2020 मध्ये हिट झाल्या या लॉकडाऊन रेसिपी, तुम्ही करुन पाहिल्यात की नाही?

2020 मध्ये हिट झाल्या या लॉकडाऊन रेसिपी, तुम्ही करुन पाहिल्यात की नाही?

2020 हे वर्ष कोरोनामुळे अनेकांच्या लक्षात राहिले असले तरी या वर्षात खूप जणांना बरंच काही शिकायला मिळालं. विशेषत: घरी राहून कधीही स्वयंपाक घराशी संपर्क न आलेल्या लोकांनीही स्वयंपाकघरात जाऊन वेगवेगळ्या रेसिपी केल्या. लॉकडाऊनमधील काळात कमीत कमी साहित्यात जीभेचे चोचले पुरवण्यासाठी अनेकांनी अशा काही रेसिपी शोधून काढल्या. ज्या सोशल मीडियावर फार हिट झाल्या. या रेसिपी तशा काही नवख्या नाहीत किंवा काही वेगळ्या नाहीत पण या रेसिपींनी प्रत्येकाला किचनची एक वेगळी ओळख घडवून दिली. आज या सरत्या वर्षाच्या निमित्ताने आपण अशा काही रेसिपी पाहणार आहोत ज्या लॉकडाऊनमध्ये कोणी केल्या नाहीत असे मुळीच होणार नाही. नव्या वर्षात पदार्पण करण्यापूर्वी तुम्ही या रेसिपी केल्या नसतील तर नक्की करुन पाहा.

ओरिओ केक

Instagram

केक हा अनेकांच्या आवडीचा गोड पदार्थ. लॉकडाऊनच्या काळात केक शॉप बंद होते. त्यामुळे केक घरीच करुन पाहण्यासाठी अनेकांनी सोप्या रेसिपी दाखवल्या असतील. पण कमीत कमी साहित्यात तयार होणारा ओरिओ केक सुपर डुपर हिट झाला. कारण फक्त ओरिओ बिस्किटांचा चुरा, जरासा बेकिंग सोडा आणि दूध घालून हा केक ओव्हन, मायक्रोव्हेव  आणि अगदी कुकरमध्येही करता येत असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात या काळात झालेल्या वाढदिवसाला हा केक करुन अनेकांनी खाल्ला आहे.

2021मध्ये परदेशात जायचे असेल तर हे देश बसतील बजेटमध्ये

डलगोना कॉफी

Instagram

कॉफी लव्हर लोकांसाठी मस्त गरमा गरम कॉफी आणि तिही त्यांच्या आवडीच्या कॉफी शॉपमधली म्हणजे जीव की प्राण. पण कॉफी पिण्याचे हे स्वप्न अनेकांसाठी लॉकडाऊनमध्ये स्वप्नच राहिले होते. आवडीची कॉफी पुन्हा कधी पिता येईल या विचारात असताना कोल्ड कॉफीचा एक भन्नाट प्रकार अनेकांनी घरीच ट्राय केला. कोल्ड कॉफीचा हा प्रकार अनेकांनी करुन पाहिला आहे.

पाणीपुरीच्या पुऱ्या

Instagram

चाटच्या गाडीवर जाऊन पाणीपुरी, शेवपुरीचा आनंद घ्यायला अनेकांना आवडते. पण या काळात पाणी पुरीच्या पुऱ्या मिळणे फारच कठीण झाले होते. त्यामुळे अगदी बेसिकपासून सुरुवात करत सगळ्यांनी घरीच पाणीपुरीच्या पुऱ्या बनवल्या. मैदा आणि रव्याचा वापर करत अनेकांनी पुऱ्या घरीच बनवल्या आणि त्याचे अनेक व्हिडिओ करत पोस्ट केले. त्यामुळे साधारण मे -जूनमध्ये पाणीपुरीच्या पुऱ्यांचा व्हिडिओ चांगलाच प्रसिद्ध झाला होता.तुम्ही पाणीपुरी खाण्याचा हा आनंद लॉकडाऊनमध्ये घेतला की नाही? 

2021 मध्ये ट्रेंडमध्ये असतील हे हेअरकट, नववर्षाच्या स्वागतासाठी करा ट्राय

मोमोज

Instagram

साधारण दिल्ली आणि मुंबईच्या काही भागांमध्ये हमखास खाल्ली जाणारी स्नॅक्स रेसिपी म्हणजे मोमोज. अनेकांनी मोमोजला खूप मिस केलं. पण लॉकडाऊनचे दोन महिने झाल्यानंतर हा लॉकडाऊन काही संपायचे नाव घेत नाही म्हटल्यावर लोकांनी घरीच  मोमोज करायला सुरुवात केली. मैद्यापासूनच नाही तर हेल्दी पर्याय म्हणून गव्हाच्या पीठापासूनही अनेकांनी मोमोज तयार केले. मोमोजचा आकार योग्य पद्धतीने येण्यासाठीही अनेक व्हिडिओज या काळात करण्यात आले.त्यामुळे मोमोजही देखील या काळात हिट झालेली एक रेसिपी आहे. 


या होत्या अशा काही लॉकडाऊन रेसिपी ज्या झाल्या एकदम हिट! तुम्ही कोणत्या रेसिपीज आतापर्यंत करुन पाहिल्यात.

#2020 मध्ये या सेलिब्रिटीजच्या घरी आले लहान पाहुणे, पहिल्यांदाच झाले आई-वडील