ADVERTISEMENT
home / Care
जोजोबा आईल आहे त्वचेसाठी वरदान, दररोज करा असा वापर

जोजोबा आईल आहे त्वचेसाठी वरदान, दररोज करा असा वापर

सौंदर्याची निगा राखण्यासाठी अनेक ब्युटी ऑईल्सचा वापर केला जातो. ज्यामध्ये फेस ऑईल, हेअर ऑईल, बॉडी ऑईल अशा अनेक प्रकारांचा समावेश असू शकतो. मात्र या सर्व ब्युटी ऑईलमधून तुम्हाला नियमित वापर करण्यासाठी एखादे बेस्ट ऑईल निवडायचे असेल तर हा एक कठीण प्रश्नच आहे. कारण यासाठी तुम्हाला असं तेल हवं आहे जे तुमच्या चेहरा, केस आणि शरीरावरील संपूर्ण त्वचेला नक्कीच सूट होईल. मात्र यासाठी काळजी करण्याचं काहीच कारण नाही कारम यासाठी तु्म्ही तुमच्या ब्युटी केअरमध्ये जोजोबा ऑईलचा समावेश करू शकता. जोजोबा ऑईल हे एक मल्टी टास्किंग ऑईल आहे. कारण याऑईलने तुम्ही तुमची त्वचा मॉईस्चराईझ करू शकता, हेअर मसाज करण्यासाठी हे तेल बेस्ट आहे, मेकअप रिमूव्ह करण्यासाठी अतिशय उत्तम आहे, तुम्ही तुमच्या नखांचे क्युटिकल्स हेल्दी करण्यासाठी हे तेल वापरू शकता, पाय मऊ करण्यासाठी किंवा एक छान लीप बाम म्हणूनही जोजोबा ऑईल तुमच्या फायद्याचं आहे. यासाठी जाणून घ्या नियमित स्किन केअर रूटिनमध्ये कसा कराल या तेलाचा वापर

त्वचा मॉईस्चराईझ करण्यासाठी –

जोजोबा ऑईल हे एक उत्तम मॉईस्चराईझर आहे. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. 

कसा कराल वापर –

  • तुम्ही हे तेल कोणत्याही इसेंशिअल ऑईल जसं की नारळाचे तेल, बदामाचे तेल यात मिसळून त्वचेला मालिश करू शकता.
  • तुमच्या फेव्हरेट मॉईस्चराईसरमध्ये काही थेंब जोजोबा ऑईल मिसळा आणि ते त्वचेवर लावा
  • जर तुमचे मॉईस्चराईझर वॉटरबेस असेल तर त्यामध्ये जोजोबा ऑईल व्यवस्थित मिसळले जाणार नाही यासाठी ऑईल बेस अथवा क्रिम बेस मॉईस्चराईझर निवडा

ADVERTISEMENT

Shutterstock

नखांचे क्युटिकल्स मऊ करण्यासाठी –

थंडीत तुमच्या नखांचे क्युटिकल्स त्वचेच्या कोरडेपणामुळे कडक होतात आणि तुटू लागतात. अशा वेळी हे क्युटीकल्स पुन्हा मऊ करण्यासाठी तुम्ही  जोजोबा ऑईल वापरू शकता.

कसा कराल वापर –

  • जोजोबा ऑईलचा एक एक थेंब तुमच्या प्रत्येक बोटाच्या क्युटिकलवर घ्या आणि हळूवार हाताने बोटांना मसाज करा, नखांवर उरलेलं तेल तुम्ही तुमच्या हाताची बोटं, तळहात आणि संपूर्ण हातावर पसरून त्यावर मसाज करू शकता
  • हा उपाय केल्याने तुमचे हात हायड्रेट राहील आणि हात मऊ होतील

ओठ मुलायम करण्यासाठी –

हिवाळा आला की सर्वात जास्त परिणाम होतो तो तुमच्या ओठांवर. कारण कोरड्या वातावरणामुळे तुमचे ओठ फुटतात आणि त्यातून रक्त येऊ लागतं. यासाठीच ओठांना मुलायम करण्यासाठी तुम्ही जोजोबा ऑईल वापरू शकता.

ADVERTISEMENT

कसा कराल वापर –

  • दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या फुटलेल्या ओठांवर थेंबभर जोजोबा ऑईल लावा

सनबर्न कमी करण्यासाठी –

हिवाळ्यात त्वचा जशी कोरडी होते तशीच प्रखर सुर्यप्रकाशात गेल्यामुळे टॅनही होते. त्वचेवरचं हे टॅनिंग काढण्यासाठी तुम्ही जोजोबा ऑईल वापरू शकता. जोजोबा ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई आणि अॅंटि ऑक्सिडंट असल्यामुळे त्वचेचा दाह कमी होतो आणि पेशींचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

कसा कराल वापर –

  • सन बर्न झालेल्या भागावर नियमित थोडं जोजोबा ऑईल लावा
  • हळू हळू सनबर्नचा दाह कमी झालेला तुम्हाला जाणवू लागेल

सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करण्यासाठी –

सुरकुत्या आणि फाईन लाईन्स या एजिंगच्या खुणा आहेत. अशा त्वचेला व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी ची गरज असते. जोजोबा ऑईलमध्ये हे व्हिटॅमिन असल्यामुळे तुमच्या त्वचेचं फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होतं आणि तुमच्या त्वचेवरचे एजिंग मार्क्स कमी होतात.

ADVERTISEMENT

कसा कराल वापर –

  • सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी त्वचा स्वच्छ केल्यावर जोजोबा ऑईलने त्वचेवर मालिश करा
  • नियमित वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेवरचे एजिंग मार्क्स कमी होतील

Shutterstock

मेकअप काढण्यासाठी –

मेकअप काढण्यासाठी महागडे मेकअप रिमूव्हर वापरण्याऐवजी तुम्ही जोजोबा ऑईलचा वापर करू शकता. कारण यामुळे तुमच्या त्वचेवरील मेकअपच्या कणांसोबत त्वचेवर जमा झालेली धुळ, माती आणि प्रदूषण निघून जाईल आणि त्वचा मुळापासून स्वच्छ होईल. 

ADVERTISEMENT

कसा कराल वापर –

  • त्वचेवर काही थेंब जोजोबा ऑईल लावा आणि सक्युलर मोशनमध्ये त्वचेवर मसाज करा 
  • मेकअप निघू लागल्यावर कॉटन पॅडने तो पुसून काढा आणि चेहरा फेसवॉशने धुवून टाका

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

हिवाळ्यात करा केळ्याचे फेशियल आणि करा कोरडेपणा दूर

ADVERTISEMENT

तुमच्या वयानुसार अशी निवड करा योग्य शेडच्या ब्लशरची

यंदा हिवाळ्यात ट्राय करा या बेस्ट कोल्ड क्रिम (Best Cold Creams For Face In Marathi)

24 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT