एअर एंड जसा जवळ येतो. तसे अनेकांना पार्टीचे वेध लागतात. आता पार्टी म्हटली की, पार्टीचा एकदम फर्स्ट क्लास असा मेन्यू आलाच. यंदा घरीच राहून तुमच्या आवडीच्या पदार्थांवर ताव मारायचे तुम्ही ठरवले असेल तर काही खास पदार्थ तुम्ही बाहेरुन मागवण्यापेक्षा घरीच केले तर ते तुम्हाला अधिक फायद्याचे ठरु शकतात. जर तुम्ही नॉन- व्हेज लव्हर असाल तर तुम्हाला या दिवशीही नॉन- व्हेजचा आनंद नक्कीच घ्यायला आवडेल. म्हणून आम्ही काही खास आणि झटपट होतील अशा चिकनच्या स्टाटर्स रेसिपी शोधल्या आहेत. त्या अगदी कोणालाही घरी करता येतील अशा आहेत चला जाणून घेऊया या सोप्या रेसिपीज
बेकरीसारखा लुसलुशीत लादीपाव करा घरीच,परफेक्ट रेसिपी
चिकन पॉपकॉर्न
Instagram
लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत कोणालाही आवडणारी अशी ही रेसिपी विकत घेऊनच खाल्ली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का ? हे क्रिस्पी चिकन पॉपकॉर्न घरी बनवता येतात. विशेष म्हणजे ते घरातही अगदी तसेच बनतात. बाहेरुन विकत आणण्यापेक्षा घरात तुम्ही जर ते केले तर ते स्वस्त तर पडतेच. शिवाय ते तितकेच टेस्टी असते.
साहित्य: ½ किलो बोनलेस चिकन , 2 ते 3 मोठे चमचे आलं-लसूण पेस्ट, 2 मोठे चमचे ओरिगॅनो(ड्राय), 2 चमचे लाल तिखट किंवा पेपरिका पावडर, मैदा,ब्रेड क्रम्बस, काळीमिरी पावडर, कांदा पावडर, लसूण पावडर, दोन अंडी
कृती :
- बोनलेस चिकनचे बारीक बारीक तुकडे करुन घ्या.
- एका बाऊलमध्ये चिकनचे तुकडे घेऊन त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, ओरिगॅनो, लाल तिखट, पेपरिका पावडर, काळीमिरी पावडर, कांदा पावडर, लसूण पावडर घालून ते आदल्या रात्री मॅरिनेट करुन ठेवा.
- ज्यावेळी तुम्ही हे चिकन तळायला घेणार असाल त्याच्या आधी साधारण 1 तास आधी काढून ठेवा. कारण चिकन नॉर्मल टेंपरेचरला येणे फार गरजेचे आहे. तरचं ते चांगले तळले जाईल.
- मॅरिनेटेड चिकन चांगले कालवून घ्या.सगळ्या चिकनपीसला मसाला लागायला हवा.
- आता एका भांड्यात अंडे फेटून घ्या आणि दुसरीकडे मैदा आणि ब्रेड क्रम्बस काढून घ्या.
- आता चिकन आधी मैद्यामध्ये कालवून मग अंडयात घोळवा. पुन्हा मैद्या आणि क्रम्बसच्या मिश्रणात घोळवून घ्या. ही कृती दोनवेळा करा.
- एका कढईत तेल तापवून त्यात चिकन छान शिजेपर्यंत तळून घ्या. तुमचे घरगुती चिकन पॉपकॉर्न तयार
रात्रीच्या जेवणानंतर बनवा झटपट 'मीठा पान', सोपी रेसिपी
चिकन 65
Instagram
चायनीज ज्यांना आवडत असेल त्यांना हमखास आवडणारी एक रेसिपी म्हणजे चिकन 65. ही रेसिपीही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरीच करता येऊ शकते. कशी..? चला जाणून घेऊया.
साहित्य: ½ किलो बोनलेस चिकन, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला,गरम मसाला तांदुळाचे पीठ,कॉर्न फ्लॉवर, मैदा, दही, मीठ
फोडणीसाठी : ढोबळी मिरची, बारीक चिरलेलं आलं- लसूण,कांदा, कडिपत्ता, सोया सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर मिरची कोथिंबीर , तळण्यासाठी आणि फोडणीसाठी तेल
कृती :
- सगळ्यात आधी चिकन मॅरेिनेट करुन घ्यायचे आहे. त्यासाठी चिकनचे बारीक बारीक तुकडे करुन घ्या. त्यामध्ये मीठ, दही, आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून त्याला चांगले 2 ते चार तासांसाठी मॅरिनेट करायला ठेवा.
- आता चिकन तेलात तळून घ्यायचं आहे. त्यासाठी तांदूळ पीठ, कॉर्न फ्लॉवर, मैदा त्यात थोडे मीठ घालून चिकन घोळवून ते छान तळून घ्यायचे आहे.
- आता फोडणीची तयारी करण्यासाठी तेल गरम करुन त्यामध्ये बारीक चिरलेले आलं-लसूण, कडिपत्ता, मोठा चिरलेला कांदा, मिरची आणि ढोबळी मिरची घालून मोठ्या आचेवर चायनीज प्रमाणे ते चांगले एकजीव करुन घ्या. त्यामध्ये सोया सॉस, व्हिनेगर, रेड चिली सॉस घाला. चिकनचे तळलेले तुकडे घालून छान परतून घ्या. सगळे एकजीव होण्यासाठी आचं मंद करुन झाकून ठेवा.
- वरुन कोथिंबीर भुरभुरुन मस्त चिकन 65 चा आस्वाद घ्या.
महाराष्ट्रीयन थाळीमध्ये हे पदार्थ करा समाविष्ट (Maharashtrian Thali Menu In Marathi)
चिकन क्रिस्पी
Instagram
चायनीजचाच प्रकार असलेली ही तिसरी रेसिपी म्हणजे चिकन क्रिस्पी. ही रेसिपीही स्टाटर म्हणून एकदम उत्तम आहे. तुम्ही ती कधीही करु शकता. ही साधारण चिकन 65 प्रमाणेच असते असे म्हणायला काहीच हरकत नाही.
साहित्य: बोननलेस चिकन, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, लिंबाचा रस, अंड, चिली सॉस, कॉर्नफ्लॉवर, मैदा, आलं-लसूण बारीक चिरुन,लाल सुक्या मिरच्या, शेजवॉन सॉस,ढोबळी मिरची, मीठ
कृती :
- बोनलेस चिकन घेऊन त्याचे लांब-लांब तुकडे करुन घ्या. आपल्याला त्याच्या स्ट्रिप्स स्वरुपात कापून घ्या.
एका भांड्यात चिकन पिसेस घेऊन त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट लावून मॅरिनेट करा.
- मॅरिनेटेड चिकन काढून एका भांड्यात सगळी कोरडी पीठं एकत्र करुन घ्या. एका भांड्यात अंड फोडून घ्या.
चिकन पिठात अंड्यात आलटून पाटलून घोळवून घ्या. चिकनचे पीस छान तळून घ्या.
- आता फोडणीची तयारी करा. एका भांड्यात तेल घेऊन लसूण-आलं बारीक चिरुन घाला. त्यामध्ये लाल सुकी मिरची, ढोबळी मिरची घालून छान परतून घ्या.त्यामध्ये शेजवॉन सॉस घाला. चिकनचे तळलेले पीस घालून त्यामध्ये पाण्याचा हबका मारुन थोडे वाफवून घ्या.
- या तीन रेसिपीज तुम्ही नक्की करुन पाहा. तुम्हाला नक्की आवडतील.