एकटेपणात आधार देतील असे कोट्स आणि स्टेटस (Alone Quotes In Marathi)

alone quotes in marathi

भोवताली माणसांचा कितीही गराडा असला तरी तुम्हाला एकटेपणा जाणवतो का? हा एकटेपणा अनेकांच्या आयुष्यात नकारात्मकता आणतो. एकटेपणाने तुम्हालाही ग्रासले असेल तर आपल्या आयुष्याचे आपणच शिल्पकार म्हणत यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपणच शोधायला हवा. एकटेपणातून बाहेर पडताना त्यात काय शिकलो? आणि त्यातून बाहेर पडल्यानंतर आयुष्यात नेमका कोणता बदल करु याचा अंदाज आपल्याला नक्की येईल. अशा या एकटेपणात तुमचे सामर्थ्य वाढवण्यासाठी आम्ही काही कोट्स, स्टेट्स शोधून काढले आहे. जे तुमच्या एकाकी झालेल्या भकास आयुष्याला नवी दिशा आणि नवी प्रेरणा देतील. जाणून घेऊया मराठी एकटा स्टेट्स. 

Table of Contents

  एकटेपणा स्टेटस मराठी (Alone Status In Marathi)

  एकटेपणात तुम्हाला धीर देतील असे काही स्टेटस आम्ही निवडले आहेत. तुमचे दु:ख बाहेर काढून तुम्हाला नक्कीच ते आनंद देतील.

  1. खूपच एकटं केलं मला माझ्याच लोकांनी
   समजत नाही माझं नशीब वाईट आहे का मी!
  2. नात्याचं गणित एकदा का भावनेत अडकलं
   ते शब्दातून जोडणं फारच कठीण असतं
  3. कुणाला कितीही द्या
   कुणावर कितीही जीव लावा
   कुठेतरी काहीतरी कमी पडतंच
  4. वेदना कधीच कमी होत नाहीत,
   पण हा
   ते सहन करण्याची सवय मात्र होऊन जाते
  5. संपली नाती त्या लोकांबरोबचीसुद्धा
   ज्यांना भेटल्यावर वाटायचे,
   हे आपली आयुष्यभर साथ देणार!
  6. वाटलं नव्हतं कधी
   आयुष्यात कधी ही लोकं सोडून जातील
   जी सतत म्हणायची
   घाबरु नकोस मी कायम पाठिशी आहे
  7. मला एकटं राहायला आवडतं
   कारण माझ्याशिवाय मला कोणीच समजू शकत नाही
  8. आपण एकटेपणाला नेहमी घाबरतो
   पण त्या एकटेपणात आपण बरेच काही शिकतो
  9. कोणावर अवलंबून राहून आयुष्यात HURT होण्यापेक्षा
   एकटे राहून आयुष्य Enjoy करा
  10. मरणाऱ्याला रडणारे हजार मिळतील.
   पण जो जिंवत आहे त्याला समजणारा एकही सापडणार नाही.
  11. विश्वास हा श्वासांवरही नसतो,
   पण तरीही आपण लोकांवर ठेवतो.
  12. चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा
   एकट्याने राहणे हे नेहमीच चांगले
  13. या जगात कोणालाही विसरा
   पण त्याला विसरु नका
   जो तुमच्या पाठिशी कायम उभा राहिला आहे
  14. जो जास्त हसतो
   तोच आतून जास्त
   तुटलेला असतो
  15. आजकाल प्रेम तुझं
   आधी सारख दिसत नाही
   तुझी मिठीही पूर्वीसारखी घट्ट बसत नाही

  स्वाभिमान जपणारे मराठीतील उत्कृष्ट कोट्स (Self Respect Quotes In Marathi)

  एकटेपणा कोट्स मराठी (Alone Quotes In Marathi)

  एकटेपणात तुम्हाला थोडेसे रिचार्ज व्हायचे असेल तर काही चांगले विचारही तुमच्या कानी पडायला हवेत. जाणून घेऊया असेच एकटेपणा कोट्स

  1. आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली
   स्वत:मध्ये खूश राहा
   कधीच कोणाकडून काही अपेक्षा ठेवू नका, त्रास कमी होईल
  2.  बोलायचं खूप काही असतं,
   पण ऐकायला मात्र कोणीच जवळ नसतं
  3. कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबतं
   की, चुकी नसतानाही माफी मागावी लागते (त्यासाठी अनेक माफी कोट्स असतात)
   कारण त्यावेळी मन हे फार एकटं झालेलं असतं
  4. आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे
   चुकीची स्वप्न पाहणे
   आणि त्याहून मोठी चूक म्हणजे
   चुकीच्या माणसांकडून स्वप्न पाहणे
  5. हक्क
   गाजवण्याऐवजी त्या नात्याची किंमत करायला शिका
   तेव्हाच त्या हक्काला किंमत राहते
  6. मनं इतकं दु:खी होतं त्यांच्यासाठी?
   ज्यांच्यासाठी आपलं असणं आणि नसणं
   काहीच महत्वाचं नसतं
  7.  काही लोक आपल्या
   नशिबातच लिहिलेली नसतात
   त्यामुळे आपण कितीही रडलो
   तरी ते आपल्याला कधीच भेटत नसतात
  8. समोरचा बोलत नसताना
   एकतर्फी बोलत राहणं
   आयुष्यातील सगळ्यात मोठं एकटेपण असतं. 
  9. सगळ्यांना चांगलं समजणं
   सोडून द्या
   कारण जी लोकं बाहेरुन चांगली दिसतात
   ती आतून मुळीच चांगली नसतात
  10.  एकटेपणा… असतो तेव्हा
   डोळे कमी…
   आणि मन जास्त रडतं 
  11. माझ्याकडे फक्त तुझ्या आठवणी आहेत
   नशीबवान ती व्यक्ती आहे जिच्याकडे तू आहेस 
  12. कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा
   स्वत:चे  निर्णय स्वत: घ्यावेत
   बरोबर ठरला तर  जिंकल्याचा आनंद मिळतो
   चुकीचा ठरला तर आयुष्यभराचा अनुभव मिळतो
  13. खूप काही मिळवताना
   थोडं काही निसटतं
   थोडं काही निसटतं
   त्यामुळेच सगळं बिनसतं
  14.  शब्दांच्या विस्फोटापेक्षा
   मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो
  15. काही दु:ख अशी असतात
   ज्यांना  आपण सहन करु शकतो
   पण कधीही कोणाला सांगू शकत नाही

                             वाचा - व्हॉट्सअपसाठी कडक आणि रूबाबदार स्टेटस मराठीत (Attitude Status In Marathi)

  एकटेपणा चारोळ्या (Alone Charolya)

  एकटेपणा कधीच कोणाच्या आयुष्यात येऊ नये आणि जर तो आला तरी तुमचे आत्ममनोबल तोडू नये. म्हणूनच तुम्ही  एकटेपणा चारोळ्या वाचून मन रिझवा आणि आयुष्यात पुढे चला 

  • तुम्ही एकटा आहात, असा समज
   अजिबात करु नका
   कोणीतरी असं असतंच, जे तुम्हाला कळू न देता
   जे तुमची काळजी करतं असतं
  • मी आहे ना तुझ्यासाठी म्हणणारे खूप आहेत
   पण जेव्हा मन उदास असतं ना
   तेव्हा विचारणार कुणी नसतं 
  • आपल्यावर विश्वास तेव्हाच बसेल
   जेव्हा आपलाच आपल्यावर विश्वास असेल
  • जिथे एकटेपणा वाटतो
   आजकाल तिथेच वेळ घालवतो मी
   कारण…
   माणसांच्या गर्दीने भरलेल्या कलियुगात
   हसत हसत लोकं विश्वासघात करतात हे कधी कळत नाही
   सुन्या सुन्या झाल्या- चंदेरी वाटा
  • नभी मधू चंद्रही एकटा होता
   अशा चांदराती तुझ्यासोबत गुफंलेला माझा हात हवा होता
  • निसर्गाला रंग हवा असतो
   फुलाला गंध हवा असतो
   माणूस एकटा कसा राहणार
   कारण,
   त्यालाही प्रेमाचा छंद हवा असतो
  • कोणी दखल घेत नाही…
   खूपच एकाकी वाटतं
   ध्येय खचतं, सगळं संपल असं वाटतं.
   जेव्हा आपलं कोणी असं नसतं
   पण संपतं तिथेच तर तांबड फुटतं -रेणुका खटावकर
  • सावरायला कोणी असलं म्हणजे पडण्याची भीती वाटत नाही
   आणि
   आपलं असं कोणी सोबतं असलं म्हणजे एकटेपणाची भीती वाटत नाही
  • लाखो तारे सामावूनही स्वत:मध्ये
   असेल ती मजपासून दूर वैरीण रात्र माझी एकटी,
   अरे कोम म्हणतो आहे मी एकटा,
   तो अर्धा चंद्र, गार वारा,अन् आठवणी आहेत सोबती
  • वाट पाहुनी सकाळी गेली
   कोडे घालूनी दुपार सरली
   सायंकाळी वाटचं थकली
   एकटी रात्र सोबत उरली
  • मी एकटा असतो तेव्हा
   अन् संपतो गाजावाजा जेव्हा
   प्रश्न माझा माझ्यासाठी
   मी माझा असतो केव्हा?
  • मनातील एकटेपणाची भीती तेव्हाच गायब होते
   जेव्हा आपल्याला आपली क्षमता कळते
  • असं ऐकलंय की, श्वास बंद झाल्यावर
   सोडून गेलेले ही पुन्हा भेटायला येतात.
  • कोणी कितीही
   आनंदी असू द्या
   पण ती व्यक्ती
   ज्यावेळी एकटी असते
   त्यावेळी तिला जिची सगळ्यात
   जास्त आठवण येते
   त्यावरच तिचे खरे प्रेम असते
  • काही प्रवास हे एकट्यानेच करायचे असतात
   इच्छा असते सोबतीची… कोणी असेलही सोबतीला तयार
   पण असं काही जुळून येतं की, मी आणि माझा न संपणारा तो प्रवास!- दत्तात्रय पाटील

  वाचा - Marathi Sad Shayari

  खूप एकटेपणा जाणवणाऱ्यांसाठी स्टेटस (Feeling Alone Status In Marathi)

  आयुष्याच्या एका वळणावर जर खूप एकटेपणा जाणवू लागला तर त्यातून बाहेर पडणे फारच गरजेचे असते. नाहीतर मनात विचित्र प्रश्नांचे काहूर माजते. मनातील वाईट विचारांना काढून टाकले की, त्यातून नव्या आणि चांगल्या गोष्टी करण्याचा एक उत्तम मार्ग सापडतो. त्यामुळे हा एकटेपणा मनातून काढून टाकण्यासाठी भावनांना या स्टेटसमधून मार्ग मोकळा करुन द्या.

  • कधी कधी मनात नसतानासुद्धा अशा व्यक्तींपासून दूर जावं लागतं
   ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याची इच्छा असूनही एकटं राहावं लागतं
  • रोज बोलणारी व्यक्ती जर एक दिवसं बोलली नाही
   तर अर्ध आयुष्य संपल्यासारखे वाटते
  • प्रत्येकाला आपले दु:ख सांगत बसू नका.
   कारण प्रत्येकाकडे त्याचे औषधं असतेच नाही
  • आभाळासारखे प्रेम केले तर पावसाप्रमाणे रडूच येईल ना!
  • जे आहेत त्यांच्यासाठी वेळ काढत जा
   कदाचित उद्या ‘वेळ’ असेल
   पण ज्याच्यासाठी वेळ काढला आहे ती व्यक्ती नसेल
  • एकटेपणा खूप चांगला असतो
   कारण कोणाकडून अपेक्षा करण्याची गरज नसते
  • ती जखम कधीच भरत नाही
   जी आपल्याकडून मिळालेली नसते
  • आठवणी..
   ज्या कधी अनमोल होत्या
   माझ्यासाठी त्या आता भूतकाळात जमा होत्या
  • तुला काहीच बोलायचं नाही मला
   चुक तर माझीच आहे
   कारण मी तुझ्यावर स्वत:हून जास्त विश्वास ठेवला
  • सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो?
   जेव्हा एकांतात बसल्यावर
   एकटे का बसलोय?
   हे विचारणारेसुद्धा कोणी नसते
  • वाटतात तितक्या सोप्या नसतात गोष्टी
   ‘अनुभव’ म्हणजे काय?
   तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच
   काळजाला लागते
  • जेव्हा कोणाच्या आयुष्यात
   आपले महत्व कमी होऊ लागते
   तेव्हा आपोआपच रिप्लाय Slow होऊ लागतात
   बोलणं कमी होऊ लागतं
   आणि Busy होण्याची कारणं दिली जातात.
  • जेवढा वेळ तुम्ही एकांतात राहाल
   तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात
   आणि तुम्हाला कुठं जायचंय
  • जखम करणारा विसरतो
   पण जखम ज्याला झाली तो मात्र कधीच काही विसरत नाही
  • आपली जवळची व्यक्ती दूर गेल्यानंतर कळतं की,
   एकटेपणा नक्की काय असतो!

  आयुष्यात आलेल्या एकटेपणाला खचून न जाता त्याला सामोरे जा. मनातून सगळ्या किलमिषांना बाहेर जाऊ द्या आणि नव्या चांगल्या नात्याची सुरुवात करत भूतकाळ विसरुन जा.