ADVERTISEMENT
home / Natural Care
कांस्य मसाजरने मिळवा सुंदर आणि नितळ त्वचा

कांस्य मसाजरने मिळवा सुंदर आणि नितळ त्वचा

चेहरा टवटवीत राहावा यासाठी चेहऱ्याची काळजी घेण्याचे वेगवेगळे प्रकार आणि पद्धती अनेकांना माहीत आहेत. घरगुती उपायांपासून ते डॉक्टरांच्या ट्रिटमेंट्सपर्यंत अनेक गोष्टी केल्या जातात. पण घरच्या घरी त्वचेची काळजी घेणे हे अनेकांना आवडते. त्यासाठीच साध्या सोप्या अशा ट्रिटमेंट्स करण्यावर अनेकांचा भर असतो. आता फेस मसाजच घ्या. फेस मसाज हा त्वचेसाठी फारच फायदेशीर असते. चेहऱ्यावर योग्य पद्धतीने मसाज केला तर त्वचा अधिक सुंदर आणि नितळ होतो. रक्तप्रवाह सुरळीत करुन त्वचेच्या समस्या कमी करण्याचे काम फेस मसाज करते. फेस मसाजचे महत्व लक्षात घेत हल्ली वेगवेगळे फेसमसाजर मिळतात. कांस्य फेसमसाजर हा फेसमसाजर सध्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. कांस्यच्या मदतीमुळे त्वचेला अधिक फायदे मिळतात. कांस्य हे त्वचेसाठी फार पूर्वीपासून वापरले जात आहे. पण आता पुन्हा एकदा जुन्या पद्धतीने वापरुन त्वचेचे सौंदर्य टिकवले जात आहे. जाणून घेऊया कांस्य (Bronze)मसाजरचे फायदे

त्वचा टोन्ड करण्याचे काम करतात हे फेस मसाजर, नक्की वापरुन पाहा

कांस्य मसाज

Amazon

ADVERTISEMENT

ताण करते कमी

मसाज हा ताण कमी करण्यासाठी केला जातो. कांस्य वाँड, थाळी, वाटी असे काही तुमच्याकडे असेल तर तुम्ही इतर फेस मसाज प्रमाणे चेहऱ्याचा मसाज करु शकता. योग्य पद्धतीने जर तुम्ही  कांस्य मसाज केला तर तुमच्या शरीरावर असलेला ताण कमी होण्यास मदत मिळते. त्वचेवरील ताण कमी झाल्यावर त्वचेवरील सुरकुत्या कमी होता. त्वचा अधिक चांगली दिसू लागते. जर तुमच्याकडे कांस्य वाँड असेल तर ठिक कारण ते फिरवताना चेहऱ्यावर अडथळा येत नाही. पण वाटी किंवा थाळी असेल तर ती चेहऱ्यावर फिरवताना थोडी काळजी घ्यावी. म्हणजे तुम्हाला योग्य पद्धतीने मसाज करता येईल. साधारण 5 मिनिटं मसाज केल्यानंतर तुमच्या त्वचेवरील ताण कमी झाल्याचे तुम्हाला नक्की जाणवेल

त्वचेचा पोत सुधारण्यास करते मदत

त्वचेच्या तक्रारी अर्थात पिंपल्स, कोरडी त्वचा, डल त्वचा अशा त्वचेच्या सगळ्याच समस्या त्यामुळे कमी होण्यास मदत मिळते. कांस्यमधील घटक त्वचेला आतून चांगले करण्याचे काम करते. एखादे फेस ऑईल घेऊन चेहऱ्यावर लावा आणि त्यावर कांस्यने मसाज करा. मसाज केल्यामुळे रक्त पुरवठा सुधारतो. त्वचेच्या समस्या कमी होतात. आणि त्वचा अधिक चांगली होण्यास मदत मिळते. त्वचेचा पोत सुधारतो. त्वचेला छान ग्लो येतो.  तुमच्या त्वचेचा पोत चांगला करायचा असेल तर तुम्ही याचा वापर करु शकता. 

कानांचा मसाज करुन काहीच मिनिटात घालवा तुमचा stress

चांगली झोप

सुंदर त्वचेसाठी पुरेपूर झोप गरजेची असते. जर तुमची झोप पूर्ण झाली तर तुमच्या त्वचेवरीलताण कमी होतो. त्वचा कायम फ्रेश दिसते. कांस्य मसाज केल्यामुळे त्वचेवरील ताण कमी होते. त्वचा रिलॅक्स होते. त्वचेवरील स्नायू रिलॅक्स झाल्यामुळे चांगली झोप येते. जर हा मसाज कोणी दुसरी व्यक्ती करत असेल तर तुम्ही त्यावेळी झोपू शकता. जर तुम्हाला झोपेची समस्या असेल तर तुम्ही कांस्य मसाज करायला हवा. त्यामुळे तुमची ही समस्या कमी होईल.

ADVERTISEMENT

त्वचा करते टोन्ड

वयोमानानुसार त्वचेमध्ये अनेक बदल होत असतात. त्यापैकी एक बदल म्हणजे त्वचेवर सुरकुत्या पडणे किंवा त्वचा डल दिसू लागणे. हा त्रास तुम्हाला होऊ नये असे वाटत असेल आणि त्वचा थोड्या आणखी काळासाठी टोन्ड राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चेहऱ्यावर कांस्य मसाज जरुर करा. त्यामुळे तुमची जास्त काळासाठी टोन्ड राहील ती अजिबात सैल पडणार नाही. 

सुरकुत्या घालविण्यासाठी असा करा चेहऱ्याला मसाज

रंग उजळवण्यास करते मदत

रंग उजळवणे हा तुमचा हेतू असेल तर तुम्ही कांस्य मसाजचा उपयोग करा. कांस्यच्या मदतीने त्वचेवर आलेला डलपणा कमी होण्यास मदत मिळतो.त्वचेचा डलपणा कमी झाला की, त्वचेवरील मृत त्वचा निघून जाते त्यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते. रंग उजळवणे म्हणजे गोरा रंग मिळणे असे नाही तर रंग उजळवणे म्हणजे ती अधिक ग्लो करणारी आणि स्वच्छ दिसणे. कांस्य मसाजरने हा फायदा नक्कीच मिळतो. 


इथे करा कांस्य मसाजरची खरेदी 

ADVERTISEMENT
23 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT