त्वचेची योग्य स्वच्छता राखण्यासाठी वारंवार हात आणि चेहरा अत्यंत गरजेचं असतं. मग तेव्हा तुम्ही घरात असा अथवा घराबाहेर तुम्हाला त्वचा स्वच्छ करायलाच हवं. मात्र बऱ्याचदा घराबाहेर असताना तुमची हात अथवा चेहरा धुण्याची गैरसोय होते अशावेळी फेस वाईप्स तुमच्या मदतीला धावून येतात. या वाईप्समध्ये ड्राय आणि वेट असे अनेक प्रकार असतात. ज्यामुळे तुम्ही अगदी कुठेही सहज तुमचा चेहरा अथवा हात पुसून घेऊ शकता. थोडक्यात तुमच्या पर्समध्ये वाईप्स असणं ही आज काळाची गरज झाली आहे. मात्र जर तुमची त्वचा तेलकट प्रकारची असेल तर तुम्हाला काही ठराविक प्रकारचेच वाईप्स वापरले पाहिजेत. यासाठी तेलकट त्वचा स्वच्छ करण्यासाठी कोणते वाईप्स बेस्ट आहेत हे अवश्य जाणून घ्या
हिमालया कंपनीच्या या फेस वाईप्समध्ये कोरफडीचे गुणधर्म आहेत. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर ती स्वच्छ करण्यासाठी हे वाईप्स तुमच्या नक्कीच मदतीचे ठरू शकतात. कारण यामुळे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाईल आणि त्वचेला कोरफडीमुळे योग्य पोषण मिळेल. यातील नैसर्गिक घटक तुमच्या त्वचेला मुळापासून स्वच्छ करतात. शिवाय हे वाईप्स वापरणं अतिशय सोपं आणि परवडणारं आहे. या वाईप्सच्या पॅकेजिंगमध्ये ते लवकर सुकू नयेत आणि खराब होऊ नयेत यासाठी योग्य ती काळजी घेतली जाते. शिवाय पुरूष अथवा महिला दोघांसाठी हे वाईप्स उपयुक्त आहेत. पंचविस वाईप्स व्यवस्थित गुंाळून ठेवलेलं हे पॅकेज तुम्ही तुमच्या बॅगेतून सहज कॅरी करू शकता.
फायदे -
तोटे -
जर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी अगदी परफेक्ट वाईप्सच्या शोधात असाल तर तुम्हाला मिस क्लेअरचे हे ऑईल कंट्रोल टिश्यू अथवा वाईप्स वापरण्यास काहीच हरकत नाही. कारण यामुळे तुमच्या त्वचेवरील तेलकटपणा त्वरीत निघून जाईल आणि त्वचेचे पोअर्स स्वच्छ आणि मोकळे होण्यास मदत होईल. त्वचेच्या पोअर्समध्ये तेल, धुळ, माती अडकल्यामुळे तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात अथवा इनफेक्शन होऊ शकतं. मात्र अशा प्रकारे त्वचा स्वच्छ केल्यामुळे आणि अतिरिक्त तेलाच्या निर्मितीवर नियंत्रण आल्यामुळे तुमची त्वचा पिंपल मुक्त होऊ शकते. तेलकट त्वचेसाठी वाईप्स वापरा.
फायदे -
तोटे -
गार्निअरचे हे स्किन अॅक्टिव्ह प्युरिफाईंग ऑईल फ्री वाईप्स तुमच्या त्वचेला खोलवर स्वच्छ करतात आणि त्वचेवरील धुळ, माती, तेल आणि मेकअप काढून त्वचा स्वच्छ करतात. या वाईप्समध्ये चारकोल म्हणजेच कोळशाचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तेलकटपणासोबतच तुमच्या त्वचेतील ब्लॅक हेड्सही कमी होण्यास मदत होते. या वाईप्समुळे तुमची त्वचा डिटॉक्स होते आणि पोअर्स मोकळे होतात. तुम्ही हळूवारपणे तुमचा आय मेकअप काढण्यासाठीदेखील हे वाईप्स वापरू शकता. शिवाय तेलकट त्वचेप्रमाणेच हे वाईप्स कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहेत. हे वापरण्यापूर्वी तुम्हाला मेकअप वाईप्स की क्लिंझर हे यासाठी तुम्हाला माहीत असायलाच हवं
फायदे -
तोटे -
क्लिन अॅंड क्लिअरच्या या फेशिअल वाईप्समुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते आणि त्वचेवरील धुळ, माती, मेकअप कमी होतो. त्वचा स्वच्छ झाल्यामुळे त्वचेवर तेल राहत नाही. डोळ्याजवळील भागावर वापरण्यासाठी हे वाईप्स सुरक्षित आहेत. तुम्ही चष्मा अथवा कॉन्टॅक्ट लेंस वापरल्यावरही ते वापरू शकता. पापण्यांवरील वॉटरप्रूफ मस्कारा काढण्यासाठी ते अतिशय उपयुक्त आहेत. शिवाय सर्व प्रकारच्या त्वचेसाठी हे वाईप्स वापरले जाऊ शकतात. यासाठी हे वाईप्स तुमच्या ट्रॅव्हल किटमध्ये का असायला हवेत
फायदे -
तोटे -
दररोज वापरण्यासाठी हे क्लिंझिंग क्लॉथ तुमच्या नक्कीच फायद्याचे आहेत. कारण त्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होते आणि तुम्हाला फ्रेश वाटते. या वाईप्समुळे तुमच्या त्वचेवरील धुळ आणि मेकअप काढून टाकला जातो. यात सोप फ्री फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमच्या त्वचेचं कोणतंही नुकसान होत नाही. यातील नैसर्गिक घटक तुमच्या त्वचेचं पोषण करतात. शिवाय हे सुंगध विरहित असल्यामुळे तुम्हाला याच्या वासाची अॅलर्जीदेखील होत नाही.
फायदे -
तोटे -
दी न्युट्रोजिना मेकअप रिमूव्हर क्लिंझिंग वाईप्स तुमच्या त्वचेवरील मेकअपचे कण मुळापासून काढून टाकतं. एक स्टेपमध्ये त्वचेवरील तेल कमी करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. त्वचेवर जमा होणारी धुळ, माती आणि तेलामुळे तुमचा चेहरा खराब होतो. मात्र या वाईप्समुळे तुम्ही कुठेही तुमचा चेहरा स्वच्छ करू शकता. ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटू लागतं. यात तुमचा वॉटरप्रूफ मस्कारा मुळापासून काढून टाकणारे घटक आहेत. तुम्ही कॉन्टॅक्ट लेंस वापरत असतानाही तुमचे डोळे या वाईप्सने स्वच्छ करू शकता. वाईप्स डिस्पोजेबल असल्यामुळे बाहेर जाताना ते नक्कीच वापरण्यास सोपे आहेत. यात त्वचेची काळजी घेण्यासाठी अल्कोहोल फ्री फॉर्म्युला वापरण्यात आला आहे.
फायदे -
तोटे -
कलरबारच्या या मेकअप रिमूव्हर वाईप्समध्ये एकूण तीस वाईप्स असतात. यात तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफड, कॅमोमाईल आणि ग्लिसरिन वापरण्यात येतं. मेकअप काढल्यावरही या वाईप्समुळे तुमची त्वचा हायड्रेट आणि मऊ राहण्यास मदत होते. प्रवासात नेण्यासाठी हे अतिशय सोयीचे आहेत. शिवाय क्रुअल्टी फ्री असल्यामुळे वेगन ग्राहकही हे वाईप्स नक्कीच वापरू शकतात.
फायदे -
तोटे-
बॉडी शॉपचे प्रॉडक्ट हे तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार आणि गरजेनुसार तयार करण्यात येतात. जर तुमची त्वचा तेलकट प्रकारची असेल तर बॉडीशॉपचे हे टी ट्री क्लिंझिग वाईप्स तुम्ही नक्कीच वापरायला हवे. कारण ते तुमच्या त्वचेवरील तेलकटपणा पटकन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. यात त्वचेची निगा राखणाऱ्या ऑर्गेनिक टी ट्री ऑईलचा वापर केला जातो. ट्री ट्री ऑईलचे फायदे जाणून घ्या आणि वापरा हे वाईप्स. ज्यामुळे तुम्ही तुमचा मेकअप अगदी काही मिनीटात काढू शकता. या वाईप्सचा वापर केल्यावर तुम्हाला चेहरा धुण्याची गरज लागत नाही. त्वचा स्वच्छ आणि टवटवीत होते. ज्यामुळे बाहेर जाताना तुम्ही हे वाईप्स नक्कीच कॅरी करू शकता.
फायदे -
तोटे -
काया ही त्वचेची निगा राखणाऱ्या ब्युटी प्रॉडक्टसाठी विश्वासार्ह कंपनी आहे. काया कंपनीचे हे रिफ्रेशिंग वाईप्स तुम्ही प्रवासात कधीही वापरू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होते आणि त्वचेचं पिंपल्सपासून संरक्षण होतं.
फायदे -
तोटे -
लॉरिअल पॅरिस आयडिअल स्किन मेकअप रिमूव्हिंग वाईप्स तुम्ही मेकअप काढण्यासाठी आणि त्वचेची स्वच्छता राखण्यासाठी वापरू शकता. या वाईप्सने तुम्ही तुमचा वॉटरप्रूफ मस्कारादेखील काढू शकता. यामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन, धुळ, माती, मेकअप कमी निघून त्वचा स्वच्छ आणि फ्रेश होते. त्वचा स्वच्छ केल्यावर त्वचेला कोरडे पडू देत नाही. त्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होते.
फायदे -
तोटे -
मायग्लॅमची या वाईपआऊट रेंजमधील वाईप्स तुमच्या त्वचेसाठी नक्कीच फायदेशीर आहे. कारण यामध्ये तुमच्या त्वचेला सॅनिटाईझ आणि मॉईस्चराईझ करणारे गुणधर्म आढळतात. यातील कडूलिंबाच्या तेल त्रासदायक किटाणू आणि इन्फेक्शन होऊ देणाऱ्या किटाणूंशी लढा देण्यासाठी उत्तम असून यामध्ये नैसर्गिक अँटिबॅक्टेरियल, अँटिफंगल आणि अँटिपॅरासिटीक गुण आढळतात. तर लिंबाच्या तेल हे अॅंटिसेप्टिक असून त्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ, निरोगी आणि सुरक्षित होते.
फायदे -
तोटे -
फोटोसौजन्य - शटरस्टॉक