ADVERTISEMENT
home / Care
केसांचा भांग बदलणे आहे गरजेचे, का ते जाणून घ्या

केसांचा भांग बदलणे आहे गरजेचे, का ते जाणून घ्या

आतापर्यंत तुम्ही केसांसाठी कितीतरी हेअर प्रॉडक्ट्सचा वापर केला असेल आणि हेअर स्टाईलही केली असेल. पण तुम्ही कितीतरी वर्ष आपल्या केसांचा भांग बदलला नसेल. आता तुम्हाला वाटेल की भांग बदलण्याचा काय संंबंध? पण भांग न बदलण्याने खूप फरक पडतो. भांग न बदलणे की कशी काय चूक ठरू शकते ते आम्ही तुम्हाला सांगतो. हेअर पार्टिंग (Hair Parting) अर्थात तुम्ही नियमित भांग बदलत राहायला हवा. याचा नक्की काय फायदा हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचायला हवा. तुम्हाला खरं तर याची जाणीवही नसेल. पण भांग बदलण्याने तुमच्या केसांचे मूळ हे व्यवस्थित श्वास घेऊ शकतात. लहान सहान केस जे गळतात ते प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. त्यामुळे हेअर पार्टिंग बदलणे अत्यंत गरजेचे असते आणि हे केसांसाठी फायदेशीर ठरते. हेच नाही तर भांग बदलण्याने तुमचा लुकही लगेच बदलतो. चेहऱ्यातही फरक पडतो. तुम्ही जर साईड पार्टिंग अर्थात बाजूने भांग काढत असाल तर तुमच्या केसांचा व्हॉल्युमही बदलतो आणि चांगला व्हॉल्युम मिळतो. याचे नक्की काय फायदे आहेत ते सविस्तर जाणून घेऊया. 

नवा लुक मिळतो

बऱ्याचदा आपण स्वतःला तसंच सारखं बघून कंटाळवाणे फील करू लागतो. स्वतःच्या स्टाईलचाच स्वतःला कंटाळा येतो. त्यामुळे अशावेळी तुम्ही तुमचा भांग बदलून पाहा. तुम्हाला जर केसांमध्ये खूप मोठा बदल नको असेल अर्थात केसांना कोणाताही रंग लावणे अथवा वेगळा एखादा कट करणे असं नको असेल तर अशावेळी लुक बदलण्याचा आणि नवा लुक मिळविण्याचा उत्तम पर्याय म्हणजे हेअर पार्टिंग अर्थात भांग बदलणे. जर तुम्ही मधून भांग पाडत असाल तर तुम्ही तुम्ही साईड पार्टिंग करा आणि जर पहिल्यापासून साईड पार्टिंग असेल तर तुम्ही मधून भांग पाडून पाहा. हा लहानसा बदलही तुम्हाला नवा लुक मिळवून देतो आणि तुम्हाला अधिक सुंदर आणि आकर्षक बनवतो. यासह तुम्ही एखादी MyGlamm ची लिपस्टिकही वापरून पाहू शकता. 

कुरळ्या केसांची स्टाईल करण्यासाठी वापरा 10 सोप्या टीप्स

केस तुटणे थांबवतो

आता तुमच्या मनात विचार येईल की भांग बदलण्याचे केसांचे तुटणे कसे काय थांबू शकते? यामागे एक लॉडिक आहे. जेव्हा तुमचा ठरलेला भांग असतो तेव्हा तिथेच तुम्ही जोर देता. कंगवा तिथेच फिरवला जातो अथवा कोणतीही स्टाईल करताना तिथेच हिट दिली जाते. मग अशावेळी केस तुटतात. दुसरे कारण म्हणजे सतत एकाच भागावर कंगवा फिरून केस तुटण्याची समस्या जास्त निर्माण होते. त्यामुळे भांग बदलल्यास, मूळ घट्ट राहते आणि केस तुटणे थांबते. 

ADVERTISEMENT

DIY: प्रत्येक कार्यक्रमासाठी करा 31 सोप्या हेअरस्टाईल्स (Simple Hairstyle In Marathi)

सफेद केस आणि कोंडा लपवला जातो

वेळेच्या आधी केस पांढरे होत असतील तर याचे सर्वात पहिले लक्षण तुम्हाला केसांच्या मुळाशी दिसू लागते. तुम्ही जर मधून भांग पाडत असाल तर तुम्हाला साईड भांग पाडून मधील सफेद केस लपवता येतात. यासाठी तुम्हाला केसांना कोरडे करण्याचीही गरज भासत नाही. तसंच तुमच्या केसात कोंडा असेल तर तोदेखील भांग बदलण्याने लपला जातो. सर्वात महत्वाचे म्हणजे केसांना चांगला व्हॉल्युम मिळतो. त्यामुळे काही काळाने तुम्ही भांग बदलत राहायला हवा. 

हेअरस्टाईल करताना हेअर स्टायलिंग स्प्रे वापरताय, मग वाचाच

तुम्हाला वेगळे काहीतरी करण्याची संधी मिळते

कोण म्हणतं की भांग हा केवळ दोन तऱ्हेचाच असतो. तुम्हाला जर काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही डायगोनल, झिगझॅग असा पर्यायही वापरू शकता. यामुळे तुम्हाला वेगळा लुक मिळतो. तुम्हाला हवं तुम्ही याच्या मुळाशी ग्लिटर लावा. यामुळे ग्लॅमर लुक मिळतो. तसंच तुम्हाला हेअर स्टाईल बनविण्यासाठी तासनतास बसावं लागणार नाही आणि नवा लुकही मिळतो. स्लीक आणि केस ओले असतील तेव्हा हे भांग तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्यामुळे भांग काढायलाही वेळ लागणार नाही. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

21 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT