आता तुळशीच्या लग्नानंतर सुरु होणारी लग्नसराईची लगबग पहायला मिळत आहे. कोरोनाचे सावट सर्वत्र पहायला मिळत असले तरी देखील नियमांचे पालन करून लग्न सोहळा करण्याची मुभा देण्यात आली आहे. आयुष्यात एकदाच येणारे हे क्षण कायमस्वरुपी स्मरणात रहावे याकरिता या सोहळ्यांमध्ये आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्याकरिता आपलं सौंदर्य खुलविण्यासाठी अनेक गोष्टी करण्यात येतात. या लेखाच्या माध्यमातून आपल्याला उत्सव तसेच लग्नसराईच्या दिवसांमध्ये सौंदर्य खुलविणा-या काही खास टिप्स आम्ही देत आहोत. डॉ रिंकी कपूर, द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ यांनी काही खास टिप्स ‘POPxo मराठी’ च्या वाचकांसाठी दिल्या आहेत. याचा नक्की तुम्ही लग्नाच्या वेळी वापर करा तुम्हाला फायदाच होईल.
लग्नसराईमध्ये असे खुलवा सौंदर्य - महत्त्वाच्या टिप्स
Shutterstock
स्किन टोनिंग करणे आवश्यक आहे. सकाळी आणि संध्याकाळी मॉइश्चरायझिंग करणे ही त्वचेच्या बर्याच समस्यांपासून दूर ठेवू शकते. सीटीएम रूटीनला टाळू नका. आठवड्यातून एकदा तरी एक्सफोलिएट करण्यास विसरू नका.
दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी प्यावे जेणेकरून तुमचे शरीर हायड्रेटेड राहील.
मिठाईचे अतिप्रमाणत सेवन करू नका. कॉफी आणि चहाचे सेवन नियंत्रित ठेवा. तुमची त्वचा जितकी हायड्रेटेड राहील तितके तुमचे सौंदर्य आणखी खुलून दिसेल.
आपण एखादे उत्पादन त्वचेवर लावण्यास सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला त्याची पॅच टेस्ट करून पहा. त्याने तुमच्या त्वचेवर काही दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. खरेदी करण्यापूर्वी सौंदर्य-प्रसाधने तपासून पहा.
व्यायाम चुकवू नका. व्यायामाची दिनचर्या बनवा आणि स्वतःसाठी वेळ काढा. घरकामांमधूनही शारीरिक हालचाल होईल याची खात्री करा.
फोन, टीव्ही, टॅब्लेट आणि लॅपटॉपद्वारे उत्सर्जित केलेल्या निळ्या प्रकाशापासून आपल्या त्वचेचे संरक्षण करा आणि सनस्क्रीनचा वापर करा. त्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेची होणारी हानी रोखता येईल.
रात्री पुरेशी झोप घ्या. जेणेकरून आपली त्वचा दिवसा थकलेली दिसणार नाही. अन्नाचे सेवन करताना त्यातील पौष्टिक घटकांचा विचार करा. दही, संत्री, पपई, हिरव्या भाज्या आणि ताजी फळे आणि निरोगी आहाराचा समावेश करा.
शीट मास्क वापरणे हा सोपा पर्याय आहे आणि त्यात कोरफड, व्हिटॅमिन सी, ग्रीन टी, टी ट्री ऑईल, सिरामाइड्स आणि हॅल्युरॉनिक एसिड सारख्या घटकांचा समावेश आहे ज्यामुळे त्वचा चमकदार दिसू शकते.
आपल्या त्वचाविकार तज्ज्ञास भेट देऊन तुमच्या त्वचेची चमक वाढविण्यासाठी आपण मायक्रोडर्माब्रॅशन, केमिकल पिलींग, स्कीन रीजुव्हिनेटिंग, लेसर इत्यादी सारख्या सोप्या प्रक्रियेतून जाऊ शकता. आपल्या त्वचेच्या समस्या तसेच मुरुमांवर औषधोपचार देखील घेऊ शकता.
1 चमचा रवा, एक चमचा चण्याच्या डाळीचे पीठ पाण्यात मिसळून एक एक्सफोलिएटिंग स्क्रब बनवा. मृत त्वचा काढून टाकण्यासाठी हे स्क्रब उत्तम आहे.
ब्रेकआउट्स टाळण्यासाठी आणि चेह-यावर पीठ, थंड दूध, एक चिमूटभर हळद आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि काही गुलाबपाणी यांचा वापर करा. चेह-यावर या मिश्रणाचा थर लावून आणि कोरडे होऊ द्या आणि काही मिनिटांनी ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
एक कप ताक आणि एक दोन चमचे दही मिसळा. हे मिश्रण चेहर्यावर लावा आणि काही तास तसेच ठेवून कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि नेहमीप्रमाणे चेहरा मॉइश्चराईज करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक