थंंडीत येणाऱ्या पिंपल्सवर कधीही करु नका हे प्रयोग

थंंडीत येणाऱ्या पिंपल्सवर कधीही करु नका हे प्रयोग

थंडी अनेकांसाठी लाभदायक असते. विशेषत: तेलकट त्वचेसाठी कारण या दिवसात हवेत असलेल्या गारव्यामुळे त्वचेला हवे असलेले मॉईश्चर या प्रकारातील त्वचा असलेल्यांना मिळते. त्यामुळे या काळात तेलकट त्वचा असणाऱ्यांची त्वचा अधिक तुकतुकीत दिसू लागते. पण त्वचा तुकतुकीत आणि चांगली दिसत असली तरी कोंडा होण्याचा त्रास या काळात सगळ्यात जास्त असतो. कारण स्काल्प सुकल्यामुळे कोणतीही त्वचा असलेल्या व्यक्तीला कोंडा होऊ शकतो. पर्यायाने पिंपल्स होऊ शकतात. थंडीच्या या काळात येणारे पिंपल्स हे फारच त्रासदायक असतात. हे आले की जायचे अजिबात नाव घेत नाही. आलेले पिंपल्स गेल्यावाचून आपल्याला चैन पडत नाही. म्हणून आपण त्वचेवर वेगवेगळे प्रयोग करतो. थंडीत येणाऱ्या या पिंपल्सवर कोणते प्रयोग चुकूनही करायला नकोत ते जाणून घेऊया. 

कांस्य मसाजरने मिळवा सुंदर आणि नितळ त्वचा

चेहऱ्यावर वाफ घेणे

Instagam

अनेकदा चेहऱ्यावर वाफ घेतल्यानंतर पिंपल्स लगेच सुकतात. काहींना हा अनुभव आल्यामुळे हिवाळ्यात आलेल्या पिंपल्सला घालवण्यासाठी ग्रीन टी, पुदीना याची वाफ घेतली जाते. वाफेमुळे त्वचेवरील पोअर्स ओपन होतात. त्यामुळे पोअर्सच्या आतपर्यंत त्वचेची स्वच्छता करता येते. इतर वातावरणाच्या तुलनेत थंडीत ही वाफ घेणे हानिकारक ठरु शकते. कारण त्वचेतील तैलीय घटक कमी होऊन त्वचा अधिक कोरडी पडते. त्याचा पिंपल्सवर काहीही फरक पडत नाही.उलट ते अधिक दिसू लागतात. त्यामुळे चेहऱ्यावर वाफ घेणे या काळात पूर्णपणे टाळा. 

स्किन पिलिंग होणाऱ्या क्रिम लावणे

Instagram

पिंपल्सवर काही क्रिम कमालीच्या काम करतात. पिंपल्सचे कोणतेही डाग न ठेवता त्यांचा समूळ नायनाट करतात. पण अशा क्रिमचा या काळातील सतत वापर त्वचा कोरडी करु शकतो. या क्रिमच्या सतत वापर केल्यामुळे त्वचेवर खवल आल्याप्रमाणे त्वचा दिसते. जर या  क्रिम लावण्याचे प्रमाण चुकले असेल तर चेहऱ्यावरील त्वचा जळून जाते. तो भाग अधिक काळा दिसू लागतो. कधी कधी तर त्वचा इतकी सुरकुतते की तोंड उघडताना, हसताना, बोलताना त्रास होऊ लागतो. त्यामुळे पिंपल्सवर लावत असलेल्या क्रिम लावताना डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्या क्रिमसोबत मॉश्चरायझर लावायला विसरु नका. 

मऊ आणि मुलायम केस मिळविण्यासाठी अशी भिजवावी मेंदी

पिंपल्स फोडणे

Instagram

जर तुम्हाला पिंपल्स फोडायची सवय असेल तर थंडीचा महिना यासाठी मुळीच चांगला नाही. थंडीत जरासे जरी लागले तरी कळवळायला होते. अगदी तसेच तुम्ही पिंपल्स फोडतानाही होतो. थंडीत त्वचेला जराही धक्का बसला की, त्या भागावर डाग पडू लागतात. हे डाग जाता जात नाही. थंडीमध्ये जखमा भरण्याची क्षमता कमी झालेली असते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे संपूर्ण शरीराला त्रासदायक ठरेल अशा गोष्टी मुळीच करु नका.

 

चेहरा सत धुत राहणे

Instagram

अनेकदा पिंपल्स येण्यामागे अस्वच्छता हे देखील एक कारण असते. कानांना सतत फोन लावल्यामुळे.फोनची स्क्रिन स्वच्छ नसल्यामुळे पिंपल्स येणे अगदी स्वाभाविक आहे. जर चेहरा सतत स्वच्छ केल्यामुळे पिंपल्सचा त्रास कमी होतो असे जर तुम्हाला वाटत असेल तर असे मुळीच नाही. कारण सतत चेहरा धुणे हे जरी कितीही चांगले असले तरी फेसवॉशच्या सतत वापरामुळे चेहरा हा अधिक कोरडा पडतो. त्वचेखाली असणारे काही तैलीय घटक हे पिंपल्सना कमी करण्याचे काम करत असतात. पण जर तुम्ही त्वचा कोरडी करत हे घटक कमी केले तर तुम्हाला त्याचे विपरित परिणाम जाणवतील.

कोरड्या त्वचेची समस्या भेडसावतेय मग हे नक्की वाचा, तज्ज्ञांचा सल्ला

चेहऱ्यावर ट्रिटमेंट घेणे

Instagram

चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर चेहरा कोणालाही दाखवासा वाटत नाही.विशेषत: ज्यांना कधीही पिंपल्स येत नाही अशांना तर चेहऱ्याला जरा काय झाले की, त्रास होतो. पण थंडीच्या दिवसात स्किन ट्रिटमेंट घेणे हे अधिक धोक्याचे ठरु शकते. स्किन तज्ज्ञ वगळता तुम्ही फेशिअल,क्लिनअप असे काहीही करण्याचा विचार करत असाल तर असे मुळीच करु नका. कारण त्यामुळे चेहरा अधिक कोरडा पडण्याची शक्यता असते.

आता थंडीच्या या काळात तुम्हाला पिंपल्स आले असतील तर मुळीच या काही गोष्टी करु नका. 

Beauty

Glow Skincare Everyday Essentials Kit

INR 3,585 AT MyGlamm