ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
प्रेशर कुकर वापरण्याच्या सोप्या पद्धती, नाही होणार लवकर खराब

प्रेशर कुकर वापरण्याच्या सोप्या पद्धती, नाही होणार लवकर खराब

प्रेशर कुकर हा प्रत्येकाच्या घरातील अविभाज्य भाग आहे. पण प्रेशर कुकर वापरायला घेतल्यानंतर काही दिवसातच   खराब होतो.  कारण प्रेशर कुकरचा वापर भात लावण्यापासून अगदी भाजी शिजवण्यापर्यंत करण्यात येतो. तसंच प्रेशर कुकरमध्ये शिजलेल्या अन्नातही पोषक तत्व शिल्लक राहतात. खरं तर जेवण शिजवण्यासाठी अन्य गोष्टींच्या तुलनेत वाफेवर आणि प्रेशर कुकरमध्ये जेवण शिजवणे सोयीस्कर ठरते. हे अन्न आपल्या शरीरासाठी उत्तम ठरते. तुमची एनर्जीही वाचते आणि जेवण बनविण्यासाठी लागणारा वेळही वाचतो. पण प्रेशर कुकर जर नीट वापरला नाही तर तो लवकर खराब होतो. त्यामुळे प्रेशर कुकर वापरण्याच्या काही सोप्या टिप्स या लेखातून आम्ही तुम्हाला सांगत आहोत.  प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवणं जितकं सोपं आहे तितकंच ते कठीणही आहे. त्यामुळे रोज प्रेशर कुकरचा वापर करताना काय करायचे याच्या काही टिप्स.  

वापरण्यापूर्वी प्रेशर कुकर तपासून घ्या

Freepik.com

प्रेशर कुकरचा वापर करताना कुकरमध्ये कोणतीही फट नाही अथवा कुकरच्या शिटीमध्ये कोणताही बिघाड नाही ना हे आधी तपासून बघा. प्रेशर कुकरमध्ये जेवण बनविण्यासाठी वाफ प्रेशरचा उपयोग होतो. मात्र लिकेज  अथवा क्रॅकमुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ शकते. कारण प्रेशर कुकर खूप जास्त वाफ उत्पन्न  करतो आणि त्यामुळे तुम्हाला याचा वापर खूपच काळजीपूर्वक करावा लागतो.

ADVERTISEMENT

स्वयंपाकघरातील चिकट टाईल्स चमकविण्यासाठी सोप्या टिप्स
 

प्रेशर कुकरची गरज समजून घ्या

प्रेशर कुकर नीट स्वच्छ झाला आहे आणि व्यवस्थित रिकामा आहे की नाही याची व्यवस्थित पडताळणी करून घ्या. प्रेशर कुकरची किती क्षमता आहे त्याप्रमाणेच त्यामध्ये पाण्याचा  वापर करा. याशिवाय पाणी नक्की किती हवं हे नीट पाहा. कारण प्रत्येक पदार्थानुसार पाण्याचे प्रमाणे हे कमी जास्त होत असते. तसंच कमीत कमी पाणी अथवा जास्तीत जास्त पाणी असं प्रमाण ठेऊ नका. मध्यम स्वरूपात पाणी कुकरमध्ये ठेवा जेणेकरून कुकर जळणार नाही अथवा कुकरमधून जास्त प्रमाणात वाफ जाणार नाही.  पाण्याशिवाय कधीही कुकरचा वापर करू नका. अन्यथा कुकर फुटण्याचा धोका असतो. 

स्वयंपाकघरातील धुराने असाल त्रस्त, तर करा हा सोपा उपाय

कुकरची शिटी व्यवस्थित लावा

ADVERTISEMENT

Freepik.com

कुकरची शिटी व्यवस्थित लावणं ही सर्वात मोठी प्रक्रिया आहे. तसंच प्रेशर कुकरमध्ये भांडी ठेवल्यानंतर कुकरचे सील नीट बंद करून कुकर व्यवस्थित आचेवर लावणंही तितकंच गरजेचे आहे. शिटीला सतत हात लाऊ नका. प्रेशर कुकर नीट असेल तर शिटी व्यवस्थितच वाजणार त्यामुळे तुम्ही शिटी कुकरमध्ये नीट फिट झाली आहे की नाही ते पाहा. शिटी व्यवस्थित झाली नाही तर आतील पदार्थ शिजला जाणार नाही. भात, भाजी, मांस आणि मासे हे सर्व पदार्थ शिजवण्याची वेगवेगळी पद्धत असते. त्यामुळे रितीनुसार आणि पद्धतीनुसार तुम्ही कुकरमध्ये जेवण शिजवा. किती प्रमाणात पाणी घालायचं आणि किती शिट्या द्यायच्या याची व्यवस्थित माहिती करून घ्या.  अन्यथा पदार्थ बिघडू शकतो. 

वर्क फ्रॉम करताना स्वयंपाकघरातील काही ट्रिक्स येतील कामी

कुकरचे झाकण पटकन उघडू नका

कुकरच्या शिट्या देऊन झाल्यानंतर घाईने झाकण उघडू नका.  साधारण 10-15 मिनिट्स गेल्यानंतरच कुकरचे झाकण उघडा.  तुम्हाला त्वरीत झाकण उघडून हवे असेल तर तुम्ही सिंकमध्ये कुकर ठेऊन त्यावर थंड पाणी ओता.  जेणेकरून आतील तापमान कमी करण्यासाठी मदत होईल आणि कुकर पटकन  उघडला जाईल. मुळात कुकर अत्यंत गरम असल्याने वाफ साचून राहते. त्यामुळे कुकर त्वरीत उघडू नये. वाफ काढून टाकल्यानंतरच कुकर उघडणे योग्य आहे. जर वाफेचा आवाज येत नसेल तर तुम्ही कुकर उघडू शकता. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT