या हटके स्टाईलने ड्रेप करा साडीचा पदर, मिळेल सेलिब्रेटी लुक

या हटके स्टाईलने ड्रेप करा साडीचा पदर, मिळेल सेलिब्रेटी लुक

फॅशनचे ट्रेंड नेहमीच बदलत असतात. त्यामुळे ट्रेंडमध्ये असलेल्या फॅशनप्रमाणे स्टायलिश दिसण्यासाठी अनेकजणी बॉलीवूड सेलिब्रेटीजनां फॉलो करतात. कारण ग्लॅमरस आणि फॅशनेबल दिसण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. फॅशनमध्ये साडी हा असा एक प्रकार आहे जो लहान मुलींपासून  वयस्कर महिलांपर्यंत आणि सर्व सामान्यांपासून ते थेट बॉलीवूड सेलिब्रेटीज पर्यंत सर्वांनाच भुरळ घालतो. साडीचं ब्लाऊज आणि साडी ड्रेप करण्याची पद्धत या मध्ये लहान सहान बदल करून तुम्ही स्टायलिश दिसू शकता. कारण साडीचा पदर हा साडीचा मुख्य भाग असतो. त्यामध्ये निरनिराळ्या प्रिंट आणि कलाकुसर केलेल्या असतात. त्यामुळे आजकाल साडीचा पल्लू निरनिराळ्या पद्धतीने ड्रेप करण्याची फॅशन आहे. तुम्हाला जर एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे लुक करायचा असेल तर तुम्ही या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमच्या साडीचा पदर ड्रेप करू शकता.  

शिल्पा शेट्टी स्टाईल -

शिल्पा शेट्टी तिचं साडीवरचं प्रेम ती नेहमीच निरनिराळ्या लुक्समधून दाखवत असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे अनेक साडीमधले फोटो आहेत. या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आहे. मात्र या अगदी साध्या असलेल्या साडीला तिने केलेल्या ड्रेपिंग स्टाईलमुळे एक हटके आणि स्टायलिश लुक मिळत आहे. तिने साडीचा पदर अगदी साध्या पद्धतीनेच ड्रेप केला आहे. मात्र या साडीवर तिने बलुन्स स्लीव्जचं ब्लाऊज घातलं आहे आणि मॅचिंग बेल्टने तिने ती साडी पेअर केली आहे.

Instagram

माधुरी दीक्षित स्टाईल-

माधुरी दीक्षित म्हणजे सौंदर्याची महाराणीच... तिच्या सौंदर्यामुळे आजही अनेकांचे दिल धकधकल्याशिवाय राहत नाही. खरंतर माधुरीचे सर्वच लुक छान असतात मात्र माधुरी जेव्हा साडी नेसते तेव्हा तिच्या अदा काही निराळ्याच असतात. या फोटोमध्ये माधुरीने जी साडी नेसली आहे. त्यामध्ये तिने साडीच्या पदरावर डिझायनर जॅकेट घालतं आहे. ज्यामुळे तिचा लुक स्टायलिश दिसत आहे. अशा प्रकारे साडी ड्रेप केल्यामुळे तुम्ही फॅशनेबल तर दिसालच शिवाय तुम्हाला पदर सांभाळण्याची गरज नाही. त्यामुळे साडीत वावरणंही खूप सहज होतं. 

Instagram

विद्या बालन स्टाईल -

विद्या बालन पारंपरिक कांचिपूरम साडी, केसांचा अंबाडा, गजरा, मोठी टिकली आणि झुमके अशा लुकमध्ये छानच दिसते. पण तिचे काही स्टायलिश लुकही अनेकांना फॉलो करावेसे वाटतात. या फोटोमध्ये विद्याने जी साडीचा पल्लू अशा पद्धतीने ड्रेप केला आहे की तिचा लुक अगदी युनिक आणि फॅशनेबल वाटत आहे. पदरावर तिने साडीवर मॅचिंग कोट घातला आहे. मात्र यात साडीचा लुक नीट दिसावा यासाठी साडीचा पदर मोकळा ठेवत तिने तो ड्रेप केला आहे. ज्यामुळे साडीचा जाळीदार पदर तर नीट दिसत आहेच शिवाय एकाबाजून कोटमुळे तिचा लुक अतिशय सुंदर दिसत आहे. 

Instagram

सोनम कपूर स्टाईल -

फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे ती सोनम कपूर. सोनम कपूरचे लुक नेहमीच वेगळे आणि हटके असतात. त्यामुळे जर तुम्हाला  बॉलीवूड स्टाईल फॅशन करायची असेल तर तुम्ही सोनम कपूरला नक्कीच फॉलो करू शकता. सोनम कपूरचे अनेक साडी लुक आणि ड्रेपिंग स्टाईल तुम्हाला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतील. अशा प्रकारे साडीचा पल्लू ड्रेप केला तर तुम्ही स्टायलिश आणि हॉट दोन्ही दिसाल.

Instagram

जान्हवी कपूर स्टाईल -

जान्हवी कपूर सध्या तरूणांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. जान्हवीकडे तिची आई श्रीदेवीचं सौंदर्य वारसा हक्काने आलेलं आहे. जान्हवी सर्वात जास्त सुंदर दिसते साडीमध्ये. तुम्हालाही जान्हवीप्रमाणे बॉलीवूड स्टाईल लुक करायचा असेल तर अशा डिझायनर साडीचा पदर पिन अप करा आणि पुढच्या दिशेने थोडा मोकळा ठेवा. ज्यामुळे तुमचं स्टायलिश ब्लाऊज आणि कमनिय बांधा व्यवस्थित दिसू शकेल.

Instagram

Beauty

Manish Malhotra Hi-Shine Lipstick - Sunset Sienna

INR 950 AT MyGlamm