काळे चणे आहेत त्वचेसाठी उपयुक्त, असा तयार करा फेसपॅक

काळे चणे आहेत त्वचेसाठी उपयुक्त, असा तयार करा फेसपॅक

त्वचेची निगा राखण्यासाठी अनेकजणी स्किन केअर रूटिन पाळण्याचा प्रयत्न करतात. क्लिझिंग, टोनिंग, मॉईस्चराईझिंग आणि सनस्क्रिन त्वचेची निगा राखण्यासाठी नक्कीच उपयुक्त आहेत. पण जर तुम्हाला चमकदार आणि नितळ त्वचा हवी असेल तर त्यासाठी आहारात पोषक घटक असणं खूप गरजेचं आहे. आहारासाठी पोषक असलेले घटक तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. एवढंच नाही तर या पदार्थांचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेसाठी सौंदर्य उत्पादनेही तयार करू शकता. बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रॉडक्टमध्ये बऱ्याचदा केमिकल्सचा वापर केलेला असतो. मात्र नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले फेस पॅक, फेस स्क्रब हे केमिकल विरहीत असल्यामुळे त्वचेवर त्यामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही.  

काळे चणे जितके आहारासाठी उपयुक्त आहेत तितकेच ते तुमच्या त्वचेसाठीदेखील फायद्याचे आहेत. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते आणि नव्या त्वचापेशी निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळते. काळ्या चण्यापासून तयार केलेला फेसपॅक वापरल्याने तुमच्या चेहऱ्यावरील डाग निघून जातात आणि चेहरा चमकदार दिसू लागतो.

Instagram

काळ्या चण्यांपासून तयार करा हा फेसपॅक -

फॅसपॅकसाठी लागणारे साहित्य -

  • एक कप काळे चणे
  • दोन चमचे लिंबाचा रस
  • दोन चमचे मध

फेसपॅक तयार करण्याची कृती -

  • काळे चणे मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर तयार करा
  • ही पावडर चाळून घ्या ज्यामुळे तुम्हाला त्यातून मऊ पावडर मिळेल
  • या पावडरमध्ये लिंबाचा रस  आणि मध मिसळा
  • या मिश्रणाला मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा
  • फेसपॅक ब्रशच्या मदतीने हा फेसपॅक संपूर्ण चेहरा आणि मानेवर पसरवा.
  • वीस मिनिटांनी फेसपॅक सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका
  • चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून एक ते दोन वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा
Instagram

काळ्या चण्यांचा फेसपॅक लावण्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो -

वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स अशा एजिंगच्या मार्क्स दिसू लागतात. मात्र काळ्या चण्यांमुळे त्वचेतील कोलेजीनच्या निर्मितीला चालना मिळते आणि या एजिंगच्या मार्क्स कमी होतात. काळ्या चण्यांमध्ये जखमा बऱ्या करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील पिंपल्सचे डाग  अथवा इतर जखमा भरून निघतात. चणे हे भारतीय खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचे खाद्य असल्यामुळे ते प्रत्येकाच्या घरात असतातच. त्यामुळे त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी हा घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. 

बऱ्याचदा बाजारातील केमिकलयुक्त ब्युटी प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरात असलेल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केलेले फेसपॅक त्वचेसाठी जास्त फायदेशीर ठरतात. आम्ही सांगितलेला हा DIY फेसपॅक तुम्हाला कसा वाटला आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर सांगा. 

Shutterstock

फेसपॅक लावल्यावर चमकदार झालेल्या त्वचेसह ग्लॅम दिसण्यासाठी ट्राय करा मायग्लॅमची लिट लिक्विड मॅट लिपस्टिक... ही लिपस्टिक फ्री मिळवण्यासाठी मायग्लॅमचा ग्रेट ग्लॅम सर्व्हे पूर्ण करा आणि लिपस्टिकसह मिळवा आकर्षक बक्षीसं.

Beauty

LIT Liquid Matte Lipstick - DM Slide

INR 395 AT MyGlamm