‘ब्रा’ चे वेगवेगळे प्रकार पाहता अनेकांना कोणत्या प्रकारची ब्रा घालायची हा प्रश्न अनेकांना असतो. ‘ब्रा’चे काम हे स्तनांना उभारी आणण्याचे असते. पण काहींना अजूनही कोणत्या प्रकारची ब्रा घालायची हे कळत नाही. त्यामुळे त्यांना हवी असलेली उभारी मिळत नाही. स्तनांचा आकार मोठा असो वा लहान स्तनांना उभारी देण्याचे काम ब्रा करतात. स्तनांना उभारी देणाऱ्या ब्राचे पॅटर्न आणि प्रकार वेगळे असतात. सध्या बाजारात नेमक्या कोणत्या अशा ब्रा आहेत जे स्तनांना उभारी देऊ शकतील, असे ब्रा चे पॅटर्न जाणून घेऊया.
स्तनांच्या बाजूची चरबी वाढू न देण्यासाठी ब्रा घालताना टाळा या चुका
पुशअप ब्राचा पहिला प्रकार म्हणजे पुशअप प्लंज ब्रा. प्लंज ब्रा ही डीप नेक ब्रा असते. पण असे असले तरी त्याचा पुशअप हा चांगला असतो. त्यामुळे स्तनांना उभारी मिळण्यास मदत मिळते. प्लंज ब्रा हा प्रकार तुम्हाला पंजाबी ड्रेस, कुडता आणि टी शर्टवर घालता येतो. ही ब्रा जर योग्य फिटिंगची असेल तर पुशअप प्लंज ब्रा हा प्रकार तुमच्या स्तनांना खूप उत्तम उभारी देतो. पुशअप प्लंज ब्रा या पातळ कपड्यांमध्ये असतात. त्यामुळे त्यामध्ये घामसुद्धा येत नाही.
किती तऱ्हेच्या असतात ब्रा, जाणून घ्या कोणती ब्रा कधी वापरायची (Different Types Of Bra In Marathi)
पुशअप ब्रा हे वेगवेगळ्या मटेरिअलमध्ये असतात. पण अनेकांना कॉटन मटेरिअल हे फार कम्फर्टेबल असते. कॉटन मटेरिअलच्या पुशअप्स ब्रा या फार चांगल्या उभारी देतात. स्तनांना उभारी देण्यासाठी तुम्हाला कॉटन पुशअप्स निवडायच्या असतील तर तुम्ही या प्रकारच्या ब्रा निवडण्यास काहीच हरकत नाही. कॉटन पुशअप ब्रामध्ये तुम्हाला वेगवेगळे रंग मिळतात. या ब्राचे रंग फार गडद असते तर ते लाईट कपड्यांच्या बाहेर दिसण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही कॉटन पुशअप ब्रा निवडू नका किंवा रंग निवडताना ते प्लेन किंवा लाईट रंगाचे निवडा.
सीमलेस हा ब्राचा प्रकार अनेकांना आवडणारा असा आहे. कारण ब्रा घातली हे दाखवायला कोणालाही आवडत नाही. ब्रा अशी असावी जी घातल्यानंतर तिच्या कोणत्याही कडा कुठूनही दिसायला नको. सीमलेस पुशअप ब्रा या वायर्ड आणि नॉन वायर्ड अशा दोन्ही प्रकारातील मिळतात. यामध्ये तुम्हाला निऑन रंग जरी असला तरी असे रंग वेगळ्या मटेरिअलमुळे ते दिसत नाही. या ब्रा शरीराला अशा पद्धतीने एकरुप होतात की. त्या अजिबात दिसत नाही. ब्राची फिटिंग छातीला अशी योग्य पद्धतीने बसते की, सीमलेस पुशअप ब्रा तुमच्या वॉर्डरोबमध्ये असलायलाच हवी.
पुशअप ब्रामध्ये कॉटननंतर नॉन वायर्डमध्ये एक प्रकार मिळतो तो म्हणजे नॉन वायर्ड पुशअप ब्रा. अनेकांना वायर्ड ब्रा आवडत नाही. कारण वायर्ड ब्रा या छातीकडे टोचत राहतात. वायर्ड ब्रा एका ठिकाणी राहत नाही. त्या सतत खेचत राहावे लागते असे अनेकांना वाटते. अशावेळी तुम्ही नॉन वायर्ड पुशअप ब्रा घालायला हवी. या पुशअप ब्रा या दिसायला अधिक चांगल्या दिसतात.
जर तुम्ही योग्य फिटिंगची ब्रा निवडली की, वरील सगळ्या प्रकारच्या ब्रा तुम्हाला अधिक चांगल्या दिसू शकतात आणि स्तनांना उत्तम उभारी देऊ शकता.