आपल्या लग्नात सर्वात सुंदर दिसणं हे प्रत्येक मुलीचं स्वप्नं असतं आणि त्यासाठी सर्वात जास्त काळजी घ्यायला हवी ती आपल्या त्वचेची (Skin care). नवरीची त्वचा लग्नामध्ये चमकदार आणि सुंदर दिसायला हवी असते. मेकअप केल्यानंतरही त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते तेव्हाच ती अधिक आकर्षक आणि सुंदर दिसते हे लक्षात घ्या. लग्नाच्या दिवशी त्वचा अत्यंत क्लिन आणि क्लिअर दिसणं गरजेचं आहे. केवळ लग्नातच नाही तर लग्नाच्या आधी आणि नंतरही तुमची त्वचा अधिक आकर्षक आणि सुंदर दिसायला हवी. त्यामुळे ज्यांचं लग्न ठरलं आहे आणि लग्नाची तारीख आता जवळ येत आहे त्यांनी आपल्या किटमध्ये या गोष्टी ठेवायलाच हव्यात आणि त्याचा नियमित वापर करावा. जेव्हा तुमची त्वचा चांगली असते तेव्हाच त्यावर मेकअप सुंदर दिसतो. ज्या मुली आता लवकरच लग्न करणार आहेत त्यांच्या किट्समध्ये 5 त्वचेची उत्पादने (Skin care products) असायलाच हवीत. कोणती ते आपण जाणून घेऊया.
लग्नासाठी तयार होणं हे नक्कीच सोपं नाही. खरेदीची धावपळ, भरपूर काम, लग्नाचा ताण, फॅशन आणि आऊटफिटचा ताण, दागिन्यांचे टेन्शन आणि त्यात नव्या घरामध्ये कसं रूळावं लागेल याचा विचार. या सगळ्याचा सर्वात जास्त परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर. त्वचा अधिक निस्तेज आणि डिहायड्रेट या सगळ्या मानसिक ताणामुळे होत असते. त्यामुळे तुम्ही सर्वात पहिले आपला फेसवॉश बदला आणि लॅक्मे अॅब्सोल्युट परफेक्ट रेडिअन्स ब्राईनिंग फेशियल फोम वापरा. हा फेसवॉश तुम्हाला अधिक चांगला ताजेपणा तर देतोच. शिवाय यातील विटामिन बी 3 आणि ग्लिसरीनयुक्त प्रमाण तुमचा चेहरा अधिक मऊ आणि मुलायम करतो आणि त्याशिवाय चेहऱ्यावर चमक आणण्यास मदत मिळते.
जेव्हा तुम्ही लग्न करत आहात तेव्हा एक्सफोलिएटर हा तुमच्या त्वचेची काळजी घेताना महत्त्वाचा भाग असायला हवा. हे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन आणि त्वचेतील घाण काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा अधिक चमकदार होते. या सगळ्यासाठी तुम्हीला या स्क्रबचा वापर करता येईल. जो तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे. मँडरिन ऑरेंज आणि पिंक लेमन यापासून तयार करण्यात आलेले हे एक्सफोलिएटर तुमची निस्तेज त्वचा उजळविण्याचे काम करते आणि त्वचा अधिक मुलायम बनवते. तसंच त्वचेवरील कोरडेपणा काढून तुम्ही अधिक आकर्षक दिसता. तेदेखील केवळ एका वापरानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यातील बदल जाणवेल.
आपली त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठी आणि कोरडेपणापासून वाचण्यासाठी तुम्ही नियमित स्किनकेअरमध्ये मॉईस्चराईजरचा समावेश करून घ्यायला हवा. MyGlamm च्या या मॉईस्चरमध्ये नैसर्गिक घटक असून क्रुएल्टी फ्री आहे. तसंच हे त्वचेला मॉईस्चर तर करतेच त्याशिवाय चेहऱ्यावर फाईन लाईन्स आणि सुरकुत्यांपासून वाचण्यासही मदत करते. त्वचा अधिक मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो.
झोपण्यापूर्वी रोज फॉलो करा 5 टिप्स आणि टाळा वेळेआधी येणारे त्वचेचे म्हातारपण
लग्नाच्या दिवसात ताणामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळं जमा होऊ लागतात. याकडे विशेषतः लक्ष देणं गरजेचं असतं. संगीतची तयारी, मेंदी फंक्शन्स आणि इतर गोष्टींची जुळवाजुळव या सगळ्यामुळे झोपही अपूर्ण होत असते. त्यामुळे तुमच्या किटमध्ये अंडर आय बॅग्जपासून सुटका मिळविण्यासाठी आयक्रिम असायलाच हवे. रात्री रोज झोपण्यापूर्वी तुम्ही याचा वापर करा. ऑर्गन ऑईल आणि ऑप्टि विटापासून तयार हे क्रिम तुमच्या डोळ्यांखालील सुरकुत्या आणि काळेपणा घालविण्यास मदत करते. तसंच तुम्ही यामुळे अधिक ताजेतवाने दिसता.
त्वचेवर चमक आणण्यासाठी लिंबू आणि मधाचे फायदे (Benefits Of Lemon And Honey For Skin)
तुमच्या स्किनकेअर रूटिनमध्ये सीरमचा समावेश नसेल तर तुम्ही नक्की याचा समावेश करून घ्यायला हवा. लॅक्टिक अॅसिडयुक्त हे सीरम त्वचा एक्सफोलिएट करते. विटामिन सी कॉम्प्लेक्स आणि लॅक्टिक अॅसिडमुळे चेहऱ्यावर डाग निघून जातात आणि त्वचा अधिक उजळते आणि चमकते. चिया सीड ऑईलयुक्त हे सीरम तुमच्या त्वचेसाठी अँटिऑक्सिडंट्सचे काम करते आणि त्वचेची रॅडिकल नुकसानापासून रक्षा करते. तसंच त्वचा अधिक तरूण दिसेल याकडे लक्ष पुरवते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक