ADVERTISEMENT
home / Dry Skin
कोरड्या त्वचेसाठी उत्तम क्लिंन्झर (Best Cleanser For Dry Skin In Marathi)

कोरड्या त्वचेसाठी उत्तम क्लिंन्झर (Best Cleanser For Dry Skin In Marathi)

त्वचेची काळजी घेणे आणि त्वचा रोज स्वच्छ करणे. यासाठी तुम्हाला एका उत्तम क्लिंन्झरची गरज भासते, जो त्वचेला स्वच्छ करून त्वचेमधील मऊ आणि मुलायमपणा राखून ठेवतो. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांना याचा जास्त त्रास होतो. पण कोरड्या त्वचेसाठी नक्की कोणते क्लिंन्झर वापरायचे हे तुम्हाला माहीत आहे का? बाजारामध्ये अनेक ब्रँड्सचे क्लिंन्झर असतात. पण त्यापैकी कोणताही तुम्ही वापरू शकत नाही. त्यापैकी काही चांगले आणि तुमच्या त्वचेला उपयोगी ठरणाऱ्या उत्तम क्लिंन्झरची योग्य माहिती आम्ही या लेखातून तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्ही याविषयी अधिक माहिती जाणून घ्या आणि मग त्याचा उपयोग करून पाहा. आम्ही या लेखातून प्रत्येक उत्पादनाविषयी कंपनीचा दावा आणि ग्राहकांचा वापर याचा अभ्यास करून तुम्हाला याची माहिती दिली आहे हे लक्षात घ्या. त्वचा कोरडी होत असेल तर काही सोप्या टिप्स वापरूनही तुम्ही त्याची काळजी घेऊ शकता. 

मायग्लॅम ग्लो इरिडेसेंट ब्रायटनिंग फोम क्लिंन्झर (MyGlamm Glow Iridescent Brightening Foam Cleanser)

त्वचा कोरडी पडली की ती अधिक सुकते आणि ओढली जाते. नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार करण्यात आलेले मायग्लॅमचे हे क्लिंन्झर नक्कीच तुमच्या कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते. कोरड्या त्वचेसाठी आपण काही घरगुती उपायही करत असतो. केवळ कोरडी त्वचाच नाही तर कोणत्याही त्वचेसाठी हे क्लिंन्झर उपयुक्त आहे. तुमची त्वचा मऊ टिकवून ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे

गुण – 

  • त्वचेसाठी अत्यंत मऊ
  • जेल स्वरूपात असल्याने लावण्यास सोपे
  • धूळ, मेकअप आणि प्रदूषणासाठी अत्यंत उपयुक्त 
  • यामध्ये विटामिन ए, सी, डी आणि ई चा समावेश 
  • त्वचेला पोषण देते
  • क्रुएल्टी फ्री
  • रोज वापरण्यासाठी उपयुक्त 
  • नैसर्गिक घटकांनी युक्त 

अवगुण

ADVERTISEMENT

काहीही नाही 

हिमालया हर्बल्स रिफ्रेशिंग क्लिंन्झिंग मिल्क (Himalaya Herbals Refreshing Cleansing Milk)

कोरड्या त्वचेसाठी क्लिंन्झरच्या यादीमध्ये भारतातील प्रसिद्ध हिमालया ब्रँड येणार नाही असं होणारच नाही. याचे रिफ्रेशिंग क्लिन्झिंग मिल्क हे त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. तसंच हे नैसर्गिक घटकांनी बनविण्यात आले आहे. क्लिंन्झरबद्दल कंपनीचे म्हणणे आहे की, यामध्ये समाविष्ट असणाऱ्या औषधी वनस्पती या त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यास मदत करतात. तसंच त्वचेची काळजी घेण्यासाठी हे चांगले आहे. 

गुण 

  • अशुद्ध चेहऱ्यावर बसलेली घाण स्वच्छ करण्यास मदत करते
  • मेकअप काढून टाकण्यास मदत 
  • नैसर्गिक घटक लिंबू, ग्रेप सीड आणि मिंट याचा समावेश 
  • त्वचेचे मॉईस्चर संतुलित करते 
  • त्वचेला अधिक निरोगी करण्यासाठी उपयुक्त 
  • यामध्ये असणारे नैसर्गिक घटक त्वचेला पोषण देण्याचे काम करते 
  • त्वचेवर येणारी खाज नियंत्रित करण्यास मदत 

अवगुण

ADVERTISEMENT

तेलकट त्वचा असणाऱ्यांना चिकट वाटण्याची शक्यता

वादी हर्बल एलोवेरा डीप पोअर क्लिंन्झिंग मिल्क (Vaadi Herbal Aleo Vera Deep Pore Cleansing Milk)

जसं या उत्पादनचाे नाव आहे तसंच याचे कामही आहे. चेहऱ्यांच्या अगदी छिद्रांच्या आत जाऊन घाण स्वच्छ करण्याचे काम हे करते. तसंच त्वचा ताजी ठेवण्याचेही काम करते. कंपनीच्या दाव्याप्रमाणे हे क्लिंन्झर बनवताना नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आला आहे. लिंबू आणि कोरफड याचा वापर मुख्यत्वे यामध्ये करण्यात आला असून हे दोन्ही घटक चेहऱ्यावरील घाण काढून टाकण्यास आणि चेहरा मॉईस्चराईज करण्यास मदत करतात. यामुळेच हे कोरड्या त्वचेसाठी उत्तम क्लिंन्झर मानले जाते.  

गुण – 

  • त्वचेला मुलायम करते 
  • त्वचेवरील मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त 
  • हलका मेकअप असेल तर काढता येऊ शकतो
  • पंप डिस्पेन्सर आहे ज्याचा उपयोग करणे अत्यंत सोपे आहे

अवगुण

ADVERTISEMENT

संवेदनशील त्वचा असेल तर याचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घेणे आवश्यक आहे 

लॅक्मे जेंटल अँड सॉफ्ट डीप पोअर क्लिंन्झर (Lakme Gentle And Soft Deep Pore Cleanser)

 

कोरड्या त्वचेसाठी क्लिंन्झर स्वरूपात लॅक्मेचे हे उत्पादन तुम्ही नक्कीच बिनधास्त वापरू शकता. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे यामध्ये विटामिन ई आहे, जे अँटिऑक्सिडंट्सच्या गुणासाठी ओळखले जाते. विटामिन ई त्वचेला मॉईस्चराईज करण्याचे काम करते. तसंच त्वचेला निरोगी ठेऊन तुम्हाला अधिक चांगली त्वचा मिळते. 

गुण

  • त्वचेचे पोअर्स अधिक आत जाऊन स्वच्छ करण्यास मदत 
  • त्वचेला पोषण देते
  • त्वचेवरून घाण काढून टाकण्यास मदत 
  • त्वचेतून अतिरिक्त तेल आणि मेकअप काढून टाकते
  • चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचा अधिक मऊ आणि मुलायम ठेवते
  • यामधील कोरफड कोरडी त्वचा चांगली करण्यास मदत करते

अवगुण

ADVERTISEMENT

यामध्ये पॅराबेन केमिकल्सचा वापर करण्यात आला आहे

 

 

लोटस हर्बल्स टर्मरिक अँड लेमन क्लिंन्झिंग मिल्क (Lotus Herbals Turmeric And Lemon Cleansing Milk)

लोटसचे हे क्लिंन्झर लिंबू, हळद आणि वेटिवर अर्काने युक्त आहे. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे यामध्ये असमारे तत्व आणि बदाम तेल त्वचेवर नैसर्गिक क्लिंन्झरनुसार काम करते. यामुळेच कोरड्या त्वचेसाठी हे क्लिंन्झर उत्तम ठरते. हळद ही नैसर्गिकरित्या त्वचेसाठी उत्तम असल्याने याचा उपयोग करून घेता येतो. 

ADVERTISEMENT

गुण

  • हे क्लिंन्झिंक मिल्क त्वचेच्या आतमध्ये जाऊन त्वचेची स्वच्छता घेते 
  • महिला आणि पुरूष दोघांसाठी उपयुक्त
  • त्वचेला अधिक तरूण दिसण्यासाठी मदत करते 
  • त्वचेवर मऊपणा टिकवून ठेवते 
  • सगळ्या प्रकारच्या स्किन टोनसाठी उपयुक्त आहे
  • त्वचेवरील इलास्टिसिटी टिकवते 
  • पिंपल्सपासून सुरक्षा करते

अवगुण

  • याच्या नकली उत्पादनापासून सावधान राहा
  • यामध्ये पॅराबेनचा वापर करण्यात आला आहे

व्हीएलसीसी सँडल्स क्लिंन्झिंग मिल्क (VLCC Sandals Cleansing Milk)

कोरड्या त्वचेसाठी क्लिंन्झर स्वरूपात व्हीएलसीसी सँडल क्लिंन्झिंग मिल्कचा वापर करू शकता. यामध्ये चंदनाचे सर्व गुण असून कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे यातील सर्व वापरण्यात आलेले घटक हे नैसर्गिक स्वरूपाचे आहेत. तसंच यामध्ये चंदनाच्या तेलासह बदाम आणि इंडियन बारबेरीचे मिश्रणही आहे. जे त्वचेला नैसर्गिक उजळपणा देते आणि त्वचा अधिक स्वच्छ राहण्यास मदत मिळते.

गुण

ADVERTISEMENT
  • चेहऱ्यावर आलेले मुरूमं रोखण्यासाठी याची मदत मिळते
  • सामान्य आणि कोरडी त्वचा असल्यास उपयुक्त 
  • चेहऱ्यावरील आलेले काळे डाग कमी करण्यासाठी उपयुक्त 
  • याचा सुगंध चांगला आहे
  • चेहऱ्यावर हलका मेकअप असेल तर काढून टाकता येतो 

अवगुण

  • जाड आहे. त्यामुळे काही लोकांना वापरताना समस्या येऊ शकते. जाडे असल्याने कमी प्रमाणात तुम्ही त्वचेला लाऊ शकता
  • बाजारात विकत घेताना याच्याशी मिळते जुळते उत्पादन तर नाही ना याची नीट खात्री करून घ्या

खादी नॅचरल क्लिंन्झिंग मिल्क (Khadi Natural Cleansing Milk)

त्वचा कोरडी पडली आहे आणि ही तुमची सर्वात मोठी समस्या असेल तर त्यासाठी तुम्ही खादी नॅचरल क्लिंन्झिंग मिल्कचा वापर करू शकता. हे क्लिंन्झिंग मिल्क तुमची त्वचा आतून स्वच्छ करते. हे बनवताना यामध्ये कोरफड आणि काकडीचा वापर करण्यात आला आहे. जो त्वचेतील घाण काढून त्वचेला थंडावा देण्याचे काम करतो. त्यामुळेच खादी नॅचरल क्लिंन्झिंग मिल्क हे उत्तम क्लिंन्झरपैकी एक आहे. 

गुण

  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त
  • त्वचा हायड्रेट करते
  • नॉर्मल आणि वॉटरप्रूफ या दोन्ही स्वरूपाच्या मेकअप रिमूव्हलसाठी उपयुक्त
  • याचा सुगंध चांगला आहे 
  • त्वचेच्या आत छिद्रांमध्ये जाऊन घाण स्वच्छ करते 
  • शिया आणि कोको बटर तुम्हाला अधिक चांगली त्वचा मिळवून देते 

अवगुण

ADVERTISEMENT
  • बाटली मोठी असल्याने प्रवासात नेऊ शकत नाही
  • पंप डिस्पेन्सर नसल्याने बाटलीतून हातावर घेताना त्रास होतो

द बॉडी शॉप विटामिन – ई क्रिम क्लिंन्झर (The Body Shop Vitamin E Cream Cleanser)

बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या कोरड्या त्वचेसाठी उत्तम क्लिंन्झरपैकी बॉडी शॉपचे हे क्लिंन्झर समाविष्ट आहे. कंपनीनुसार, हे बनविताना विटामिन ई आणि व्हिटजर्म तेलाचा वापर करण्यात आला आहे. ही तत्व त्वचेला अशुद्धता आणि घाणीपासून दूर ठेवतात आणि त्वचा अधिक मुलायम करण्याचे काम करतात. 

गुण 

  • सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे
  • अतिशय हलके आणि क्रिमी टेक्स्चर आहे
  • त्वचा हायड्रेट करते 
  • मेकअप स्वच्छ करण्यास उपयुक्त 

अवगुण

अधिक तेलकट त्वचा असणाऱ्यांना कदाचित हे चिकट वाटू शकते

ADVERTISEMENT

लस्टर ऑर्गेनिक कोकोनट क्लिंन्झिंग मिल्क (Luster Organic Coconut Cleansing Milk)

कोरड्या त्वचेसाठी सर्वात चांगले क्लिंन्झर शोधत असाल तर याचा वापर करू शकता. यामध्ये नारळ पाण्याचे गुण असून कोरडी त्वचा अधिक मुलायम करण्यासाठी याचा उपयोग होतो. कंपनीच्या दाव्यानुसार, हे क्लिंन्झर शंभर टक्के ऑर्गेनिक आहे. तसंच हे पेराबेन्स आणि सल्फेटमुक्त आहे. त्यामुळे त्वचेसाठी उत्तम असून याचा फायदा त्वचेला मिळतो.

गुण

  • चिकटपणा जास्त नाही 
  • अत्याधिक तेल आणि घाण स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग
  • मेकअप स्वच्छ करण्यासाठीही याचा उपयोग होतो
  • चेहऱ्यावर असलेले काळे डाग कमी करण्यासाठी उपयुक्त
  • त्वचेला पोषण देते आणि त्वचा अधिक निरोगी बनवते 
  • त्वचा चमकदार बनवते 
  • पंप डिस्पेंन्सर असल्याने सहज उपयोग करता येतो

अवगुण 

  • बाटली मोठी असल्याने प्रवासात नेऊ शकत नाही
  • अधिक तेलकट त्वचा असणाऱ्यांना कदाचित हे चिकट वाटू शकते

न्यूट्रोजेना युनिसेक्स डीप क्लिन फेशियल क्लिंन्झर (Neutrogena Unisex Deep Clean Facial Cleanser)

कोरड्या त्वचेसाठी हे क्लिंन्झर चांगले समजण्यात येते. मुळात त्वचेतील घाण काढून टाकण्यासाठी आणि त्वचा अधिक चांगली आणि निरोगी राखण्यासाठी याची मदत मिळते. यामध्ये नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आला आहे. 

ADVERTISEMENT

गुण 

  • सर्व त्वचेसाठी वापरता येते
  • महिला आणि पुरूषांना दोघांनाही उपयुक्त
  • वापरणे सोपे 
  • त्वचा मऊ आणि मुलायम राखण्यास मदत मिळते 
  • चेहऱ्यावर अधिक ताजेपणा दिसून येतो 

अवगुण 

काहीही नाही 

कोरड्या त्वचेसाठी योग्य क्लिंन्झर कसे निवडावे (How To Choose Perfect Cleanser For Dry Skin In Marathi)

त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपण काय काय नाही करत. कोरड्या त्वचेसाठी क्लिंन्झर निवडताना जर गोंधळ उडत असेल तर त्यासाठी काही सोप्या टिप्स आम्ही तुमच्या मदतीसाठी इथे देत आहोत. तुम्ही त्याचा वापर करून तुमच्या कोरड्या त्वचेसाठी उत्तम क्लिंन्झर निवडू शकता. 

ADVERTISEMENT
  • कोरड्या त्वचेसाठी क्लिंन्झर खरेदी करण्यापूर्वी त्यामध्ये कोणती तत्व आहेत याची पहिले तुम्ही तपासणी करून घ्या. त्यामध्ये कोणतेही केमिकल्स नाहीत ना याचीही तपासणी करा 
  • एखादे नैसर्गिक तत्वानी बनलेले क्लिंन्झर असेल तर तुम्ही त्याला प्राधान्य द्या 
    कोरड्या त्वचेसाठी क्लिंन्झर 100 टक्के आयुर्वेदिक आणि ऑर्गेनिक आहे की नाही ते पण पाहून घ्या. जेणेकरून तुम्हाला वापर करणं सोपं होईल
  • उत्पादन वापरण्याचा कालावधी किती आहे तेदेखील तपासून घ्या 
  • कोणतेही उत्पादन प्रमाणित आहे की नाही याचीही शहानिशा करून घ्या. ते जास्त महत्त्वाचे आहे. ही माहिती तुम्ही विकत घेत असणाऱ्या उत्पादनावर छापलेली असते
  • कोरड्या त्वचेसाठी क्लिंन्झर खरेदी करताना तुम्ही अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करा. यामुळे बनावट उत्पादनांपासून तुम्ही नक्कीच दूर राहाता. ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवणं गरजेचे आहे.

प्रश्नोत्तरे (FAQs)

1. कोरड्या त्वचेसाठी कोणतेही क्लिंन्झर वापरणे योग्य आहे का?

अजिबात नाही. कोरड्या त्वचेमुळे त्वचा अधिक खेचली जाते आणि खराब होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे क्लिंन्झर वापरून चालणार नाही. त्वचा अधिक मऊ आणि मुलायम राहील असंच क्लिंन्झर तुम्हाला वापरावे लागेल.

2. कोरड्या त्वचेवर क्लिंन्झरमुळे काही फरक पडतो का?

क्लिंन्झर ही आपली त्वचा अधिक चांगली राखण्यासाठी मदत करते. त्याशिवाय त्वचेच्या रोमछिद्रातील घाण काढून टाकण्यासही क्लिंन्झरचा उपयोग होतो. त्यामुळे नक्कीच कोरड्या त्वचेवर अधिक चांगला प्रभाव क्लिंन्झरचा पडतो आणि तुमची त्वचा अधिक चांगली राखण्यास मदत मिळते.

3. कोरड्या त्वचेसाठी जेल क्लिंन्झरचा वापर चांगला ठरतो का ?

जेल क्लिंन्झर तुमची त्वचा अधिक चांगली आणि हायड्रेट राखण्यास मदत करते. इतर क्लिंन्झरच्या तुलनेत त्वचेला अधिक पोषण जेल क्लिंन्झरमुळे मिळते. त्यामुळे कोरड्या त्वचेसाठी जेल क्लिंन्झर हे अधिक लाभदायक ठरते.

पुढे वाचा – 

Tips for Dry Skin in Hindi

 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
09 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT