ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
डबल चिन (हनुवटी)पासून सुटका हवी असल्यास, करा सोपा मसाज

डबल चिन (हनुवटी)पासून सुटका हवी असल्यास, करा सोपा मसाज

डबल चिनची (Double Chin) समस्या बऱ्याच जणांना आजकाल सतावत असते. चेहऱ्यावर चरबी पटकन जमा होते पण ती कमी करण्यासाठी खूपच मेहनत लागते आणि विशेषतः डबल चीन अर्थात हनुवटीवर चढलेली चरबी खूपच त्रासदायक ठरते. काही जणांचे शरीर तितके जाड नसते पण तरीही चरबी हनुवटीवर मात्र असते. त्यामुळे अशी डबल चीन कमी करण्यासाठी नक्की काय करायचं असा प्रश्न पडतो. चेहरा बारीक दिसण्यासाठी आणि करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायामाची गरज असते. यासाठी चेहऱ्यावर केला जाणारा मसाज अत्यंत उपयुक्त ठरतो. यामुळे रक्तप्रवाह चांगला होतो आणि त्यासह आपल्या चेहऱ्याचा टोन व्यवस्थित करण्यासाठीही मदत करते. नियमित चेहऱ्याचा मासज केला तर चेहरा बारीक होतो आणि त्यासह चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात आणि डबल चीन कमी होते. हा मसाज नक्की कसा करायचा ते जाणून घेऊया. हे सोपे मसाज असून तुम्ही घरच्या घरी हे मसाज करू शकता. 

फोरहेड स्ट्रेचिंग

Freepik.com

कपाळावरील स्ट्रेचिंग अर्थात फोरहेड स्ट्रेचिंग हा असा मसाज प्रकार आहे ज्यामुळे फेशियल मसल्स कार्यरत होतात. कपाळावरील स्ट्रेचिंग करताना स्थपनी मर्म टेक्निकचा तुम्ही वापर करू शकता. तसंच यासह तुम्ही कपाळावर स्ट्रेच करताना कसे प्रेशर अर्थात तसा ताण द्यायचा याची एक विशिष्ट पद्धत असते आणि त्याची काळजी घ्यावी लागते. 

ADVERTISEMENT

काय करावे 

  • तुमच्या त्वचेला त्रास होणार नाही असे तेल अथवा मॉईस्चराईजिंग क्रिम घ्या
  • बोटांच्या सहाय्याने तुम्ही कपाळावर जिथे आठ्या पडतात तिथे मालिश करायला सुरूवात करा आणि मग आयब्रो लाईनजवळून तुम्ही बोटांनी मालिश करत न्या
  • तुम्हाला कपाळावर अगदी मध्यम स्वरूपाचा ताण द्यायचा आहे. ज्यामुळे तुमची त्वचा थोडीशीच खेचली जाईल आणि पूर्ण चेहऱ्याचे मसल्स टोन होऊ शकतील
  • लक्षात ठेवा की, तुम्हाला कपाळावरील सर्व स्ट्रोक हे आतून बाहेरच्या दिशेने वळवायचे आहेत 

चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो आवळ्याचा रस

चीक लिफ्ट्स (गाल वर उचलणे)

Freepik.com

ADVERTISEMENT

डबल चीन कमी करायची असेल तर हा सर्वात चांगला उपाय आहे. तुम्हाला तुमच्या गालांचा अशा तऱ्हेने मसाज करावा लागेल जेणेकरून तुमचे गाल अत्यंत हलक्या हाताने तुम्ही वरच्या बाजूने खेचाल. हळूहळू प्रेशर देत मग मध्यम स्वरूपाचे प्रेशर द्यावे आणि मग खालच्या बाजूने वरच्या बाजूला स्ट्रोक द्यावा

काय करावे 

  • हनुवटीपासून सुरू करत वर डोळ्यांपर्यंत गाल लिफ्ट करावे 
  • डोळ्यांपर्यंत पोहचल्यानंतर हाताची बोटं बाहेरच्या दिशेने वळवा 
  • सर्व स्ट्रोक हे वरच्या बाजूच्या दिशेनेच असावेत
  • तुम्हाला दोन्ही गालांवर हे साधारण 10-15 वेळा करायचे आहे
  • लक्षात ठेवा की तुमच्या हाताची बोटं ही कोरडी असू नयेत. अन्यथा गालाची नाजूक त्वचा खेचली जाईल आणि मसाजचा फायदा होणार नाही 

हातावरील चरबी घालवा व्यायामाशिवाय, उत्तम पर्याय

नेक मसाज (मानेचा मसाज)

ADVERTISEMENT

Freepik.com

हा मसाज मानेपासून अर्थात गळ्यापासून सुरू करून कानापर्यंत तुम्हाला करावा लागतो. तुम्हाला हा करताना काळजी घ्यावी लागते की मसाज करताना स्ट्रोक्स हे वरच्या बाजूने असावेत. बाहेरच्या बाजूने असले तरीही चालतील. 

काय करावे 

  • सर्वात पहिल्यांदा गळ्यापासून सुरूवात करा. खालच्या बाजूने हनुवटीपासून आपल्या हाताच्या बोटांनी मसाज करा 
  • लक्षात ठेवा की तुम्ही मसाज करताना एखाद्या तेलाचा अथवा मॉईस्चराईजिंग क्रिमचा योग्य वापर केलेला असेल 
    यासाठी खरं तर टोनिंग ऑईल सर्वात उत्तम पर्याय आहे 
  • गळ्याचा मसाज करण्यासह गालावरही मसाज करा आणि बोटांना कानापर्यंत घेऊन जा आणि मसाज करा

हे तिन्ही मसाज तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता. असं केल्याने हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर कसावट येईल आणि योग्य आहारासह तुम्ही डबल चीन कमी करू शकाल. 

ADVERTISEMENT

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय (How To Reduce Face Fat In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

23 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT