ADVERTISEMENT
home / डेकोर आयडिया
लग्नासाठी वेडिंग थीमचा विचार करताय, तर नक्की पाहा या थीम्स

लग्नासाठी वेडिंग थीमचा विचार करताय, तर नक्की पाहा या थीम्स (Wedding Theme In Marathi)

दिवाळी संपली अर्थात तुळशीचं लग्न झालं की लग्नाचा हंगामही सुरू होतो. आजकाल वेडिंग थीम ट्रेंडमध्ये आहे. आपल्या लग्नात काहीतरी खास असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं.  त्यामुळे सर्वात पहिले सुरूवात केली जाते ती वेडिंग थीमने. आपल्या आवडीनुसार वेडिंग थीम ठेवावी अथवा वेगळी काहीतरी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. काही ठिकाणी लग्नाचा भपका असतो तर काही जणांना साधं आणि सोबर डिझाईन अथवा थीम हवी असते. तुम्हालाही तुमच्या लग्नासाठी कोणती थीम ठेवायची हे कळत नसेल तर काही सुंदर आणि सोप्या डिझाईन्सबाबत आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत. तुम्ही या थीमचा वापर करून तुमचे लग्न अधिक सुंदर आणि वेगळे नक्कीच करू शकता. जाणून घेऊया या थीम्सबाबत. 

विंटेज वेडिंग थीम

Wedding Theme In Marathi

Instagram

विंटेज वेडिंग थीम या नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की, या थीममध्ये सर्व काही जुन्या पद्धतीनुसार असेल. सध्या ही वेडिंग थीम खूपच ट्रेंडमध्ये आहे. विंटेज खुर्ची, टेबल, लग्नाचा मंडप, सजावट हे दिसायला खूपच युनिक दिसते आणि सर्वात वेगळी वेडिंग थीम आहे. यासाठी बरेचदा राजांचे महाल, फाईव्ह स्टार हॉटेल अथवा रिसॉर्टची निवड करण्यात येते आणि पूर्वीच्या पद्धतीनुसार याची सजावट करण्यात येते. इतकंच नाही तर लग्नाच्या शेवटी मुलीची पाठवणी करतानाही विंटेज कारचा उपयोग केला जातो. यामुळे तुमचे लग्न अधिक युनिक आणि उठावदार तर दिसतेच. पण कायम जन्मभर लक्षात राहणारी ही थीम आहे.

ADVERTISEMENT

गार्डन वेडिंग थीम

Wedding Theme In Marathi

Instagram

गार्डन वेडिंग थीमही आजकाल जास्त प्रमाणात प्रचलित आहे. झाडांची सजावट, त्यावर करण्यात आलेले लायटिंग, टेबल आणि कंदीलाची सजावट, तसंच गार्डनच्या आजूबाजूला करण्यात आलेली अप्रतिम सजावट हे सर्व या वेडिंग थीमला अधिक आकर्षक आणि सुंदर दर्शवतात. तुम्हाला गार्डनमधील हिरवळ आणि झाडांची आवड असेल आणि खुल्या आभाळाखाली लग्न करण्याची इच्छा असेल तर ही गार्डन वेडिंग थीम नक्कीच तुमच्यासाठी खास ठरते. तुमची ही थीम तुमच्या पाहुण्यांनाही नक्कीच आवडेल यात शंका नाही.

मुंबईतील ‘या’ लई भारी बँक्वेट हॉलमध्ये थाटामाटात करा लग्न

ADVERTISEMENT

रॉयल वेडिंग थीम

Wedding Theme In Marathi

Instagram

रॉयल वेडिंग थीममध्ये लग्न हे एखाद्या रॉयल स्थळावर केले जाते. उदाहरणार्थ एखादा राजवाडा, किल्ला अथवा अन्य काही ठिकाणी. या थीममध्ये राजेशाही थाटामध्ये लग्न करण्यावर भर दिला जातो.  अगदी तुमच्या स्थळापासून ते तुमच्या कपड्यांपर्यंत सर्व काही रॉयल थाटातच असते. इतकंच नाही तर लग्नातील जेवणाचा बेतही अगदी रॉयल असतो. ही थीम पैशाच्या दृष्टीने जरी महाग वाटत असली तरीही जर तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांच्या उपस्थितीमध्ये लग्न करायचे असेल तर तुम्ही नक्की ही रॉयल वेडिंग थीम आपल्या लग्नासाठी निवडू शकता. 

लॉकडाऊनमध्ये करत असाल लग्न तर घ्या या गोष्टींची खास काळजी

ADVERTISEMENT

ग्रीन वेडिंग थीम

Wedding Theme In Marathi

Instagram

आजकाल कोरोनामुळे अनेक लग्न अगदी कौटुंबिक पद्धतीने होत आहेत. पण त्यातही ग्रीन वेडिंग थीम ही संकल्पना जास्त निवडली जात आहे. या वेडिंग थीमनुसार पाहुण्यांना बोलाविण्यासाठी ई-मेल, व्हॉट्स अप आणि फोनचा वापर केला जातो. इतकंच नाही तर या लग्नाच्या थीममध्ये प्लास्टिक अथवा भांड्याचा अथवा पॉलिथिनचा वापर करण्यात येत नाही. या ग्रीन वेडिंग थीममध्ये नवरा आणि नवरीचे कपडेही हिरव्या रंगाचे असतात जे निसर्गाशी निगडीत आहे. तुम्हाला निसर्गाबद्दल प्रेम असेल तर तुमच्यासाठी ही वेडिंग थीम परफेक्ट आहे. 

घरात लग्नकार्य आहे, मग मुंबईतील हे ‘वेडिंग प्लॅनर्स’ तुमच्यासाठी आहेत बेस्ट

ADVERTISEMENT

फ्लोरल वेडिंग थीम

Wedding Theme In Marathi

Instagram

फुलांच्या सहवासातील लग्न कोणाला आवडणार नाही? सध्या फ्लोरल वेडिंग थीमही ट्रेंडिंगमध्ये आहे. वेगवेगळ्या फुलांचा उपयोग करून संपूर्ण स्थळ सजवले जाते आणि इतर दागिन्यांपेक्षा नवरा आणि नवरीही फुलांचे दागिने घालण्याला प्राधान्य देतात. निसर्गातील वेगवेगळ्या फुलांचा उपयोग करून ही थीम साकारण्यात येते. नवरा आणि नवरीच्या आवडीनुसार ही थीम करण्यात येते आणि संपूर्ण दिवस असाच फुलांच्या थीमवर व्यतित करण्यात येतो. निसर्गाच्या सान्निध्यात लग्न करण्यावर भर दिला जातो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

24 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT