घाम आल्यामुळे त्वचा होते अधिक सुंदर, जाणून घ्या कसे

घाम आल्यामुळे त्वचा होते अधिक सुंदर, जाणून घ्या कसे

घाम आला असे जरी म्हटले तरी अनेकांना किळस येते. घाम आणि घामाची दुर्गंधी यापासून अनेक जण लांबच पळतात. कायम सुंगधी राहायचे असेल तर घाम कधीच येऊ नये असे अनेकांना वाटत.े त्यानुसार घाम काही जणांना येतही नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? घाम येणे हे त्वचेसाठी फारच चांगले असते. घामामुळे तुमची त्वचा दीर्घकाळासाठी चांगली राहते. आता तुम्हाला या गोष्टीवर पटकन विश्वास बसणार नाही. पण तुमच्या त्वचेसाठी घाम हा वरदान आहे. घामामुळे त्वचेला अनेक फायदे मिळतात. जाणून घेऊया घामामुळे नेमकी त्वचा कशी चांगली राहते या विषयीअत्यंत महत्वाची माहिती

DIY: त्वचेवर इन्संट ग्लो हवा असेल तर असा वापर करा 'पपई'चा

उत्तम डिटॉक्स (Best Detox)

तुम्ही ज्यावेळी खूप चालता, धावता किंवा व्यायाम करता त्यावेळी तुम्हाला खूप घाम येतो. काहींना हा घाम काखेत, मानेजवळ, जांघाजवळ आणि चेहऱ्यावरही येतो.शरीरातून घामाचे उत्सर्जन होणे म्हणजे शरीर डिटॉक्स होण्यासारखे असते. उत्तम त्वचेसाठी शरीर डिटॉक्स होणे गरजेचे असते. काहीही न करता जर तुम्हाला घामामुळे डिटॉक्स करणे सोपे जात असेल तर तुम्ही रोज चालत किंवा धावत जा. तुमचे रोजच्या रोज डिटॉक्स अगदी सहज होईल. ज्याचा फायदा तुम्हाला त्वचेसाठी होईल. 

चांगली झोप (Good Sleep)

उत्तम त्वचेसाठी चांगली झोप ही महत्वाची असते. जर तुम्ही साधारण 8 तासांची झोप घेत असाल तर तुमची त्वचा ही रिलॅक्स राहते. शरीरावरील ताण कमी होतो. तजर तुम्ही खूप धावलात किंवा व्यायाम केला तर तुमच्या घामाचे उत्सर्जन होते. तुम्ही थकलात की तुम्हाला छान झोप येते. घाम येण्याचा त्वचेशी निगडीत हा आणखी एक चांगला फायदा आहे. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येत नसेल तर तुम्ही शरीराची खूप कसरत करा तुम्हाला नक्कीच फरक पडेल. 

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर त्वचेवर लावा 'दुधाची साय'

त्वचा विकारापासून ठेवते दूर ( Improve Skin Health)

घाम हा त्वचा विकारांनाही दूर ठेवतो. घाम तेव्हाच येतो ज्यावेळी तुम्ही कोणत्यातरी अॅक्टिव्हिटीमध्ये असता. व्यायामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते. तुमचे आरोग्य चांगले असेल तर तुमची त्वचाही चांगली राहते. जर तुम्ही आजारी असाल किंवा आरोग्याची योग्य काळजी घेत नसाल तर तुम्ही ती घ्यायला हवी. तुम्ही फिटनेस राखत असाल तर किंवा तुम्हाला योग्य पद्धतीने घाम येत असेल तुम्ही त्वचाविकारापासून दूर राहता.

 

वजन ठेवते नियंत्रणात (Weight Control)

घाम येणे म्हणजे शरीराची योग्य पद्धतीत हालचाल करणे. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर तुमचे वजन नियंत्रणात राहते. वाढीव वजन हे देखील त्वचेसाठी चांगले नसते. जर तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी थोडी मेहनत घेतली तर तुमचे वजन नियंत्रणात राहील. घामामुळे अतिरिक्त चरबी बाहेर पडण्यास मदत मिळते.  त्यामुळे तुम्ही वजन  नियंत्रणात ठेवा. 


घामाचे फायदे वाचून झाले असतील तर तुम्हाला त्वचेसाठी ते कसे फायदेशीर आहे ते कळेल.

फेस सीरम तुमच्या त्वचेवर आणेल ग्लो, जाणून घ्या बेस्ट फेस सीरम