डाळिंबाचे दाणे अनेकजण आवडीने खातात. डाळिंब खाण्याचे आरोग्यावर अनेक चांगले फायदे होतात. शरीरात रक्त वाढण्यासाठी, त्वरीत ऊर्जा मिळण्यासाठी डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र एवढंच नाही डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे डाळिंबाची सालही आरोग्यासाठी उपयुक्त आहे. डाळिंबाच्या सालीचा वापर अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी केला जातो. प्राचीन काळापासून आयुर्वेदात या सालींचा एखाद्या वापर औषधाप्रमाणे केला जातो. डाळिंबाची साल सुकवून तिची पावडर केली जाते. या पावडरचे सेवन केल्यामुळे जुलाब, उलटीसारख्या समस्येमध्ये लवकर आराम मिळतो. एवढंच नाही तर या सालींचा वापर तुम्ही तुमचे सौंदर्य खुलवण्यासाठीही करू शकता. कारण डाळिंबाच्या सालींमध्ये अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि ऑक्सिडंट, अॅटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. चेहऱ्यावरील डाग, व्रण कमी करण्यापासून ते त्वचेवर नैसर्गिक ग्लो येण्यापर्यंत या सालींचा फायदा होऊ शकतो.
डाळिंबाच्या साली त्वचेला इनफेक्शनपासून दूर ठेवतात. शिवाय त्यांच्यामधील अॅंटि ऑक्सिंडट त्वचेची छिद्रे घट्ट करून त्वचेला आलेला सैलपणा कमी करतात. ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत आणि त्वचा चिरतरूण दिसू लागते. हिवाळ्यात त्वचा कोरडी झाल्यामुळे त्वचेवर अनेक समस्या दिसू लागतात. मात्र यावर उपाय करण्यासाठी तुम्ही या सालींपासून तयार केलेली पेस्ट फेसपॅकप्रमाणे वापरू शकता. ज्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होऊ शकते. डाळिंबाच्या सालींची पेस्ट एखाद्या सनस्क्रिनप्रमाणे काम करते. कारण यामध्ये तुमच्या त्वचेला प्रखर सुर्य किरणांपासून वाचवण्याची क्षमता असते. सहाजिकच यामुळे तुम्हाला सनबर्न, सनटॅन होत नाही. त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून गेल्यामुळे त्वचेवर पिंपल्स सारख्या समस्यादेखील निर्माण होत नाहीत. डाळिंब खाण्याचे जसे फायदे आहेत. तसेच जाणून घ्या डाळिंबाच्या सालीचा त्वचेसाठी कसा वापर करावा.
डाळिंबाची साल सुकवून त्याची कोरडी पावडर तयार करा. ही पावडर गाळून एखाद्या डब्यात भरून ठेवा. तुम्ही या पावडरचा वापर एखाद्या फेसपॅकप्रमाणे करू शकता. त्यासाठी तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार इतर पदार्थ त्यामध्ये मिसळा. आम्ही तुमच्यासोबत असेच काही फेसपॅक बनवण्याचे प्रकार शेअर करत आहोत.
फेसपॅक नं 1-
फेसपॅकसाठी साहित्य -
फेस पॅक करण्याची पद्धत -
सर्व साहित्य एकत्र करा आणि एक पातळ पेस्ट तयार करा
हा फेसपॅक चेहऱ्यावर एकसमान लावा
सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका
हा उपाय नियमित केल्यास तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल
फेसपॅक नं 2 -
फेसपॅकचे साहित्य -
फेसपॅक तयार करण्याची पद्धत -
सर्व साहित्य एकत्र करून फेसपॅक तयार करा
आठवड्यातून कमीत कमी तीनदा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा
सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका
तुमच्या चेहऱ्यावरील सुककुत्या या फेसपॅकने कमी होतील
इतर काही उपाय -