा मेळ घालून बनविण्यात आलेला हा सोन्याचा नेकलेस नक्कीच तुम्हाला आवडेल. तसंच यावेळी टेंपल डिझाईन ज्वेलरीदेखील आपल्याला इथे पाहायला मिळेल. तुम्हाला युनिक आणि वेगळ्या तऱ्हेचे दागिने हवे असतील तर नक्कीच रिलायन्स ज्वेल्समध्ये या दिवाळीसाठी तुम्ही खरेदीला जाऊ शकता. यावर हलकासा मेकअप केल्यावर तुम्ही दिवाळीसाठी एकदम तयार. असा मस्त मेकअप करण्यासाठी तुम्ही वापरू शकता MyGlamm चे आयशॅडो पॅलेट आणि लिपस्टिक. 

नववधूसाठी ‘पर्ल पर्ल’ दिल के पास (Pearl Jewellery Designs In Marathi)

Beauty

Manish Malhotra 4 in 1 Eyeshadow Palette - Paparazzi

INR 1,250 AT MyGlamm

Beauty

Manish Malhotra Hi-Shine Lipstick - Sunset Sienna

INR 950 AT MyGlamm

ऑक्सिडाईज्ड दागिने

Limeroad

आजकाल वेगवेगळ्या साड्यांवर आणि कुडत्यांवर ऑक्सिडाईज्ड दागिने घालण्याचा ट्रेंड आहे.  तुम्हाला बाजारात  विविध असे दागिने दिसतील. ऑक्सिडाईज्ड हे खरंतर चांदीच्या दागिन्यांमध्येही दिसून येते.  पण इमिटेशन ज्वेलरी आजकाल जास्त  ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे चांदीऐवजी पितळ अथवा कांस्य धातूचा वापर करून हे दागिने बनवले जातात. यामध्ये अनेक डिझाईन्स आणि व्हरायटी मिळतात. अगदी मांगटिकापासून ते पायातील पैंजणांपर्यंत सर्व काही यामध्ये दिसून येते. लाईमरोड (Limeroad) अथवा अन्य काही फॅशन साईट्सवर तुम्हाला ज्वेलरी सेक्शनमध्ये भरपूर पर्याय तुम्हाला उपलब्ध होतील. 

कोणतेही दागिने ठेवायचे असतील चमकदार, तर करू नका 'या' चुका

मिरर ज्वेलरी

सध्या मिरर ज्वेलरी हा प्रकार सुद्धा ट्रेंडमध्ये आहे. ऑनलाईन पोर्टलवर याची विक्री जास्त प्रमाणात होताना दिसते.  एखाद्या आकारातील आरसा आणि त्याला बाजूने लावलेल्या चैन्स, गोंडे, घुंगरू हे दिसायला खूपच  आकर्षक दिसतं. दिवाळीला तुम्ही पारंपरिक वेशभूषा करणार असाल तर तुम्हाला हा वेगळा पर्याय नक्कीच वापरता येईल. साधारण 100 रुपयांपासून तुम्हाला हे दागिने बाजारात मिळतात. तुम्हाला सोन्याने मढायचं नसेल तर अशा वेगळ्या दागिन्यांचाही विचार करू शकता. 

‘नथ’ घातल्याशिवाय महाराष्ट्रीयन साजशृंगार अपूर्ण, पाहूया सध्याचा Trend

कुंदन दागिने

कुंदन आणि मोती असे मिक्स्चर अथवा कुंदनही साडी अथवा वेगवेगळ्या पारंपरिक कपड्यांवर शोभून दिसते. विशेषतः कुंदनचे चोकर्स तुम्हाला साडीवर खूपच सुंदर दिसतात. त्यामुळे या दिवाळीसाठी काही वेगळ्या दागिन्यांचा विचार करत असाल तर तुम्ही कोणती साडी घेतली आहे अथवा कोणता ड्रेस घालणार आहात त्यानुसार कुंदनचे चोकर्स तुम्ही निवडू शकता. अगदी गळ्याभोवती असणारा हा कुंदना चोकर नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेतो. 

बोहेमिअन दागिने

हिरे, मोती, सोने आणि चांदी अशा सर्व मौल्यवान धातूंपासून बनवलेले दागिनेच दिवाळीला वापरायला हवेत असं सगळ्यांना वाटतं.  पण बोहेमिअन दागिने हे वेगळेच असतात. काळपट असणारे आणि मोठे भरगच्च  असेल हे दागिनेदेखील सध्या ट्रेंडमध्ये आहेत. पारंपरिक दागिन्यांना पर्याय म्हणूनदेखील याचा वापर करता येतो. कोणत्याही कपड्यांवर तुम्हाला हे  परिधान करता येतात आणि मुळात कोणत्याही कपड्यांवर हे दागिने शोभून दिसतात. तसंच जुने दागिने अथवा जुने डिझाईन नको असं आजकालच्या तरूण मुलींंना वाटत असेल तर नक्कीच हा पर्याय उत्तम आहे. शॉपिंग स्ट्रीट अथवा कोणत्याही ऑनलाईन पोर्टल्सवर हे दागिने तुम्हाला खरेदी करता येतात. त्यासाठी कोणत्याही विशिष्ट दुकानात जायची गरज भासत नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक