गेल्या काही दिवसांपासून आपल्या कानावर सतत एग फ्रिजिंग हा शब्द आदळतो आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मोना सिंहबाबत ही बातमी आली होती. एग फ्रिजिंग अर्थात महिला बाळाला जन्म देण्यासाठी असणारी अंडी डॉक्टरांच्या मदतीने सुरक्षित ठेवतात. आजकाल महिला करिअर आणि इतर गोष्टींमध्ये इतक्या अडकलेल्या असतात की, आपले कुटुंब पुढे चालवण्यासाठी घेण्यात येणारा निर्णय बऱ्याचदा पुढे ढकलतात. पण एका ठराविक वयानंतर नैसर्गिक पद्धतीने बाळाला जन्म देणं कठीण होतं. कारण वय वाढल्याने पटकन बाळ कन्सिव्ह होत नाही. मग अशावेळी जर तुम्ही एग फ्रिजिंग केलं असेल तर तुम्हाला बाळाला जन्म देणं सोपं होतं. महिला या प्रक्रियेचा आधार घेतात. वाढत्या वयासह महिलांची प्रजनन क्षमता कमी होते. त्यावेळी हा पर्याय उत्तम असतो. पण नक्की एग फ्रिजिंग म्हणजे नेमकं काय आणि याची प्रक्रिया काय असते याची संपूर्ण माहिती सर्वांना नसते. याची माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सोप्या शब्दातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आई होण्याचा प्रवास नक्की असतो तरी कसा याची माहिती
गेल्या काही वर्षात या तंत्रज्ञानात (Egg Freezing Technique) खूप बदल झाला आहे. डॉक्टरांच्या सकारात्मक बदलांमुळे फर्टिलिटी संरक्षणासाठी हा उत्तम उपाय मानण्यात येतो. एग फ्रिजिंग म्हणजे नेमकं काय असा प्रश्न अनेकांना पडतो. तर एका विशिष्ट वयामध्ये ओव्हरीमधून मॅच्युर अंडी काढून लॅबमध्ये ही अंडी शून्य तापमानावर फ्रिज केली जातात. जेव्हा या अंड्यांची गरज भासते तेव्हा शुक्राणूंसह (Sperm) यांचा मिलाप घडून गर्भाशयात हे स्थलांतरित करण्यात येते. त्यामुळे एका विशिष्ट वयानंतरही कोणत्याही महिलेला आई होता येतं. तुम्हाला एखाद्या विशिष्ट वयात आई व्हायचं नसेल पण काही वर्षांनंतर तुम्हाला आई व्हायची इच्छा झाली तर तुम्हाला या एग फ्रिजिंग प्रक्रियमुळे आपलं स्वप्नं साकार करता येतं. यासाठी तुम्हाला कोणत्याही शुक्राणूची अथवा अन्य गोष्टींची गरज भासत नाही. कारण तुमचे अंडे हे एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येते. जेणेकरून तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा गरोदर होण्यासाठी याचा वापर करू शकता. भविष्यासाठी तुम्ही तुमच्या तरूण वयातही हे एग फ्रिजिंग करून ठेऊ शकता. ते बरेच काळ टिकून राहते आणि त्याचा पुढे कोणताही त्रास होत नाही.
एग फ्रिजिंग करायचे ठरवले तर त्यासाठी नक्की योग्य वय कोणते असा प्रश्न नक्कीच प्रत्येकाच्या मनात असतो. अशावेळी नक्कीच तुम्हाला तुमचे डॉक्टर योग्य सल्ला देतात. पण माहितीसाठी तज्ज्ञांनुसार साधारण वीस ते तीस या वयादरम्यान तुम्ही तुमचे एग फ्रिझ करून ठेवले तर त्याचा फायदा होतो. कारण या वयादरम्यान चांगल्या दर्जाचे एग (मुलांना जन्म देणारे अंडे) सर्वात जास्त प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. त्यामुळेच पूर्वी साधारण वीशीनंतर लग्न करण्याचा आग्रह असायचा. मुलांना जन्म देण्यासाठी हा काळ योग्य असतो. तसंच या वयामध्ये गर्भावस्थेदरम्यान होणाऱ्या गुंतागुंतीही कमी होतात. म्हणून तुम्हाला जर एक फ्रिजिंग प्रक्रिया करायची असेल तर हे वय उत्तम आहे. तुम्हाला या वयामध्ये उत्तम दर्जाच्या अंड्यांचे फ्रिजिंग करून ठेवता येते. जेणेकरून तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर त्याचा उत्तम रिझल्टच मिळू शकतो. एग फ्रिजिंग करून ठेवलेले असताना तुम्ही जेव्हा बाळाला जन्म द्यायची वेळ येते तेव्हा याचा काही त्रास होत नाही आणि योग्य प्रक्रिया होऊन बाळाला जन्म दिला जातो.
एग फ्रिजिंगची प्रक्रिया वाचताना जरी सोपी वाटत असली तरीही याची प्रक्रिया अत्यंत मोठी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी 20-30 या वयामध्ये अंडे व्यवस्थित फ्रिझ केले तरीही याबाबत अजूनही शोध चालू आहेत. सतत यावर शोध आणि तपास चालू असून जास्तीत जास्त त्याचा फायदा करून घेता येईल अशी डॉक्टरांची मेहनतही आहे. ही एक फ्रिजिंग प्रक्रिया नेमकी कशी असते ते जाणून घेऊया
सदर प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला तुमची काळजी घ्यावी लागते. पण तुम्हाला ही प्रक्रिया केल्यानंतर आम्ही खाली सांगितल्याप्रमाणे काही लक्षणं दिसली तर तुम्ही त्वरीत तुमच्या डॉक्टरांना संपर्क साधायला हवा
जेव्हा शरीरात पुन्हा अंडे स्थलांतरित करण्यात येतात तेव्हा महिला एक आठवड्यानंतर नक्कीच काम सुरू करू शकतात. पण प्रत्येक महिलेचे शरीर हे वेगळे असते. त्यामुळे काही जणींना शारीरिक त्रासही होऊ शकतात. एग फ्रिजिंगनंतरही तुम्ही गरोदर होण्याची शक्यता असते. कारण शरीरामध्ये त्यानंतरही काही अंडी तशीच राहतात. अंड्यांचे स्थलांतर केल्यानंतर तुमचे वजन झपाट्याने वाढण्याची समस्या जास्त महिलांना होते. तसंच सूज येण्याचे लक्षणही अनेकांना जाणवते. पण असे असले तरीही तुम्ही याबाबत तुमच्या डॉक्टरांना त्वरीत संपर्क करून त्यावर उपाय करून घ्यावा. या गोष्टी अंगावर काढू नयेत अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतात.
एग फ्रिजिंग ही अत्यंत महाग प्रक्रिया आहे हे जरी खरे असले तरीही यावर संपूर्ण अवलंबून राहता येत नाही. आयव्हीएफनंतर एग फ्रिजिंग ही प्रक्रिया बाळाला जन्म देण्यासाठी सर्वात चांगली प्रक्रिया मानली गेली आहे. त्यामुळे योग्य वयात ही प्रक्रिया केली तर नक्कीचा याचा परिणाम चांगला होतो. आतापर्यंत अभिनेत्री मोना सिंहसह डायना हेडननेही एग फ्रिजिंग केले होते. डायना हेडन ही एग फ्रिजिंग करणारी पहिली भारतीय महिला होती. तिने तिसाव्या वर्षी एग फ्रिझ केले आणि चाळीशीनंतर मुलीला जन्म दिला. तर निर्माती एकता कपूरने वयाच्या 36 व्या वर्षी एग फ्रिझ केले पण तिला यश न मिळाल्याने तिने सरोगसीचा आधार घेत मुलाला जन्म दिला.
एग फ्रिजिंगची प्रक्रिया ही खूप मोठी असते आणि या दरम्यान शारीरिक दुखणे साहजिक आहे. मात्र याचा जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांना त्वरीत सांगायला हवे.
तिशीनंतर केलेले एग फ्रिजिंग हे यशस्वी होतेच असे नाही. त्याचे परिणाम फार कमी वेळा पाहायला मिळतात. सहसा वीस ते तीस वर्षांमध्ये केलेले एग फ्रिजिंग हे यशस्वी होताना दिसते.
या प्रक्रियेला वेळही लागतो आणि जास्त प्रमाणात ही प्रक्रिया होत नसल्यामुळे साहजिकच ही प्रक्रिया महाग आहे. प्रत्येकाच्या खिशाला ही प्रक्रिया परवडणारी नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक