2021 मध्ये परदेशात जायचे असेल तर हे देश बसतील बजेटमध्ये

2021 मध्ये परदेशात जायचे असेल तर हे देश बसतील बजेटमध्ये

2020मध्ये ज्यांनी प्रवासाची खूप मोठी स्वप्न पाहिली होती. पण कोरोनाने सगळ्या ट्रॅव्हल प्लॅनचा बट्ट्याबोळ केला. पण 2020 आता संपले आहे आणि नवीन वर्ष सुरु होत आहे. या नव्या वर्षात तरी प्रवास करायचा विचार केला असेल आणि परदेशात जाण्याचा तुम्ही विचार करत असाल तर आम्ही काही असे देश निवडले आहेत.ज्या देशांना तुम्ही भेट देऊ शकता. 2020ने अनेकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे बजेट टूर पाहणे फार गरजेचे आहे. चला जाणून घेऊया कोणत्या देशांना तुम्ही तुमच्या बजेटनुसार प्लॅनिंग करु शकता.

प्रवास करताना अशी घ्या त्वचेची काळजी

इंडोनेशिया ( Indonesia)

Instagram

निसर्ग सौदर्यांने समृद्ध अशा साऊथ इस्ट एशियामधील देश म्हणजे इंडोनेशिया… आता  बाली हा याच देशाचा भाग आहे. त्यामुळे तुम्हाला अंदाज आलाच असेल की, या देशाला का भेट द्यायला हवी ते. बालीमध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासोबतच तुम्हाला अनेक वॉटरस्पोर्टसचाही आनंद घेता येतो. कपल असो वा फॅमिली कोणासाठीही या देशाला भेट देणे हे एखाद्या स्वर्गाला भेट देण्याप्रमाणे आहे.बालीमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी करता येतात. त्याही तुमच्या बजेटमध्ये. हा देश तुम्हाला अगदी व्यवस्थित फिरायचा असेल तर साधारण आठवडा तरी लागतोच. त्यामुळे तेवढा वेळ काढून ही टूर करा. कारण इंडोनेशियामधील बाली, उबुड, कुटा, देनसार, जकार्ता, लोंबोक,कोमार्डो आणि अनेक आईसलँड फिरण्यासारखे आहेत.

साधारण बजेट : 50 ते 60 हजार प्रत्येकी

नेपाळ (Nepal)

Instagram

भारताला अगदी चिकटून असलेला देश म्हणजे नेपाळ. कमालीचे निसर्ग सौंदर्य आणि सगळं काही बजेटमध्ये बसेल असा हा देश आहे. सिक्कीम- गँगटोकला गेल्यानंतर नेपाळच्या काही भागात स्वस्त आणि मस्त म्हणून शॉपिंगसाठी नेले जाते. नेपाळ हे देखील हिमालयाप्रमाणे पहाडावर असल्यामुळे ट्रेकिंग करायला उत्सुक असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम असे ठिकाण आहे. नेपाळची राजधानी काठमांडू ही तर फिरण्यासारखी आहेत. अगदी लहान-सहान बाजार आणि निसर्गाचा आनंद घेता येईल. नेपाळला जाणार असाल तर तुम्ही साधारण 7 दिवसांची तरी टूर करा. तर तुम्हाला खऱ्या अर्थाने नेपाळचा आनंद घेता येईल.

साधारण बजेट:  50 हजार प्रत्येकी

विमानातून प्रवास करताना तुमच्या सामानात नसाव्यात 'या' गोष्टी

भूटान (Bhutan)

Instagram

भूटान या  देशाला जगातला सगळ्यात आनंदी देश म्हणतात.  भारतीय प्रवाशांना जाण्यासाठी हा स्वस्त आणि मस्त असा देश आहे.  नैसर्गिक सौंदर्य असलेल्या या देशाला भेट देण्यासाठी भारतीयांना पासपोर्टची गरज नाही. त्यामुळे तुमचा व्हिसाचा खर्च नक्कीच वाचतो. हिमालयन ट्रेक, अँडव्हेचर्स गेम्स अशा अनेक गोष्टी येथे करण्यासारख्या आहेत. या ठिकाणी राहण्याचा खर्च हा फारच बजेटमध्ये बसणारा आहे. तुम्ही आश्रमसारख्या ठिकाणी किंवा चांगल्या हॉटेलमध्ये राहिल्यास याचा खर्च साधारण 2,000 एक रात्र असा येतो. आता तुम्ही किती फिरणार आणि काय पाहणार याचे नियोजन केल्यानंतर तुमची टूर आखा.


साधारण बजेट : 30 ते 50 हजार आणि त्याहून पुढे

श्रीलंका ( Sri Lanka)

Instagram

भारताला लागून असलेला आणखी एक देश म्हणजे श्रीलंका. श्रीलंका हे साधारणपणे भारतासारखेच आहे असे म्हटले जाते. पण कमी लोकसंख्या आणि निसर्गसौंदर्य यामुळे या देशाला भेट देणे हे एका पर्वणीपेक्षा कमी नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. शिवाय या देशाला भेट देणे अनेकांच्या बजेटमध्ये बसणारे असते. येथील जेवण आणि संस्कृती पाहण्यासारखी आहे. त्यामुळे तुम्ही या देशाला भेट देण्यासाठी जायलाच हवे. श्रीलंका जरी जवळ असला तरी या देशाला भेट देण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा लागतो.

साधारण बजेट : 40 हजारांच्या पुढे

थायलंड (Thailand)

Instagram

जेव्हा टूर किंवा हनीमून प्लॅनचा विचार केला जातो. त्यावेळी थायलंड या देशाचे नाव अगदी आवर्जून घेतले जाते. टुरिस्टचे आवडते ठिकाण म्हणून हा देश ओळखला जातो. वर्षभर थायलंडच्या पिकनिक या सुरु असतात. पण जर तुम्ही बजेटचा विचार करत असाल तर तुम्ही जानेवारी पासून ते ऑगस्ट या कालावधीत या देशाला भेट देणे टाळावे. कारण या दिवसात रेट थोडे जास्त असतात. पण तुम्ही सप्टेंबर ते इयर एंडच्या काळात जाऊ शकता.  थायलंड हे बजेटमध्येही करता येईल आणि रॉयलही. थायलंडमध्ये बँकाक, फुकेत, फी फी आयलँड, पट्टाया,पा टाँग ही काही ठिकाणं फिरण्यासारखी आहेत.

साधारण बजेट : साधारण 1 लाखांच्या आसपास 


हे काही देश आहेत ज्यांना तुम्ही 2021मध्ये अगदी बिनधास्त भेट देऊ शकता. पण कोव्हिडची काळजी घेऊनच

तुमचा प्रवास झक्कास करतील हे खास कोट्स (Best Travel Quotes In Marathi)