कर्क राशींच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व असते हसमुख, जाणून घ्या वैशिष्ट्ये

कर्क राशींच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व असते हसमुख, जाणून घ्या वैशिष्ट्ये

कर्क राशीच्या व्यक्तींचा जन्म महिना हा 22 जून ते 22 जुलै असा म्हटला जातो.  या राशीचा स्वामी ग्रह आहे चंद्र. या व्यक्ती आपल्या उत्तम विचार आणि कमालीच्या कल्पनांमुळे ओळखल्या जातात.  तसंच कर्क राशीच्या व्यक्तींची समज आणि हसमुख स्वभाव सर्वांना आपलंसं करून घेतो. पण या व्यक्तींचा मूड ओळखणं हे एक वेगळंच समीकरण  आहे. तुमच्या जवळच्या व्यक्ती असतील कर्क राशीच्या तर पाहा त्यांच्याशी ही वैशिष्ट्य जुळत आहेत का. आम्ही तुमच्यासाठी कर्क राशीच्या व्यक्तींची खास वैशिष्ट्य या लेखाद्वारे आणली आहेत. तुमच्याही जवळच्या व्यक्ती असतील कर्क राशीच्या तर पाहा ही वैशिष्ट्य जुळत आहेत की नाही ते. 

नोव्हेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती असतात प्रभावशाली, जाणून घ्या

कर्क राशीच्या व्यक्तींचा स्वभाव Cancer sign people Positive and Negative Characteristics in Marathi

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म हा वेगवेगळ्या दिवशी आणि वेळेला होत असतो. अगदी सेकंदाच्या फरकानेही नशीब बदलत असते. तसंच प्रत्येकाची रास वेगळी असते. आपण आज पाहूया कर्क राशीच्या व्यक्तींच्या माणसांची वैशिष्ट्ये - 

 • या राशीच्या व्यक्ती आपले घर, संस्था आणि समाजाची शान असतात. यांच्यामध्ये अनेक गुण सामावलेले असतात. पण यांच्या आळसामुळे बरेचदा या व्यक्ती पुढे जाऊ शकत नाहीत
 • या राशीचा स्वामी आहे चंद्र. त्यामुळे या व्यक्तींचे विचार आणि कल्पनाशक्ती ही अफाट असते. त्यामुळे या व्यक्ती विज्ञान, शोध, फोटोग्राफी, पत्रकारिता, फूड बिझनेस इत्यादी करिअरमध्ये पुढे असतात
 • कर्क राशीच्या व्यक्ती या चंद्राने प्रभावित असल्याने त्यांना नेहमी मानसिक अशांती लाभते. त्यामुळेच कोणत्याही गोष्टीमध्ये या व्यक्ती समाधानी नसतात.  सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखी राहतात आणि असंतुष्ट राहतात
  या राशीचे जोडीदार हे कल्पनाशील असतात. वास्तविक जीवनातही आपल्या आयुष्यात राजकुमार अथवा राजकुमारी येईल अशीच यांना अपेक्षा असते. मात्र प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती नशीबवान असतात. आपल्या जोडीदाराला आणि त्यांच्या कुटुंबासाठी या व्यक्ती कोणत्याही थराला जाऊन  काहीही करू शकतात
 • या राशीच्या व्यक्तींना कायम  आपल्या जोडीदाराचे लक्ष हवे असते.  नाहीतर या व्यक्ती सतत त्याच्यावर रागावू शकतात. या व्यक्ती अत्यंत भावूक आणि संवेदनशील असतात आणि त्याशिवाय मनाने अत्यंत दयाळूही असतात. या व्यक्तींचे पाय नेहमी जमिनीवर असतात. कोणत्याही गोष्टींचा यांना गर्व नसतो
 • परफेक्ट मॅचबद्दल सांगायचे झाले तर कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मीन राशींच्या व्यक्ती योग्य आहेत.  ही जोडी योग्य म्हटली जाते.  कारण या दोन्ही भावनात्मक राशी असून एकमेकांबद्दल दुःख आणि भावना या व्यक्ती पटकन समजून घेऊ शकतात. तसंच ही जोडी उत्तम ठरते. दोन्ही राशीच्या व्यक्ती रोमँटिक असल्याने यांचा संसार उत्तम होतो. तसंच इतर राशीच्या व्यक्तींपेक्षा या दोन्ही राशी एकमेकांसाठी परफेक्ट ठरतात

मिथुन राशींच्या व्यक्तींची आहेत अशी वैशिष्ट्य, कमालीचा असतो सेन्स ऑफ ह्यूमर

 • कर्क राशीच्या व्यक्ती या अत्यंत मूडी आणि रहस्यमयी असतात. तसंच या व्यक्ती क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये पुढे  जातात.  शाळा अथवा महाविद्यालयात यांचे जास्त लक्ष नसले तरीही यांची बौद्धिक क्षमता मात्र दांडगी असते. मोठी कामे पटकन सोडविण्यसाठी या व्यक्ती नेहमीच पुढे असतात
 • या राशीच्या व्यक्ती वेळेच्या आधीच मोठ्या होतात अर्थात यांच्या मॅच्युरिटी लेव्हल जास्त असते. दुसऱ्याच्या भावना या व्यक्ती पटकन समजून घेऊ शकतात. आनंद असो वा दुःख दोन्ही उत्तमरित्या या व्यक्ती व्यक्त करू शकतात. तसंच या व्यक्ती नारळाप्रमाणे असतात. बाहेरून कडक मात्र मनाने अत्यंत मऊ आणि मृदू. मात्र कोणत्या गोष्टीचं यांना कधी वाईट वाटेल हे सांगता येत नाही. वाईटपणा या व्यक्तींना सहन होत नाही. यांच्या कमतरतेचा फायदा अनेक लोक उचलतात हेदेखील खरे आहे
 • या राशीच्या व्यक्ती आपल्या कुटुंब आणि मित्रांवर मनापासून पैसे खर्च करतात. त्यांच्यासाठी पैसे  हे केवळ समाधानाचं साधन आहे. परमेश्वराच्या  कृपेने या व्यक्तींना सहसा पैशाची चणचण भासत नाही. या राशीच्या व्यक्ती स्वतःच्या हाताने स्वतःचे नशीब निर्माण करण्यावर भर देतात. तसंच आपल्या कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पाण्याप्रमाणे पैसे खर्च करतात. या व्यक्तींना श्रीमंती जगणं जास्त आवडतं. त्यामुळे जास्तीत जास्त  कमाई  करण्याची यांची इच्छा असते
  कर्क राशीच्या व्यक्ती या अत्यंत प्रेमळ असून त्यांना दुसऱ्यांबद्दल अधिक प्रेम असते. पण याचा  त्यांना तोटाही खूप होतो. यामुळे अनेकदा त्यांना त्रास होऊन ते मागे राहतात  आणि जीवनात निराशा त्यांच्या पदरी येते
 • प्रत्येक गोष्टीमध्ये या व्यक्ती उत्साही असतात. जिथे गरज नाही तिथेही त्यांचा हा उत्साह ओसंडून वाहत असतो.  स्वतःबद्दल चांगलं ऐकायला या व्यक्तींना खूप आवडतं. विशेषतः  आपल्या जवळच्या  माणसांकडून
  कोणत्याही गोष्टीतील नकार पचवणं या व्यक्तींना थोडं कठीण जातं. आपल्या आजूबाजूला सतत कोणीतरी राहावं आणि आपल्यावर प्रेम करावं असंच या व्यक्तींना वाटतं. 

डिसेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती असतात तरी कशा, घ्या जाणून

भाग्यशाली क्रमांक  – 2, 7, 4, 9

भाग्यशाली रंग – पिवळा, निळा आणि केशरी

भाग्यशाली दिवस – शनिवार, शुक्रवार आणि सोमवार

भाग्यशाली खडा – हिरा

कर्क राशीच्या प्रसिद्ध व्यक्ती - प्रियंका चोप्रा, सोनू निगम, रणवीर सिंह, कतरिना कैफ, करिश्मा कपूर, अर्जुन कपूर, सूरज पंचोली

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक