हिवाळ्याच्या दिवसात केसांचा कोरडेपणा होणं ही एक सामाईक समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे नारळाचे तेल. नारळाचे तेल अत्यंत सहज लावता येते. पण जेव्हा तेल डोक्यावरून काढायची वेळ येते तेव्हा मात्र हे काम कठीण होतं आणि हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त त्रास होतो तो केस धुण्याचा. कारण केस कोरडे पडू नये म्हणून तेल लावण्यात येतं. पण ते काढताना मात्र त्रास होतो. वास्तविक हिवाळ्यात नारळाचं तेल केसांमध्ये चिकटून राहतं. त्यामुळे साधारण शँपूने केस धुतल्यास, हे केसातून निघत नाही. त्यामुळे केसांमध्ये समस्या होऊ शकते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात केसांमधील तेल कसे काढायचे याच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्हीही या टिप्स वापरून तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता.
केसांमधून कसे काढाल नारळाचे तेल
Shutterstock
मुलतानी माती लाऊन केस धुवा
हिना पावडरमध्ये आवळा, रिठा आणि शिकाकाई एकत्र करा आणि मग केस धुवा
अंड्याचा सफेद भाग तुम्ही केसांना लावल्यास, केसांमधून तेल अगदी सहजरित्या निघते
बिअरने केसांना तुम्ही धुवा आणि केस अधिक मुलायम होतात. केसांमधील तेल निघून जातं
टॉमेटोच्या रसाने तुम्ही केस धुतल्यास, केसातून पटकन तेल निघून जातं
केसातून तेल निघाले नाही तर होतात या समस्या
केस चिकटपणा येतो
कोंड्याची समस्या अधिक प्रमाणात होते
स्काल्पमध्ये खाज येते
तसंच स्काल्पमध्ये अधिक प्रमाणात धूळ आणि माती चिकटते
इन्फेक्शन वाढते
नारळाचे तेल केसांवरून काढण्यासाठी घरगुती उपाय
तुम्ही केसातून तेल काढण्यासाठी घरगुती उपायांचा उपयोग करून घेऊ शकता. यामुळे तुमच्या केसात जमलेल्या तेलाला स्वच्छ करता येते.
केसांना लावलेले नारळाचे तेल साधारण शँपूने जात नाही. त्यामुळे तुम्ही टॉमेटोचा घरगुती हेअरपॅक लाऊन केसातील नारळाचे तेल काढू शकता.
सर्वात पहिले तुम्ही एका बाऊलमध्ये टॉमेटोचा रस काढून घ्या. यासाठी टॉमेटो मिक्सरमधून काढून त्याची प्युरी बनवून घ्या
त्यानंतर त्या रसामध्ये मुलतानी माती मिक्स करा
ही तयार झालेली पेस्ट स्काल्पला लावा आणि मग केसांना पूर्ण लावा
एक तासानंतर हेअरपॅक केसांना तसाच लाऊन ठेवा आणि मग केसांना शँपू लाऊन केस धुवा
मुलतानी माती
Shutterstock
मुलतानी माती केसांना अधिक कोरडी करते. तुम्ही जर केसाना तेल लावले तर मग केस अधिक चिकट होत असतील तर केसांना शँपू लावल्यानंतरही केस नीट धुतले गेले नाहीत असं वाटत असेल तर तुम्ही मुलतानी मातीचा वापर करा.
सर्वात पहिले तुम्ही एका बाऊलमध्ये मुलतानी माती घ्या त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा
तुम्हाला जर केवळ लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करता येणार नाही. त्यामुळे त्यामध्ये पाणी घालणे
यानंतर हा घरगुती हेअरपॅक तुम्ही केसांना लावा आणि अर्धा तास केसांवर तसंच राहू द्या
हिना अर्थात मेंदी केसांना कोरडे करते. वास्तविक केसांना मेंदी लावण्याचे अनेक फायदे आहेत. पण मेंदी वापरल्याने केसांचे तेल स्वच्छ करण्यास मदत मिळते. यामध्ये आवळा, रिठा आणि शिकेकाईचे मिश्रण यामध्ये मिक्स करा
सर्वात पहिले लोखंडाच्या कढईमध्ये आवळा, शिकेकाई आणि रिठा पावडर एकत्र मिक्स करून पाणी घालून त्याची पेस्ट करा
त्यानंतर मेंदी पावडर चहाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्या
आता रात्रभर हे मिश्रण तसंच राहू द्या
दुसऱ्या दिवशी सकाळी आवळा, शिकेकाई आणि रिठाचे मिश्रण गाळून घ्या आणि पाणी वेगळे काढा
केसांना मेंदी लावा आणि पाऊण तास तसंच राहू द्या. त्यानंतर केस पाण्याने धुवा. केसातील तेल यामुळे पटकन जाण्यास मदत मिळते आणि केस अधिक मऊ आणि मुलायम होतात
केस बिअरने धुतल्यामुळे चमकदारही होतात आणि केसांमधील तेल आणि चिकटपणा निघून जाण्यास मदत मिळते. तसंच हे वापरणं सोपं आहे.
बिअर आणि पाणी मिक्स करून घ्या आणि याने केस धुवा
तुम्ही तुमच्या केसांंच्या हिशेबाने हे मिश्रण कमी अथवा जास्त करू शकता
अंड्याचा सफेद भाग
Shutterstock
अंड्याचा सफेद भाग अंड्याचा सफेद भाग केसांना लावल्याने तेल पटकन निघून जाते. पण तुम्हाला त्रास होत असेल तर मात्र तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता.
बाजारामध्ये तुम्हाला तेलकट असणाऱ्या केसांसाठी शँपू मिळतात. तुम्ही शँपूसह केसांना अंड्याचा सफेद भाग मिक्स करूया
केसांना थंड पाण्याने धुवा. गरम पाणी वापरू नका अन्यथा अंड्याचा वास येतो
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक