ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
दिवाळीला चेहऱ्यावर चमक आणा चॉकलेट कॉफी स्क्रबने, देतील अप्रतिम लुक

दिवाळीला चेहऱ्यावर चमक आणा चॉकलेट कॉफी स्क्रबने, देतील अप्रतिम लुक

दिवाळीसाठी प्रत्येकाला खास दिसायचं आणि चेहऱ्यावर चमक तर पाहिजेच. मग अशावेळी जर पार्लरला जायला वेळ नसेल तर सध्या बाजारात असणारे अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध  असतात. विशेषतः घरच्या घरी स्क्रब करणे.  सध्या चॉकलेट कॉफी स्क्रबची बाजारामध्ये चलती आहे. कॉफी आपल्या त्वचेला अधिक उजळपणा मिळवून देण्यास मदत करते. कॉफीमध्ये असणारे गुण हे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. आपल्याकडे त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उत्पादनं असतात आणि अनेक ब्रँड्सही. काही उत्पादनं #POPxo टीमसाठी द ब्युटी कंपनी (The Beauty Co.) यांनी पाठवली होती आणि आम्ही ही उत्पादनं वापरून पाहिली. आम्हाला आलेला या उत्पादनांचा अनुभव आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. कोणतीही उत्पादनं वापरायची म्हटलं की आपल्या त्वचेला काही हानी तर पोहचणार नाही ना असा पहिला प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. तर या सगळ्याची उत्तरं तुम्हाला या लेखाद्वारे आम्ही देत आहोत. ज्यामुळे तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देताना मस्त ग्लोईंग चेहराही मिळेल.

फेसवॉश (Chocolate and Coffee Face Wash)

आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला फेसवॉशची गरज भासतेच. पण खरंच याची आवश्यकता असते का? तर होय. नेहमीच्या साबणाने त्वचा अधिक खराब होते. त्यापेक्षा फेसवॉशने चेहरा अधिक चांगला राहण्यास मदत मिळते. या चॉकलेट आणि कॉफी फेसवॉशच्या वापराने चेहरा अधिक मऊ आणि मुलायम होत असून इतर फेसवॉशच्या तुलनेत चेहऱ्यावर उजळपणा जास्त काळ टिकून राहातो असे लक्षात आले. यामध्ये चॉकलेट आणि कॉफीचा सुगंध व्यवस्थित मेळ असून चेहरा जास्त वेळ ताजा राहण्यास मदत  मिळते. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावर प्रदूषण जमा झाल्यास चेहऱ्यावरील विषारी पदार्थ काढून टाकण्यास याची मदत मिळते कारण हा फेसवॉश डिटॉक्सिफाईंग असून यामुळे चेहऱ्याला मॉईस्चरही प्राप्त होते कारण यामध्ये मॉईस्चराईजरचे प्रमाण मिक्स करण्यात आले आहे. 

बॉडी वॉश (Chocolate and Coffee Boday Wash)

आजकाल बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऐकू येत असेल की, आंघोळ करण्यासाठी साबणापेक्षा बॉडीवॉशचा  अधिक वापर करण्यात येतो. साबणाने त्वचा पटकन कोरडी होते त्यामुळे बॉडी वॉशचा जास्त प्रमाणात वापर करण्यात येतो. द ब्युटी कं. च्या या बॉडी वॉशमध्ये केमिकल्स वापर न केल्याने तसंच चॉकलेट आणि कॉफीचे गुणधर्म मिक्स असल्याने बराच काळ याचा सुगंध टिकून राहातो आणि त्वचाही पटकन कोरडी पडत नाही. त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे गुण यामध्ये असल्याचे वापरल्यानंतर आम्हाला जाणवले. 

कॉफी स्क्रब (Coffee Scrub)

हा कॉफी स्क्रब व्यवस्थित स्क्रबप्रमाणे असून तुम्ही याचा उपयोग चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर करू शकता.  स्क्रबमुळे तुमची डेड स्किन निघून जाण्यास मदत होते आणि दिवाळीला तुम्हाला इन्स्टंट ग्लो हवा असेल तर तुम्ही याचा नक्की उपयोग करून घेऊ शकता. तसंच तुम्ही याचा नियमित वापर केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्याचा दावा कंपनीने केला आहे. पण आम्ही वापरल्यानंतर याचा चांगला परिणाम आम्हाला दिसून आला. कॉफीचा सुगंध तर आहेच. पण या स्क्रबनंतर चेहरा अधिक मऊ आणि मुलायम झालेला दिसून आला.  तसंच चेहऱ्यावरील थकवाही दिसेनासा झाला. 

ADVERTISEMENT

हिवाळ्यात सनस्क्रिन वापरणं आहे गरजेचं, जाणून घ्या कारणं

चॉकलेट कॉफी फेसमास्क (Chocolate Coffee Face Mask)

बऱ्याचदा कामातून स्वतःसाठी वेळ काढणं कठीण होऊन जातं. पण काम करता करता तुम्ही स्वतःच्या त्वचेची नक्कीच काळजी घेऊ शकता. द ब्युटी कं. चा हा चॉकलेट कॉफी फेसमास्क तुम्ही लावा आणि साधारण 5-7 मिनिट्स तसाच चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर अप्रतिम चमक दिसून येईल. हा त्वचेसाठी अत्यंत स्मूथ असून लावायलादेखील सोपा आहे. तुम्ही हा लावल्यानंतर तुमचे कामही करत बसू शकता. फक्त संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी थोडी काळजी घ्यावी. कारण हा फेसमास्क लावल्यानंतर कदाचित तुम्हाला थोडीशी जळजळ त्वचेवर होऊ शकते.

डाळिंबाच्या या घरगुती फेसपॅकने मिळेल मुरूमांपासून सुटका

फेस स्क्रब (Face Scrub)

हा केवळ तुम्ही चेहऱ्यावर वापरू शकता. हा स्क्रब क्रिमप्रमाणे असून यामध्ये चॉकलेटचा जास्त सुगंध आणि गुणधर्म असल्याचे दिसून आले. त्वचेला गरजेचे असणारे मॉईस्चर यामध्ये असून कॉफी पावडर आणि अक्रोडच्या पावडरपासून हे तयार करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या  त्वचेसाठी हे उत्तम कॉम्बिनेशन ठरते. तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स, व्हाईहेड्स, पोअर्समधील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी हे उत्तम असून तुमची त्वचा अधिक स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक घटकांनीयुक्त निस्सी स्किन केअर

बॉडी बटर (Body Butter)

काही जणांना बॉडी बटरचा नक्की काय उपयोग करण्यात येतो हेच माहीत नसतं. पण तुमची त्वचा अधिक हायड्रेट ठेवण्यासाठी आणि कोरडी पडू न देण्यासाठी बॉडी बटरचा वापर करता येतो. द ब्युटी कं. चे चॉकलेट अँड कॉफी बॉडी बटर हे क्रिमी आणि अतिशय स्मूथ आहे. तुमच्या शरीराला पोषण देण्याचे काम हे व्यवस्थित करते. एक आठवडा याचा वापर केल्यानंतर आलेला हा अनुभव आहे. 24 तास तुमच्या शरीराला हायड्रेट करण्याचे काम हे व्यवस्थित करते. तुम्हाला त्वचेला चांगली चमक मिळवून द्यायची असेल तर तुम्ही नक्की या दिवाळीला याचा वापर करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

08 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT